गौरी शिंदे हे नाव अल्पावधित सर्वांच्या परिचयाचे झाले. जाहिरात क्षेत्रात जवळपास शंभर जाहिराती गौरीच्या नावावर आहे. असं असताना काहितरी वेगळे करावे या हेतूने ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटासाठी तिने कथा लिहिली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. पहिला चित्रपट असूनही गौरीचा नवखेपणा कुठेही जाणवला नाही. अतिशय सुंदर असा गुंफलेला हा चित्रपट प्रत्येकाला आपलासा वाटला. गौरीचा बॉलिवुडमधील श्रीगणेशा त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र आणि तिचे या क्षेत्रातील आगामी प्लॅन्स या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून.
तारीख : २० नोव्हेंबर
स्थळ : पुल देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी
वेळ : दुपारी ४ वाजता.
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा