७ मार्चच्या व्हिवा पुरवणीत इट्स माय ‘लाईफस्टाईल’ ट्रेकिंग करणाऱ्या वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांचा दृष्टिकोन दिला होता. हल्लीच्या काळात ट्रेकिंग ही काही पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही हे खरंय. आम्ही काही मैत्रिणी नेहमी आवर्जून ट्रेकिंगला जात असतो. इथे फक्त मुलींचा ग्रूप किंवा फक्त मुलांचा ग्रूप असा भेद करायचं कारण नाही. ट्रेकिंगचा आनंद महत्त्वाचा. प्रत्येकजण या आनंदाकडे वेगवेगळ्या कारणानं ओढला जातो. पण निसर्ग भरभरून देतो ते घेण्यासाठी कधीतरी त्याच्याकडे गेलंच पाहिजे, हे नक्की.
– मीनल कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपणच आपली भाषा प्रेमानं जपली पाहिजे
२८ फेब्रुवारीच्या व्हिवा वॉलमध्ये मराठी बोलणाऱ्या मुला-मुलींचे अनुभव दिले होते. आमच्या ग्रूपमध्येसुद्धा काही महाराष्ट्राबाहेरची मुलं आहेत. त्यांना आमच्याबरोबर राहून आता मराठी बोलता यायला लागलंय. त्यातील एकजण तर आमच्याकडून मुद्दाम मराठी शब्द शिकून घेतोय. दुसऱ्याला आता सरावानं छान मराठी बोलता येतंय. माझ्या मते, आपणच आपली भाषा प्रेमानं जपली तर ती दुसऱ्यांपर्यंत, परप्रांतीयांपर्यंत मानाने पोचेल. ते आपल्या भाषेची दखल घेतील.
– सचिन चव्हाण

मराठी शिकण्यासाठी ब्लॉग
२८ फेब्रुवारीच्या व्हिवामधील ‘मराठीची बोलू कौतुके’ लेखात आणि ‘व्हिवा वॉल’वर मराठी शिकणाऱ्या परराज्यातील आणि विशेषत: परदेशी नागरिकांची ओळख आपण करून दिली आहे. त्यांचे मराठीप्रेम आणि मराठी शिकण्याची धडपड खरंच कौतुकास्पद आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की; अशा अनेक परराज्यांतील आणि परदेशी व्यक्तींना मी स्वत: मराठी शिकण्यासाठी मदत करत आहे. मी दोन वेबसाइट (ब्लॉग) सुरू केले आहेत -एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी; आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी. परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
 – कौशिक लेले
@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. viva.loksatta@gmail.com