मृण्मयी पाथरे
‘माझी लेक सध्या सातवीत शिकते आहे. करोनाकाळात शिक्षण ऑनलाइन झाल्यामुळे तिला एक टॅबलेट घेऊन दिला. मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही वर्क फ्रॉम होम करत असल्याने आम्हालाही आमचे लॅपटॉप्स कामासाठी हवे होते. पण यंदा शाळा सुरू होऊन एक महिना होऊन गेला तरीही माझी मुलगी अजूनही पुस्तकांपेक्षा टॅबलेटवरच जास्त वेळ घालवते. आम्हा सगळय़ांकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मच सबस्क्रिप्शन असल्यामुळे ती त्यावर तासनतास चित्रपट, नाहीतर कुठल्या तरी वेबसीरिज बघत बसते. मागे आम्ही अकाउंटचा पासवर्ड बदलला तर तिने आमच्याशी दोन दिवस अबोला धरला. माणसांपेक्षा डिजिटल डिव्हायसेस जवळची वाटायला लागली आहेत आजकालच्या मुलांना!’, अनन्या वैतागून सांगत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निपुणला गेल्या वर्षीची जे. ई. ई. परीक्षा पास करता आली नाही. त्यामुळे त्याने त्याच्याच परिसरातील एका कॉलेजमध्ये पुढे बॅचलर्स इन इंजिनीअिरग ( इ. ए.) करायचं ठरवलं. निपुणने त्याच्या कुटुंबीयांना दाखवलं नसलं, तरी जे. ई. ई.मध्ये सफल न झाल्याचं त्याला खूप वाईट वाटलं होतं. हे दु:ख त्याने इतरांना सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला इतरांनी झालं गेलं विसरून जाऊन भविष्याकडे पाहायला सांगितलं. निपुणलाही मग हळूहळू ‘आपण किती वेळ आपलं दु:ख कुरवाळत बसणार’ असं वाटायला लागलं. त्याचा मूड चांगला व्हावा म्हणून त्याने ‘फ्रेंड्स’, ‘ऑफिस’, ‘बिग बॅंग थिअरी’ यांसारखे सिटकॉम्स बघायला सुरुवात केली. दररोज एक-दोन एपिसोड बघता बघता निपुण दरदिवशी अखंड सीजन्स कधी पाहायला ( binge watch) लागला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. या सीरिज बघण्यात बराच वेळ जात असल्यामुळे त्याचं घरच्यांशी बोलणं आणि मित्रमंडळींत वावरणंही कमी झालं. अभ्यास करता करता सीरिज पाहिल्याने त्याला अभ्यास करण्यासाठी आधीपेक्षा दुप्पट वेळ लागू लागला.
लौकिक गेली पाच वर्ष एका बहुराष्ट्रीय (multinational)कंपनीमध्ये काम करत होता. प्रमोशन मिळाल्यानंतर कामाच्या गराडय़ात अडकल्यामुळे त्याला मित्रमंडळींसोबत पार्टीला किंवा गेट-टुगेदरला जायलाही वेळ मिळत नव्हता. हळूहळू त्याचे मित्रही त्याच्यापासून दुरावले गेल्याने त्याला एकटं वाटू लागलं. नवे मित्र-मैत्रीण शोधण्यासाठी त्याने ‘बम्बल बी. एफ. एफ.’ सारखे ॲप्स डाउनलोड केले. या ॲप्सवर पण २०-२५ लोकांशी चॅटिंग केल्यावरच तो एखाद्या व्यक्तीला कसाबसा भेटायला तयार व्हायचा. त्या व्यक्तीला भेटल्यावरही त्याचं लक्ष सतत इन्स्टाग्रामवर कोणत्या अँगलने कसे हॉटेलचे आणि खाण्याचे फोटोज आणि व्हिडीओज काढले तर जास्त लाइक्स मिळणारं रील बनवता येईल याकडे असायचं. माणसं समोर असतानाही लौकिकला मोबाइल जास्त जवळचा वाटू लागला.
मुलांची वयं कितीही असो, आजकाल कित्येक पालक मुलांच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वाढत्या वापरामुळे त्रासले गेले आहेत. पण आपण याची पाळंमुळं शोधायला सुरुवात केली तर कदाचित केवळ मुलांनाच दोष देता येणार नाही. आजकाल बाळाचा जन्म झाल्या झाल्या आपल्यापैकी कित्येक जण बाळाच्या लहानसहान हालचालींचे, करामतींचे आणि नाच / गाणं / डायलॉगच्या सादरीकरणाचे केवळ आठवणींसाठीच नव्हे, तर सोशल मीडियावर टाकण्यासाठी फोटोज आणि व्हिडीओज रेकॉर्ड करतात. बाळाच्या पोटात दूध किंवा अन्न जावं आणि हे करत असताना बाळाने कुरबुर करू नये, नाहीतर आधीच असलेल्या कामाच्या ढिगाऱ्यात आणखी एक वेळखाऊ काम नको म्हणून टी.व्ही. किंवा मोबाइलवर वेगवेगळे कार्टून्स किंवा व्हिडीओज दाखवले जातात. अगदी मोठी माणसंही कित्येकदा जेवताना एकमेकांसोबत संवाद साधण्यापेक्षा टी.व्ही. पाहण्यावर किंवा मोबाइलवर आलेले मेसेजेस चेक करण्यावर भर देतात. यात कलेचा आनंद लुटता लुटता आपण काय खात आहोत आणि किती खात आहोत याच्याकडे मात्र दुर्लक्ष होऊ शकतं.
आपण आपल्या अशा वागणुकीतून आपल्या आजूबाजूच्या मंडळींना आणि पुढच्या पिढीला मिक्स सिग्नल्स पाठवत असतो. आपल्या भावनांना बोलण्यातून, चेहऱ्यावरील हावभावांतून, रडण्यातून आणि वागणुकीतून मोकळी वाट करून देण्यापेक्षा या भावनांकडे दुर्लक्ष केलेलंच बरं असा संदेशही यातून इतरांपर्यंत पोहोचू शकतो. कालांतराने आपल्यालाही या वागण्याची इतकी सवय होऊन जाते की यात काही वावगं आहे असं वाटतच नाही. अगदी सकाळी उठल्यावरही घरातील मंडळींना गुड मॉर्निग म्हणण्याऐवजी व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निगचे मेसेजेस पाठवणं हल्ली अंगवळणी पडलं आहे. त्यात सध्या मनोरंजनाचे कार्यक्रम बोटाच्या एका क्लिकवर अभ्यास / काम करताना, प्रवास करताना, झोप येत नसेल तेव्हा आणि अगदी बाथरूममध्ये असतानाही उपलब्ध झाल्यामुळे एन्टरटेन्मेंटला कोणत्याही विशिष्ट वेळ आणि ठिकाणाच्या सीमा राहिल्या नाहीत. कठीण प्रसंगातून किंवा दु:खातून सावरताना आजकाल आपल्यापैकी कित्येक जण तंत्रज्ञानाचा कोपिंग स्ट्रॅटेजी ( coping strategy) म्हणून वापर करायला लागले आहेत.
आजकाल प्रदर्शित झालेले कित्येक चित्रपट, वेबसीरिज वेगवेगळय़ा विषयांवर भाष्य करतात. कधी कधी आपल्या जवळच्या माणसांशी संपर्क कमी झाल्याने यातील पात्रं आपल्याला आपल्या आयुष्यातील इतर माणसांपेक्षा जास्त जवळची वाटू लागतात. नकळतपणे आपणही आपल्या आयुष्यात आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या कथेत आणि पात्रांत साधर्म्य शोधायला लागतो. हे साधर्म्य सापडलं की आपणही त्या पात्रांशी एकरूप होऊन त्यांच्यासारखंच आयुष्य जगायला लागतो. याला vicarious living असंही म्हणतात. एवढंच नव्हे, तर आपल्या घरात कोणी भांडणतंटा असणारी सीरिअल किंवा ‘बिग बॉस’सारखे रिॲलिटी शोज पाहत असतील, तर त्यांच्या बोलण्या-वागण्यात या कार्यक्रमातील पात्रांसारखा बदल होऊ शकतो. एकूणच, आपण जे सतत ऐकतो किंवा पाहतो याचा नेहमी जाणवत नसला तरी आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतच असतो. अशा वेळेस आपणच आपल्या स्क्रीन-टाइमवर बंधन घालणं, इतर कोणी आपल्याशी संवाद साधत असेल तर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बाजूला ठेवून लक्षपूर्वक संभाषण करणं, जेवताना काहीतरी पाहत बसण्यापेक्षा खाण्याचा आस्वाद घेणं, एकमेकांचा दिवस कसा होता याबद्दल विचारपूस करणं उपयोगी ठरू शकतं. मग, डिजिटल डिटॉक्सला कधी सुरुवात करताय?
viva@expressindia.com