कॉलेज.. आतापर्यंत सगळ्यांकडून ऐकलेलं.. फोटोंतून डोकावणारं.. सिनेमांत कॅमेऱ्यानं टिपलेलं.. मालिकांतून दिसलेलं.. आता आपणच ते अनुभवणार असतो.. अगदी समरसून.. एकदम उत्साहानं, आनंदानं.. समस्त ‘अकरावी’कर सध्या हेच अनुभवत असतील. अॅडमिशनच्या महाकसरतीतून सुटका झाल्यावर आपल्या आवडत्या कॉलेजचं आयकार्ड मिरवत झोकात एन्ट्री कशी घ्यायची, अशी स्वप्नं अनेक अकरावीकर रंगवत असतील. काहींचे क्लासेस ऑलरेडी सुरू झाल्यानं त्यांचा अभ्यास सुरू झाला असला तरी कॉलेजमधली लेक्चर्स अटेण्ड करणं, ये बात तो कुछ और ही होती हैं!
प्रोफेसर्सच्या शिकवण्याच्या नाना तऱ्हा, सीनियर्सनी दिलेले अनोखे कानमंत्र, कॉलेज कॅण्टीनच्या अण्णांची ‘पोटभर’ माया, कट्टय़ावरचा टीपी, कम्पसमधली धम्माल मस्ती, लायब्ररीतली करडी शिस्त, ‘डेज’चे जादूई क्षण.. हे नि असे नाना क्षण या कॉलेज लाइफमध्ये ‘अकरावी’करांना यापुढं एन्जॉय करायचेत. त्याच बरोबरीनं किंबहुना थोडा अधिकच करायचाय तो अभ्यास. ती प्रोजेक्टस्, प्रेझेंटेशन्स नि प्रॅक्टिकल्सही.. फ्रेण्डस्, कॉलेज ही एक व्हेरी हॅपिनग प्लेस आहे. तिथल्या पॉझिटिव्हनेसची एनर्जी आपली आपणच अनुभवायला हवी. युवर टाइम स्टार्टस् नाऊ.. ऑल द बेस्ट!
अकरावीत अॅडमिशन घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत ‘व्हिवा’शी शेअर केलं.
श्रद्धा नेने
ऑनलाइन अॅडमिशनच्या प्रोसिजरनंतर फर्स्ट लिस्ट कधी लागेल, याची वाट बघतेय. माझ्या काही मत्रिणी माझ्यासारख्याच कॉमर्सला अॅडमिशन घेणार आहेत; पण काही मात्र दुसऱ्या साइडला जाणारेत. थोडी काळजी वाटतेय की, कॉलेजमधलं वातावरण कसं असेल.. थोडी एक्साइटमेंटही नि क्युरॉसिटीही आहे की, प्रोफेसर्सचं शिकवणं नि कॉलेज कॅम्पस कसा असेल.. एरवी ऐकतो-वाचतो तसं रँिगग वगरे होणार नाही ना, अशी थोडी भीतीही वाटतेय. आम्ही शाळेतल्या मत्रिणी टचमध्ये राहणार आहोत. नव्या मत्रिणींसोबतही तेवढंच छान बॉिण्डग व्हावंसं वाटतंय. ‘फ्रेण्डशिप डे’च्या निमित्तानं आमच्या शाळेच्या ग्रुपनं गेट टू गेदर करायचं ठरवलंय. बीकॉम, बीएमएस की बँकिंग करायचं, हे मी बारावीनंतर ठरवणार आहे.
प्राजक्ता आरेकर
अॅडमिशनच्या धावपळीनंतर आता लक्ष लागून राहिलंय, ते पहिल्या लिस्टकडं. कॉलेज कोणतं घ्यावं हा एक प्रश्न होता. कारण आतापर्यंत शाळा जवळच होती. पण चांगल्या करिअरसाठी थोडं लांब जायची तयारी केली आहे मनाची. सुरुवातीला होईल थोडीशी धावपळ, पण मग सुरळीत होईल सगळं. आता ट्रेननं प्रवास करावा लागणार असला, तरी या प्रवासाची भीती नाही वाटत. सोबतीला शाळेतल्या ओळखीच्या मत्रिणी असतीलच. शिवाय आणखी नवीन मत्रिणी मिळतील. प्रोफेसर्सच्या शिकवण्याविषयी, कॉलेजच्या कॅम्पसविषयी खूप उत्सुकता वाटतेय. शाळेप्रमाणंच मला कॉलेजमध्येही स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायचंय. पुढं मी सीए किंवा एमबीए करायचं ठरवतेय.
गौरव वैद्य
कॉलेजमध्ये जायचंय त्यामुळं एकदम मोठ्ठं झाल्यासारखं वाटतंय. आपले निर्णय आपण घ्यायला शिकतोय. कोकणातून मुंबईत आल्यावर आपण इथं अॅडजस्ट करू शकू का, असं वाटत होतं. क्लासमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मित्रांसोबत िहदी – इंग्रजी बोलता येईल का, अशी थोडीशी भीती मनात होती. त्यामुळं आपण इथं येऊन चूक तर नाही ना केली, असा ओझरता विचारही मनात येऊन गेला. पण ध्येय गाठायचं तर, हे निभावायलाच हवं हिकमतीनं, असं मनाशी पक्वं ठरवलं. आता चांगले मित्र झालेत क्लासमध्ये. संवाद साधायची भीतीही चेपली. त्यामुळं अॅडजस्ट झालं. कसं असतं कॉलेज लाइफ, ही उत्सुकता वाढतेय. बारावीनंतर मी मेकॅनिकल इंजिनीयिरग नि नंतर ऑटोमोबाइलमध्ये एमई करणारेय.
गायत्री तावडे
कॉलेज लाइफबद्दल खूप एक्साइट आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर भरपूर मजा करायची आहे. तेवढाच समरसून अभ्यासही करायचाय. कॉमर्स घेऊन मी सीए किंवा सीएस करायचं ठरवतेय. नवीन फ्रेण्ड्स कसे असतील, त्यांच्या आवडी-निवडी काय असतील, याची उत्सुकता वाटते आहे. प्रोफेसर्सचं शिकवणं, अभ्यास-प्रोजेक्ट्स् वगरे कसं असेल, अशी थोडीशी धाकधूक वाटतेय. मला स्पोर्ट्स नि डान्समध्ये रस असल्यानं कॉलेजमधल्या या अॅक्टिव्हिटीजमध्ये मी सहभागी होणार आहे. कॉलेजबद्दल मी आणखी काय सांगू? सध्या कॉलेज म्हणजे माझ्यासाठी सॉलिड एक्साइटमेंट आहे.
गिरिजा लेले
आम्ही अलीकडेच पुण्याहून जळगावला शिफ्ट झालोय. त्यामुळं सगळंच नवीन आहे. माझा क्लास सुरू झालाय. इथं नवीन ग्रुप तयार करणं, इथली शिकवण्याची पद्धत समजून घेणं, हे सगळंच अॅडजस्ट होतंय. फॉर्म घ्यायला गेल्यावर किती तरी व्यावहारिक गोष्टी कळल्या नि अॅडमिशनची प्रोसेस अजून चालू असल्यानं आणखीही गोष्टी कळताहेत. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यानं बरं वाटतंय नि आपल्याला हे जमेल ना, अशी किंचितशी भीतीही वाटतेय. विज्ञानविषयक स्पर्धा- प्रोजेक्ट्समध्ये आणि ड्रॉइंगच्या स्पर्धात मी कॉलेजमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळं माझ्या आवडीच्या विषयांची अधिकाधिक माहिती जाणून घेता येईल. नवीन मित्रमत्रिणी मिळतील. पुढं बी.एस्सी.नंतर मास कम्युनिकेशन करणार असून पुढं पीएच.डी. करायचा विचार आहे.
मिहिर वास्ते
नकळत्या वयापासून शाळेची गोडी लागल्यानं ती सोडताना मन भरून येतंय.. एवढय़ा वर्षांपासूनचे मित्र, त्यांच्यासोबतची दंगामस्ती.. शिक्षकांचं प्रेम नि आमच्या भल्यासाठीच त्यांनी वेळप्रसंगी दिलेला मार.. या सगळ्या गोष्टी कधी तरी केवळ आठवणी म्हणून उरतात.. शाळा सोडावीच लागते. प्रत्येक जणच या प्रसंगातून जातो.. पुढचा टप्पा कॉलेजचा. कॉलेज म्हणजे जणू हॅपिनग प्लेस. त्यामुळं मला कॉलेजविषयी खूप उत्सुकता वाटतेय. पण जुन्या मित्रांचा सहवास तुटणार असल्याचं दु:ख आहे. शाळा जवळच होती, आता कॉलेजसाठी थोडा प्रवास करावा लागणार आहे. कॉलेज लाइफ असतं तर कसं, हे अनुभवण्याची वेळ आता जवळ आली आहे. कॉलेजच्या पहिल्या दिवसाची मी आतुरतेनं वाट पाहतोय.. पुढं मला मॅथ्समध्ये पीएच.डी. करायची आहे.