कॉलेज.. आतापर्यंत सगळ्यांकडून ऐकलेलं.. फोटोंतून डोकावणारं.. सिनेमांत कॅमेऱ्यानं टिपलेलं.. मालिकांतून दिसलेलं.. आता आपणच ते अनुभवणार असतो.. अगदी समरसून.. एकदम उत्साहानं, आनंदानं.. समस्त ‘अकरावी’कर सध्या हेच अनुभवत असतील. अॅडमिशनच्या महाकसरतीतून सुटका झाल्यावर आपल्या आवडत्या कॉलेजचं आयकार्ड मिरवत झोकात एन्ट्री कशी घ्यायची, अशी स्वप्नं अनेक अकरावीकर रंगवत असतील. काहींचे क्लासेस ऑलरेडी सुरू झाल्यानं त्यांचा अभ्यास सुरू झाला असला तरी कॉलेजमधली लेक्चर्स अटेण्ड करणं, ये बात तो कुछ और ही होती हैं!
प्रोफेसर्सच्या शिकवण्याच्या नाना तऱ्हा, सीनियर्सनी दिलेले अनोखे कानमंत्र, कॉलेज कॅण्टीनच्या अण्णांची ‘पोटभर’ माया, कट्टय़ावरचा टीपी, कम्पसमधली धम्माल मस्ती, लायब्ररीतली करडी शिस्त, ‘डेज’चे जादूई क्षण.. हे नि असे नाना क्षण या कॉलेज लाइफमध्ये ‘अकरावी’करांना यापुढं एन्जॉय करायचेत. त्याच बरोबरीनं किंबहुना थोडा अधिकच करायचाय तो अभ्यास. ती प्रोजेक्टस्, प्रेझेंटेशन्स नि प्रॅक्टिकल्सही.. फ्रेण्डस्, कॉलेज ही एक व्हेरी हॅपिनग प्लेस आहे. तिथल्या पॉझिटिव्हनेसची एनर्जी आपली आपणच अनुभवायला हवी. युवर टाइम स्टार्टस् नाऊ.. ऑल द बेस्ट!
अकरावीत अॅडमिशन घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत ‘व्हिवा’शी शेअर केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा