हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
ऋतू कोणताही असला तरी तरुणाईला ‘फन, फूड, फॅशन’ या गोष्टींशिवाय करमतच नाही. हा ट्रिपल धमाका मनसोक्त अनुभवायचा असेल तर मग फॅशन स्ट्रीट, िलकिंग रोड, हिल रोड, कुलाबा कॉजवे या ठिकाणी जाणं मस्ट होतं. फॅशन नि स्टाईल करायची तर या ठिकाणांना प्रेफरन्स द्यायला हवा. हे शॉिपग ऑन रोड असल्यानं लोक पटकन अॅट्रॅक्ट होतात. आकर्षकपणं डिस्प्ले केलेले ड्रेसेस नि वस्तू लगेच घ्यायची मानसिकता लक्षात घेतली जाते. आवडलेल्या वस्तूची शहानिशा होऊन, आपल्या बाग्रेिनग एनर्जीचा पुरा कस लागतो.. अनेकदा ठरवल्यापेक्षा जास्त शॉिपग होतंच. शॉिपगनंतर इटिंग आऊटही ओघानंच होतं. अलीकडं काही जण ब्रॅण्डेड गोष्टींना प्रेफरन्स देऊ लागलेत. पण रस्त्यावरचं असो किंवा ब्रॅण्डेड असो कोणत्याही वस्तूची गॅरेंटी नसतेच. मग स्ट्रीट शॉिपग करा, पसे वाचवा, रोज बदलत्या फॅशनची दखल घ्या, असा फंडा सहजगत्या स्वीकारला जातो. स्ट्रीट शॉिपग हे कोणत्याही एका क्लासपुरतं मर्यादित नाहीये. कारण फॅशन ऑन स्ट्रीट हे शंभर टक्के खरंच आहे. म्हणूनच आपापल्या स्ट्रीट शॉिपगविषयीचे अनुभव काही जणांनी ‘व्हिवा’शी शेअर केल्येत.
पूर्वा पेंडसे
एरवी मी आई किंवा मत्रिणींसोबत घाटकोपर िलक रोडला स्ट्रीट शॉिपगला जाते. माझ्या बहिणी गावाहून आल्यावर त्यांना िलकिंग रोड, फॅशन स्ट्रीटचं अप्रूप वाटतं. त्यांच्यासोबत मी तिकडं गेल्यावर काही तरी घेणं होतंच. मी टॉप्स, कॅज्युअल वेअर्स, चप्पल, सॅण्डल्स घेते. फॅशन स्ट्रीटला जाते तेव्हा मला प्रॉपर बाग्रेन करावंच लागतं. कारण तिथं येणाऱ्या मुंबईबाहेरच्या लोकांसाठी किंवा परदेशी पर्यटकांसाठी तिथल्या किमती वाढवलेल्या असतात. खरेदी करताना कपडय़ांची क्वालिटी चांगली असली तरी ते नीट बघणं, रंगाबद्दलची खात्री करणं इत्यादी गोष्टींची मी काळजी घेते. स्वस्त मिळत असल्यानं मी हे शॉिपग प्रीफर करते. तीन-चार महिने रोजच्या वापरासाठी या गोष्टी बऱ्या पडतात नि त्यांचे पूर्ण पसे वसूल होतात.
स्नेहल भोळे
मी िलकिंग रोड, कुलाबा कॉजवे, हिल रोड, बोरिवली स्टेशनरोड मार्केट अशा वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलची माहिती कळल्यावर तिथं शॉिपगला जाते. मी ‘टॉमबॉय’ टाईप असल्यानं मला टिपिकल गर्ली टॉप्स आवडत नाहीत. फ्रेण्ड्ससोबत शॉिपग करताना मोस्टली टॉप्स घेतले जातात. त्या बऱ्याचदा बाग्रेिनग करत नाहीत, पण मी मात्र करते. टॉप्समध्ये खूप व्हरायटी असल्यानं निवडीला चिक्कार वाव मिळतो. फॅमिलीसोबत शॉिपगला गेल्यावर बाग्रेिनग करण्याचं महत्त्वाचं काम माझी मोठी बहीण चांगलं करते. ती अगदी निम्म्यावर किंमत आणते. मी स्पोर्ट्स शूज नि सॅण्डल्सही घेते. स्ट्रीट शॉिपग करताना मी घेतलेला टॉप इन फॅशन असेल नि तसाच तो युनिकही असेल, याकडं माझा कटाक्ष असतो.
शिल्पा तोरस्कर
मी कॉलेजला होते तेव्हा फॅशन स्ट्रीट हा कन्सेप्ट नवीन होता. तो एक जणू मॉलच होता रोडवरचा. तेव्हा मला कपडय़ांचा एवढा सेन्सही नव्हता. पुढं माझा ड्रेस सेन्स वाढल्यावर मी िलक रोडला जाऊ लागले. तिथं मला छान, स्वस्त नि डेली युजसाठी ड्रेसेस, शूज मिळाले. इथं एन् नंबर ऑफ ऑप्शन्स होते. चिक्कार व्हारायटी नि हवा तसा साईज मिळायचा. मला तिथं शॉिपग करायला खूप आवडलं नि अजूनही आवडेल. बाग्रेिनग करायला मी आईकडून शिकले. मला ते चांगलं जमलंय. त्या वाचलेल्या पशांतून मी इतर वस्तू घेते. इथं घेतलेले कपडे जास्तीत जास्त ३-४ महिने घातले जातात. मात्र त्यानंतर ते टाकून देण्यापेक्षा गरजूला द्यावेत, असं मला वाटतं. स्टॅण्डर्ड ऑफ लीिव्हग वाढल्यावर मी ब्रॅण्डेड कपडे घ्यायला प्रेफरन्स देत्येय. त्यामुळं अलीकडं मी तिथं गेले नसले तरी मला तिथं जायला नक्की आवडेल.
प्रियांका देसाई
मी कुलाबा कॉजवेला ज्वेलरी-अॅक्सेसरीज नि फॅशन स्ट्रीटला टॉप्स, स्कार्फ, जीन्स, जाकीट वगरे घेते. मत्रिणींसोबत शॉिपगला गेल्यावर बाग्रेिनग मीच करते. बऱ्याचदा इथले दुकानदार टीनएज मुली बघून फारसे पसे कमी करत नाहीत. पण पालक सोबत असताना पसे कमी करतात. खरेदी करताना मी तो ड्रेस कॉमन नाहीये ना, किमतीच्या हिशेबानं त्याची क्वालिटी कशी आहे, साईज परफेक्ट आहे ना ते तपासते. डेली युज वेअर, फॅशन म्हणून नि पसा वसूल या तिन्ही गोष्टी एकसाथ स्ट्रीट शॉिपगमुळं होतात. आधी आम्ही फक्त पालकांसोबत मॉल्स किंवा शॉप्समध्ये शॉिपग करायचो. ज्या किमतीत शॉप्समध्ये एक टॉप येतो, तिथं स्ट्रीट शॉिपगमध्ये तीन-चार टॉप्स येतात. त्यामुळं आम्ही स्ट्रीट शॉिपग करून वाचवलेल्या पशांनी पेटपूजा करतो. शॉिपग करायला लागल्यापासून मी स्ट्रीट शॉिपगच करत्येय. कारण स्ट्रीट शॉिपग एकदम बेस्ट आहे.
अश्विनी टाकळे
फॅशन स्ट्रीटला मी कॉटनचे वेगळ्या पॅटर्नचे कुत्रे घेणं प्रीफर करते. आपल्यासमोरच ड्रेसेस हँगरला डिस्प्ले केलेले असल्यानं सिलेक्शनसाठी खूप वाव मिळतो, जो शॉपमध्ये तुलनेनं कमी मिळतो. मी कुर्ता घेताना मटेरिअलची क्वालिटी नीट चेक करते. जीन्सवरचे शूज नि बेल्टची खरेदी करते. इथं ब्रॅण्डेडपेक्षा कमी किमतीत वस्तू मिळतेय, हा टिपिकल मध्यमवर्गीय विचार मनाला समधान देतो. मत्रिणींसोबत मीही बाग्रेिनग करते. मला एरवीही एकूणच खरेदी करायला आवडतं. स्ट्रीट शॉिपगमुळं त्या दुकानदारांनाही चार पसे मिळावेत, हाही उद्देश असतो.
स्नेहल वैद्य
मी कुलाबा कॉजवे नि िलकिंग रोडला स्ट्रीट शॉिपग करते. तिथून मॅचिंग अॅक्सेसरीज, कलरफुल नि ट्रेण्डी बॅग्ज, डेली यूजसाठी फंकी चपला घेते. या शॉिपगचं बाग्रेिनग मीच करते. इथं सांगितले गेलेले चढे रेट आपण कमी करू शकतो. बऱ्याचदा ते त्या किमतीला वस्तू द्यायला राजी होतात नि आपल्याला काही तरी छान मिळून जातं. पूर्वी अगदी निम्म्या किमतीत वस्तू मिळायच्या. पण वाढलेल्या महागाईमुळं खूप बाग्रेिनग करणं शक्य होत नाही. खरेदी करताना फॅब्रिक नीट बघणं, रंगाबद्दल खात्री करणं, डिफेक्ट नसल्याचं तपासणं, यावर माझा कटाक्ष असतो. एकूणच हा शॉिपग एक्सपिरिअन्स खूप ऑसम असतो. इथून खरेदी केलेल्या वस्तू कधी एकदा लगेचच वापरेन, अशी एक्साईटमेंट वाटते. या वस्तू वापरताना त्या आवडल्याचं सांगत बरेच जण त्याबद्दल कौतुक करून चौकशी करतात. अशा कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यानं खूप छान वाटतं.