हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहोचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
कॉलेज.. ओसंडणारा उत्साह.. भारावलेपण.. ती कट्टय़ावरची धम्माल.. मास बंकिंग.. ते पिक्चर टाकणं.. ती अफेअर्स.. ते गॉसििपग.. तो अभ्यास, प्रॅक्टिकल्स-प्रेझेंटेशन्स, व्हायवाज्.. प्रोफेसर्सचा ओरडा नि आजारपणात त्यांनीच पाठवलेला ‘टेक केअर’चा मेसेज.. आणि तो ‘टीवाय’चा सेंडऑफ.. तो निरोपाचा क्षण.. मन आलेलं भरून.. अनोखा हा कॉलेजचा पाश.. आयुष्यातला एक श्वास.. हा श्वास घेताना ‘टीवाय’च्या वळणावर येऊन ठेपणं.. मागं पडणारं अभ्यासू नि मनमुक्त कॉलेजलाईफ नि समोरचं मोकळं आकाश.. मनातल्या नव्या आकांक्षांचा हव्यास.. करिअरच्या वळणांची अवघड वाट.. तिला द्याल तसा लाभेल घाट.. टीवायनंतर प्रत्येकाचं मोठ्ठं होणं.. जबाबदारी पेलणं.. जणू रेशीमकिडय़ाचं झालं फुलपाखरू.. लागे कल्पना साकारू.. नवी स्वप्नं.. नवी आशा.. त्यासोबत असावा कॉलेजलाइफच्या भरगच्च आठवणींचा बुके.. सदाबहार.. टवटवीत.. तो मनात साठवून करिअरच्या गाडीला प्रयत्नांचा गिअर टाकलात तर मग दिसेल यशाची पायरी.. समाधान वाटेल अंतरी.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला असणाऱ्या काहीजणांनी आयुष्यातल्या या महत्त्वाच्या टप्प्यावरच्या आपल्या ‘फीलिंग्ज’ ‘व्हिवा’शी शेअर केल्यात.  

शुभांकर पुरोहित
टीवायबीएएफ, चेतना कॉलेज
टीवाय हा माझ्याच काय, प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो.. अजून निकाल हाती यायचाय.. परंतु एक्झाम संपल्यानं मनावरचं बरंचसं दडपण कमी झालंय. मी असं म्हणत नाही की, मी फार मोठा झालोय. पण पुढं असणाऱ्या जबाबदाऱ्या आता स्पष्ट दिसू लागल्यात आणि त्याची सावरासावर करण्याच्या विचारात बऱ्याच वेळा मला चाचपडायला होतंय.. मी अनुभवलेला तो कॉलेज कट्टा, माझ्या मित्रमत्रिणी.. तो धागडिधगा.. ते नको वाटणारे प्रेझेंटेशन्स, परीक्षा.. आणि प्रोफेसर्सकडून खाल्लेला ओरडा.. हे सर्व बरे-वाईट प्रसंग मी कधीच नाही विसरणार. कारण हे माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते.. तसे ते प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात नि म्हणूनच प्रत्येकानं ते मनसोक्त अनुभवायला हवेत. मी रियली मिसिंग माय कॉलेज डेज..

अमिता पांडे,
टीवायबीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी, बिर्ला कॉलेज
कॉलेजलाइफ भी एक अजब स्टेज है! ही परीक्षा कधी संपणार, लेक्चर्समधून सुटका कधी होणार, त्या असाइनमेंटस्, त्या व्हायवा, प्रॅक्टिकल्स् वगरेंतून सुटका होण्याची वाट आपण बघतो. एक कम्प्लिट न्यू फेज हैं लाइफ का.. सिलॅबस नि सबमिशनच्या चर्चा मागं पडून आता हायरस्टडीज नि जॉबविषयीच्या चर्चा ग्रुपमध्ये सुरू झाल्यात. सब कुछ कितना डिफरंट लग रहा है. आता स्वतचे निर्णय स्वतच घ्यायचेत. मुलगी म्हणून मला निर्णय घेताना सखोल विचार करावा लागणारेय.. बायोटेकनंतर मी क्लिनिकल रिसर्च करायचा विचार करते आहे. रिझल्टच्या विचारानं पोटात गोळा येतोय.. करिअरचा विचार नि मागं पडलेल्या कॉलेज लाइफच्या आठवणींचा मनात सतत पिंगा चाललाय.. हे खूपच नवीन फीिलग आहे. कॉलेजमधली लेक्चर्स बंक करून पिक्चर टाकण्यात आनंद वाटत होता. आता आनंदाची व्याख्या स्वावलंबी होऊन घरच्यांसाठी आनंददायी निर्णय घेण्यात बदलली आहे.

निनाद शिंदे,
टीवायबीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी, गुरुनानक खालसा कॉलेज
टीवायची परीक्षा संपल्याचा आनंद नि कॉलेज लाइफ संपल्याचं दुख अशा संमिश्र भावना पेपर संपल्यावर मनात होत्या. एफवायला कॉलेज जॉइन केल्यावर आधीची मित्रमंडळी सोबत नव्हती. पण त्यानंतरच्या काळात जिवलग असं मित्रमंडळ निर्माण झालं. बायोलॉजीमध्ये काहीतरी शिकायची इच्छा असल्यानं तो विषय घेतला. तेव्हा पुढच्या करिअरचा फारसा विचार केला नव्हता, केवळ बायोलॉजीची आवड असल्यानं या विषयाकडं वळलो. खूप ज्ञान नि प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. पुढंही शिकायची इच्छा आहे. या आधी कधीच न झालेली मोठं झाल्याची जाणीव होते आहे. आई-बाबांच्या खांद्यावरची जबाबदारी कमी करून स्वतच्या खांद्यावर घ्यायची आहे. कॉलेजमध्ये मित्रांसोबत केलेला दंगा नि शिक्षकांची मिळालेली साथ यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. खूप जवळची माणसं जोडली गेल्येत या काळात.. खूप मिस करेन त्यांना.

विविधा रात,
टीवायबीए, रामनारायण रुईया कॉलेज
कॉलेज लाइफमध्ये आम्ही धम्माल नि तेवढाच अभ्यासही केला. पॉलिटिकल सायन्सचा आमचा दहाजणांचा छानसा ग्रुप काही ना काही बहाण्यांनी भेटतोच. त्यामुळं फ्रेण्ड्सना मिस करत नसले तरी कॉलेज लाइफ संपल्याच्या जाणिवेनं वाईट वाटतंय.. ‘कीप इन टच’ असं एकमेकांना सांगतोय आम्ही सगळे.. बघू या ते कसं काय राहतंय.  सोशल साईट्समुळं फ्रेण्डसर्कलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूही शकतो. टीवायची परीक्षा दिल्यानंतर आता मोठं झाल्याची जाणीव झाल्येय. किमान आपला खर्च आपणच करायला हवा, असं वाटतंय. म्हणून वर्षभर जॉब करायचं ठरवलंय. सध्या जॉब शोधण्याचा प्रयत्न करत्येय. करिअरसाठी खूप ऑप्शन्स असल्यानं थोडं कनफ्यूजन झालंय. एमए, एमबीए की लॉ करावं.. जॉब करतानाच एमबीएच्या एन्ट्रन्स एक्झामची तयारी किंवा कदाचित बँकिंग कोर्सही करता येऊ शकेल.. आईवडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी थोडी कमी करायचा प्रयत्न करायचाय, हे मात्र नक्की.  

राजेश काडगे,
टीवायबीकॉम, महात्मा फुले कॉलेज
कॉलेज लाइफ मिस करतानाच आता व्यावहारिक जगातल्या कामाच्या श्रीगणेशा करण्याचं थोडंसं टेन्शन आलंय.. कॉलेजच्या या तीन वर्षांत मित्रमंडळींसोबत केलेली कट्टय़ावरची धमाल नि प्रोफेसर्सकडून मिळालेलं मार्गदर्शन मिस करणारेय. नुकताच दोन-तीन इंटरव्ह्य़ूज्चा अनुभव मी घेतलाय. त्यात रिजेक्ट झाल्यानं थोडंसं डिसअपॉइण्टेड व्हायला होतं. पण त्यानं खचून न जाता सकारात्मक विचार करून मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे. जॉब करून पुढचं शिक्षणही घ्यायचा विचार आहे. त्या दृष्टीनं माहिती मिळवून त्यावर विचार करणं सुरू आहे. मोठं झाल्याच्या जाणीव झाली आहे. जॉब करण्यासाठी थोडंसं फॅमिली प्रेशरही येतंय. पुढं आपलं करिअर नीट आकाराला येईल का.. अशी हुरहुर वाटते आहे. लवकरच लागणाऱ्या रिझल्टचं टेन्शनही आहेच.

प्रज्ञा राणे,
टीवायबीए, डी. जी. रुपारेल कॉलेज
टीवाय संपलं आणि अचानक मोठं झाल्याची जाणीव झाली. आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. या कॉम्पिटिटिव्ह जगात आपलं एक वेगळं असं स्थान तयार करायचं आहे. टीवायनंतर खऱ्या कसोटीचे दिवस सुरू होणार आहेत. कॉलेजची तीन र्वष खूप धमाल, मजा-मस्ती केली. आयुष्यभरासाठी मित्र-मत्रिणींचा अनमोल ठेवा मिळाला. खूप काही शिकायलाही मिळालं. या सगळ्या धावपळीत तीन र्वष कशी निघून गेली ते समजलंच नाही. कॉलेजमधली मज्जा-मस्ती, तो कट्टा, बंक केलेली लेक्चर्स.. सगळंच आठवेल नंतर.. त्याचबरोबर शिक्षकांकडून जे काही शिकायला मिळालं ते खूपच मोलाचं होतं. टीवायचं वर्ष संपल्यानं आता पूर्वीसारखं फ्रेण्ड्सना भेटता येणार नाही. पण सोशल नेटवर्किंग साईट्स आणि व्हॉटसअ‍ॅपसारख्या माध्यमांमुळं ‘व्हच्र्युअली’ तरी टचमध्ये राहता येईल. आणखी काय सांगू.. खूप मिक्स्ड फीलिंग्ज आहेत.

Story img Loader