‘हाय, फेण्डस्, व्हॉटस् अप..’ अशी दिवसाची सुरुवात होणं नि गुडनाइटच्या मेसेजेसनी रात्र होणं किंवा काही वेळा रात्रीही सतत ऑनलाइन राहाणं आदी गोष्टी कॉमन झाल्यात. यंगस्टर्सनी जणू सोशल साइटस् नि काही अ‍ॅप्सवर अ‍ॅक्टिव्ह असणं मस्ट आहे. तसं केलं नाहीत, तर एक भुवया उंचावलेला आश्चर्यचकित स्माइली तुमच्या पुढय़ात असतोच. चॅटिंग, स्माइलीज, इमोटिकॉन्स, सिम्बॉल्स नि ढेर सारं शेअरिंग हा टेक्नोसॅव्ही पिढीचा फंडा आहे. मात्र परीक्षेच्या काळात किंवा आपण अ‍ॅडिक्ट झाल्याचं भान वेळीच आल्यानं काही जण चक्क गायबव्रत किंवा मौनव्रताचा अंगीकार करतात. अशा अ‍ॅडिक्शनपासून सुटका होण्यासाठीही पुन्हा काही साइट्स-पेजेस डेव्हलप झाली आहेत. तरुणाईला कोणत्या साइट्स नि अ‍ॅप्स आवडताहेत, त्याविषयी त्यांना काय वाटतंय, त्याचा हा कानोसा.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रद्धा करंडे
मला व्हॉटस्अ‍ॅप फार आवडतं. या अ‍ॅपमुळं फोटो, व्हिडीओज, माहिती वगरे शेअर करता येतात. हे अ‍ॅप चॅटिंगसाठी मस्त आहे. एकेकांचे भारी ‘डीपी’ज नि स्टेटस बघायला जाम मज्जा येते. आपल्याला हवे तसे फॅमिली, फ्रेण्डस् असे किती तरी ग्रुप्स तयार होतात. मग आऊटिंग असो किंवा परीक्षेची तयारी असो, त्याचं प्लॅनिंग चांगलं करता येतं. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेले स्माइलीज झकासच आहेत. एकदम फनी नि इंटरेस्टिंग. आपल्याला जे वाटतंय ते इझिली व्यक्त करता येतं ते या स्माइलीजमुळं. मी कायमच ऑनलाइन असते नि कॉलेजमध्ये कट्टय़ावर बसून जी धम्माल केली जाते, त्याचा फील या ई-कट्टय़ावर येतो. या अ‍ॅपचा पॉझिटिव्हनेस लक्षात घेऊन ते वापरलं तर तुम्ही कायमच हॅपी फील कराल.  

कृतिका नातू
मी एमएस्सी करत असल्यानं नेटवर बसायला मला सध्या फारसा वेळ मिळत नाहीये. आधी ऑर्कुट नि मग फेसबुकची क्रेझ आली, पण आता वेळ नसल्यानं फेसबुकवर मी फारशी अ‍ॅक्टिव्ह नाहीये, पण सवडीनं ऑनलाइन असल्यावर फ्रेण्ड्सशी गप्पाटप्पा मारता येतात. जुन्या फ्रेण्ड्सशी नव्यानं कॉन्टॅक्ट होतो. सगळ्यांचे अपडेट्स कळतात. नेहमी प्रत्यक्षात भेटता येत नसलं तरी व्हच्र्युअल भेटी होतात. सध्या व्हॉटस् अ‍ॅपवर मी जास्त अ‍ॅक्टिव्ह आहे. फास्टर कम्युनिकेशनसाठी ते खूप छान आहे. शॉिपगपासून ते अभ्यासापर्यंत, पिक्चर्सपासून ते ऑडिओजपर्यंत सगळ्या गोष्टी शेअर करायला व्हेरी इझी आहे. या माध्यमांच्या साहाय्यानं संवाद साधता येतो. मात्र प्रत्यक्ष भेटीत माणूस अधिक कळू शकतो. त्यामुळे हा संवाद साधताना थोडी काळजी प्रत्येकानं घ्यावी, इतकंच. सो, हॅव फन अँण्ड गुड कम्युनिकेशन..

प्रथमेश खानोलकर
मी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करतोय. सध्या फक्त अभ्यास एके अभ्यास हेच ध्येय ठेवलंय. त्यामुळं एके काळी ज्या व्हॉटस् अ‍ॅपवाचून माझं पान हलत नव्हतं, ते आता पूर्णपणं बंद केलंय. फेसबुकचं अकाऊंट बंद केलं नसलं तरी त्यावर अ‍ॅक्टिव्ह नाहीये. या अ‍ॅप्लिकेशन्स नि साइटवर एकदा गेलं की खूप वेळ जातो. आता तो वेळही अभ्यासाला देतोय. मन शांत झाल्यानं अभ्यासावर लक्ष एकाग्र करता येतंय. सध्या मित्रांना कॉन्टॅक्ट करायचा झाल्यास त्याला सरळ कॉलच करतो. या माध्यमांचा उपयोग मत्री करण्यासाठी नि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी होतो, हे अगदी खरं; पण त्या अभिव्यक्तीचा अतिरेकीपणा टाळायलाच हवा. आपलीच आपण एक मर्यादा घालून घ्यावी. त्यामुळं काही चुकल्यासारखं वगरे वाटत नाही. फील जस्ट.. .   

ईशान रेगे
सोशल साइट्सपकी फेसबुक हे वापरायला सोपं नि फ्रीडम असलेलं माध्यम. फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवणं, नको त्याला ब्लॉक करणं, गेम्स खेळणं नि काही वेळी फ्रेण्ड्ससोबत चिक्कार टीपी करत एकमेकांची खेचणं अशा किती तरी गोष्टींसाठी फेसबुकसारखी सोयीची जागा नाही. या मजेमजेत कुणी चिडून अनफ्रेण्ड केलं तर मग कॉलेजमध्ये आल्यावर त्याची धुलाई होते. अर्थात तीही मजेतच असते. ‘एफबी’वर इव्हेंटच्या टीमपासून ते कॉलेजमधल्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटिजना कनेक्ट करणारे अनेक ग्रुप्स झालेत. प्रोफेसर्सपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचे ग्रुप झालेत. त्यातून नोट्सपासून ते महत्त्वाच्या प्रश्नांपर्यंतचं शेअरिंग होतंय. साइट असो किंवा अ‍ॅपचा फायदा होतो, तसाच त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो, हे लक्षात ठेवून शेअिरग करावं, कारण काही वेळा या माध्यमांमुळं नव्या ओळखी वाढल्या तशाच जुन्या नात्यांमध्ये कटुता आली, असे प्रसंग अनेकांबाबत घडलेत, पुढंही घडू शकतात. सो, बी केअरफुल आणि हॅपिली एक्स्प्रेस द िथग्ज..

अद्वेत आगाशे
आजच्या घडीला एकदम फेमस नेटवìकग साइट ठरलेलं फेसबुक मी आवडीनं वापरतो. त्यामुळं मी फ्रेण्ड्ससोबत कनेक्टेड राहतो. चॅट करणं, आऊटिंगचे प्लॅन्स करणं वगरे गोष्टी सतत चालू असतात. फेसबुकमुळं कॉन्टॅक्टमध्ये नसलेल्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करता आला. त्यावर पिक्चर शेअरिंग नि चॅटिंग करता येतं. कोणत्याही विषयावर आपलं मत मांडता येतं. बर्थडेज लक्षात ठेवावे लागत नाहीत. फेसबुकवर आपल्या आवडीनुसार आपला ग्रुप बनवता येतो. आपल्या आवडत्या अ‍ॅक्टर-स्पोर्टपर्सनला फॉलो करता येतं. नाण्याला दोन बाजू असतात, तशाच या सोशल साइट्सनाही दोन बाजू आहेत. कधी कधी केवळ व्हच्र्युअल चॅटिंगपेक्षा मला प्रत्यक्षात भेटून गप्पा रंगवायला आवडतात. काही जण या मीडियाचे एवढे अ‍ॅडिक्ट होतात की, समोरची व्यक्ती संवाद साधायचा प्रयत्न करत असूनही यांची नजर स्क्रीनवरून हटतच नाही. काही वेळा या माध्यमाचा वापर समाजविघातक वृत्तींकडून कधी बोगस अकाऊंट उघडून केला जातो नि मग या साइट्स सिक्युअर नाहीत, हे समोर येतं. त्यामुळं सोशल साइटस् नि अ‍ॅप्स काळजीपूर्वक वापरायला हवीत. हे पथ्यं पाळा नि मग डोण्ट वरी, बी ..

हेमांगी मातोंडकर
बऱ्याच साइट्सवर माझी अकाऊंट्स आहेत नि खूप सारी अ‍ॅप्लिकेशन्स मी वापरते. त्यापकी फेसबुकच्या साइटवर मला जुने फ्रेण्ड्स भेटले नि काही नव्यानं ओळखी झाल्या. किती तरी नातलगांशी कॉन्टॅक्ट करता आला. आता व्हॉट्स अ‍ॅप आलंय. त्याचा खूपच फायदा होतोय. केवळ फोटोज, मेसेजेस किंवा ऑडिओ- व्हिडीओज एवढय़ापुरतं ते मर्यादित राहिलेलं नाहीये, तर एखाद्या अडीअडचणीच्या प्रसंगीही व्हॉट्स अ‍ॅपवरून पटकन कॉन्टॅक्ट करता येतो. काही वेळा स्टेट्स अपडेट करणं, डीपीज बदलणं वगरे गोष्टी केल्या जातात, पण हे सततचे अपडेट्स एका लिमिटपर्यंत ठीक वाटतात. नाही तर मग ते अति व्हायला लागतं. उगीच शोऑफ केला जातोय की काय, असं वाटू लागतं. म्हणूनच ते टाळलेलं बरं. बी हॅपी नि कनेक्टेड सगळ्यांशी.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.