भारतीय स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या मंडे टू सॅटर्डे डिझाइन साडीमध्ये खूप खुलून दिसते. लावण्याची ती जणू खाणच भासते, अशी वर्णने आपण ऐकतो आणि ती खरीच आहेत, असे निदान त्या लावण्यवतींना पाहताना जाणवते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ही स्त्री अधिक सुंदर दिसावी, यासाठी वेगवेगळ्या रंगांची तसेच आधुनिक डिझाइन असलेल्या साडय़ा या तरुण वर्गाला विशेष आकर्षति करत असतात. वेगवेगळ्या वेळेनुसार रंगांचे शास्त्र हे तिच्या रूपात विशेष भर टाकत असते. केवळ घरात नव्हे तर कार्यालयात काम करणारी ही महिला अथवा युवती साडीत अधिक सुंदर दिसते, हे नाकारता येत नाही.
मंडे टू सॅटर्डे डिझाइन साडीचे सहा प्रकार आहेत. यात पूर्ण लांबीची ६.३ मीटरची साडी, त्याच्यावर प्रिंट्रेड ब्लाऊज, उत्तम दर्जाचे सूत, रंगांमधील विशेषता तसेच मशीनमध्ये धुता येतील, असे सूत यामुळे या साडय़ा लोकप्रिय ठरत आहेत. सहा प्रकारांमध्ये असलेल्या साडय़ा या वेगवेगळ्या रंगातील आहेत.
निळ्या रंगाची साडी ही डोळ्याला मनमोहक भासते. साधा लुक असला तरी त्याच्यातील गोडवा हा एका भारतीय नारीला तिच्या आधुनिकतेची सांगड घालत त्यांच्यातील सौंदर्याला वेगळे परिमाण देत असतो.
या साडय़ा खास दिवसांसाठी आहेत. गुलाबी रंग हा सदैव प्रेमाचा एक गोडवा आपल्या प्रियजनांसाठी निर्माण करत असतो. या साडीचा रंग भडक असल्यामुळे लगेच नजरेत भरतो आणि मनाला आनंद देतो. उन्हाळ्यात त्यातून सौंदर्य अधिक खुलून दिसते.
पिवळा रंग हा साडीला वेगळाच लुक देतो. उन्हाळ्यात वापरता येणारी ही साडी असून त्याचा लुकदेखील समर लुकसारखा आहे. ही एव्हरग्रीन साडी असून त्याच्यावर दागिन्याचा साज शोभून दिसतो. त्याच्यावरील वेगवेगळ्या रंगाच्या डिझाइनमुळे वेगवेगळ्या कारणास्तव ही साडी उपयोगात आणता येते. सोमवार ते शनिवार साडय़ामध्ये हे एक वेगळेपण आहे.
लाल ब्लाऊज, पांढरा रंग व विविध रंगांची ही साडी कुठल्याही कामासाठी जाताना उपयोगात आणता येते. ही साडी लुकमध्ये अनोखा बदल घडवून आणते. उन्हाळ्यात त्यातून सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यावर मॅचिंग दागिने घातल्याने तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल.
काळ्या साडीवर बंधिनी दागिने घालणे केव्हाही बेस्ट.. साडीचा काळा रंगदेखील व्यक्तिमत्त्व अधिक खुलवतो. त्याच्यावर स्ट्रीप घालून ऑफिसमध्ये वावरताना अधिक मोकळेपणा आणि आकर्षकपणादेखील दिसून येतो. पार्टी तसेच महत्त्वाचे समारंभ असताना अनेकदा हिरवा रंग तसेच त्याच्यावरील वेगवेगळ्या रंगांची उधळण असलेल्या रंगछटांच्या साडय़ा हादेखील रूपात अधिक सुंदर दिसतो. त्यामुळे या वैविध्यपूर्ण साडय़ा हा एक आकर्षक प्रकार आहे. सोमवार ते शनिवार अशी या साडय़ांची वैशिष्टय़े नक्कीच असून त्याचे परिधान करणे, हे महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक शोभादायक आहे.
वॉर्डरोब आणि डिझाइनर साडी
भारतीय स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या मंडे टू सॅटर्डे डिझाइन साडीमध्ये खूप खुलून दिसते. लावण्याची ती जणू खाणच भासते, अशी वर्णने आपण ऐकतो आणि ती खरीच आहेत, असे निदान त्या लावण्यवतींना पाहताना जाणवते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ही स्त्री अधिक सुंदर दिसावी, यासाठी वेगवेगळ्या रंगांची तसेच आधुनिक डिझाइन असलेल्या साडय़ा या तरुण वर्गाला विशेष आकर्षति करत असतात.
First published on: 31-05-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardrobe and designer sarees