एखाद्या सुंदर, आवडलेल्या व्यक्तीकडे ती नजरेआड होईपर्यंत बघत राहणं याला कॅज्युअल स्टॉकिंग म्हणतात आणि ही नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. आभासी जगातही असं कॅज्युअल स्टॉकिंग चालतं.. दुसऱ्याला कळणारही नाही या बेतानं. आपल्याला आवडलेल्या व्यक्तीचं सोशल मीडियावरचं प्रोफाइल चेक करत राहणं, त्याचे /तिचे अपडेट्स बघत राहणं (कमेंट्स, लाइक न करता) हा कॅज्युअल स्टॉकिंगचा भाग आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्याने अॅडमिशन जरा उशिराच घेतली होती. त्यामुळे कॉलेजमधल्या त्याच्या वर्गातल्या मुलामुलींच्या आधीच एकमेकांशी ओळखी झालेल्या होत्या. पहिल्या दिवशी वर्गात जाताना त्याला थोडं वेगळं वाटत होतं. पण त्याने वर्गात पाऊल टाकलं मात्र.. सगळ्यांच्या माना आपसूक त्याच्याकडे वळल्या. केवळ मुलीच नव्हे तर अगदी मुलंसुद्धा त्याच्याकडे एकटक बघत होती. तो होताच तसा.. बघताक्षणी कोणालाही आवडावा असा ! इन केलेला आणि स्लीव्हज हाफ -फोल्ड केलेला सेमी-फॉर्मल शर्ट, स्पोर्ट शूज, फ्रेंच बिअर्ड आणि डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर टाकत तो आत आला.. बास! त्या दिवशी लेक्चरऐवजी मुली त्याच्याकडेच बघत होत्या. दुसऱ्या दिवशीपासून लेक्चर्सना मुलींची उपस्थिती वाढली. वर्गात आलेल्या नवीन आणि ‘हँडसम’ मुलाबद्दल ‘हू इज दॅट गाय’ म्हणत मुलींनी माहिती काढायला सुरुवात केली. अख्ख्या कॉलेजभर त्याचीच हवा होती आणि येता—जाता प्रत्येक मुलगी ‘हाय मैं मर जावा’ नजरेने तो दृष्टीआड होईपर्यंत त्याच्याकडे पाहत होती. हे त्याला कळत होतं, तो एन्जॉयही करत होता आणि भावही तितकाच खात होता..
ही कुठल्या सिनेमाच्या गोष्टीचा भाग नाही आणि ही गोष्ट आता दुर्मिळही राहिलेली नाही. नाक्यावर उभं राहून मुलींकडे बघणं ही पूर्वी केवळ मुलांची मक्तेदारी होती. मुली अशा गँगसमोरून जाताना खालमानेनं जायच्या. आता उलट चित्रही बघायला मिळतं. यातला चांगला-वाईट भाग सोडला, तरी या प्रकारच्या वर्तनाला हल्ली ‘कॅज्युअल स्टॉकिंग’ म्हटलं जातं आणि या कॅज्युअल स्टॉकिंग करणाऱ्यांमध्येही मुलीही मागे नाहीत. यातला कॅज्युअल हा शब्द महत्त्वाचा. कारण या शब्दामुळेच हे करणारा गुन्हेगार ठरत नाही, तर कॉलेजमधल्या गमतीचा तो एक भाग ठरतो. एखादीचा किंवा एखाद्याचा त्याला आवडत नसेल तरीही पाठलाग करत राहणं, अचकट विचकट काहीतरी बडबडणं, अश्लीलतेकडे झुकणारं वर्तन करणं याला छेडछाड म्हणतात.. इव्ह टीजिंग म्हणतात आणि तो गंभीर गुन्हा आहे.
एखाद्या पार्टीत, कॉलेजमध्ये, समारंभात इतकंच नव्हे तर मॉलमध्ये, थिएटरमध्ये, प्लॅटफॉर्मवर सहज बघून आवडलेल्या मुला—मुलीला नजरेनं फॉलो करणं, अर्थात ‘कॅज्युअल स्टॉकिंग’, हा एक ट्रेण्ड झालेला आहे. रस्त्याने येता—जाता आवडलेली व्यक्ती नजरेआड होईपर्यंत केवळ नजरेने तिला फॉलो करणं, म्हणजे स्टॉकिंग. पण याच स्टॉकिंगचा जर समोरच्या व्यक्तीला त्रास व्हायला लागला तर मात्र तो गुन्हा ठरतो. याच्याही पुढे जाऊन आवडलेल्या व्यक्तीची सोशल मिडिया प्रोफाइल शोधणं आणि ती प्रोफाइल फॉलो करणं हे झालं व्हर्चुअल स्टॉकिंग. त्यांचे फोटो लाईक करणं, त्यावर कमेंट करणं, त्याला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवणं असं काहीही न करता फक्त त्याची प्रोफाईल चेक करत राहणं म्हणजे व्हर्चुअल जगातलं कॅज्युअल स्टॉकिंग. याचाही कोणाला त्रास झाला किंवा मुद्दाम दिला गेला तर मात्र तो ‘सायबर क्राइम’ ठरतो.
व्हच्र्युअल जगात फेसबुकादी सोशल साईट्सवर ठरावीक सेटिंग केलं की, आपण केलेली प्रोफाइल व्हिजिट गुप्त राहते. पण असं कॅज्युअल स्टॉकिंग केलेलं त्या व्यक्तीला आता वेगवेगळ्या अॅप्समुळे समजूही शकतं. ही अॅप्स कोण वापरतंय हे कळायला मार्ग नाही. पण कधीकधी त्या व्यक्तीलाही आपण करत असलेलं कॅज्युअल स्टॉकिंग आवडतं आणि ती एखादी छान स्माईल देऊन ती व्यक्ती निघून जाते. त्यावेळी मात्र श्रद्धा कपूरच्या जाहिरातीतलं दृश्य आणि बॅकग्राउंडचं जुनं गाणं आठवतं.. बेकरार कर के हमें यू न जाइए.. आपको हमारी कसम लौट आइए!
व्हर्च्युअल स्टॉकिंग
आपल्याला आवडलेल्या माणसाला सोशल मीडियावर त्याला समजणार नाही अशा पद्धतीनं फॉलो करता येतं. फॉलो करणं म्हणजे त्यानं/तिनं टाकलेले अपडेट्स पाहणं, फोटो पाहणं, कमेंट्स पाहणं इत्यादी. . हे एक प्रकारचं ‘व्हर्च्युअल स्टॉकिंग’च आहे. हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपण स्टॉकिंग करत असलेल्या व्यक्तीला हे सहज समजू शकेल अशी सोयही सोशल मीडियाने करून दिली आहे. आपली फेसबुक प्रोफाइल स्टॉक करणारे किती आहेत, कोण आहेत ते सांगणारी अॅप्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे स्टॉक करताना जरा ‘बचके रहना’..
आपली प्रोफाईल कोण स्टॉक करतं याबद्दलचा डेटा देणारी ही काही अॅप्स :
1. Profile stalkers for FaceBook
2. Who viewed me on FBook
3. Profile visitors Facebook
4. Who checks my profile
5. Who viewed my Facebook