आपल्या भारतात शिंगाडय़ाचा उपयोग उपवासाच्या दिवशी फार मोठय़ा प्रमाणात होतो. पाण्यात होणाऱ्या फळांमध्ये शिंगाडा मुख्य फळ समजले जाते. शिंगाडय़ाची वेल पाण्यावर तरंगत राहते. कारल्याच्या पानांप्रमाणे याची पाने त्रिकोणाकार असतात. काश्मीरमधील तलावात िशगाडय़ाचे वेल मोठय़ा प्रमाणावर होतात. शिंगाडय़ाची फळे त्रिकोणाकार असतात. या फळांवर काटय़ाप्रमाणे तीन टोके असतात. त्याच्या या शिंगांसारख्या टोकांवरूनच या फळांना ‘शिंगाडा’ हे नाव पडले असावे. शिंगाडय़ाची फळे प्रथम पाण्यात उकळून नंतर विस्तवात भाजून त्यांची टरफले काढून टाकण्यात येतात. दुधापेक्षा िशगाडय़ात २२ टक्के खनीज क्षार जास्त असतात. शिंगाडे अत्यंत पौष्टिक व पचायला थोडे जड असतात. िशगाडे आतून पांढऱ्या रंगाचे असतात. फलाहारात त्याची गणना होते. तरीही शिंगाडे सुकवून त्याचे पीठ करण्यात येते. त्या पिठापासून पुऱ्या, दशम्या, लाडू, शिरा, कढी व इतर अनेक पदार्थ बनवले जातात. िशगाडय़ाच्या पिठाची खीर खूपच स्वादिष्ट बनते व िशगाडय़ाची भाजीही केली जाते. सुकलेल्या िशगाडय़ाचे पीठही पचण्यास हलके व आजारी माणसांनाही मानवणारे असते. शिंगाडे मांसवर्धक असल्याने दुर्बल व शक्तिहीन झालेल्या लोकांसाठी ती अत्यंत उपयुक्त असतात. जेवणात त्यांचा उपयोग सढळपणे केल्यास शरीराला पुरेसे पोषण मिळते. िशगाडय़ांमुळे शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात व शरीराची झीज होण्याचे बंद होते. शास्त्रीय मताप्रमाणे, िशगाडय़ात प्रोटीन, चरबी, काबरेहायड्रेट, फॉस्फरस, चुना, खनिज घटक, लोह, जीवनसत्त्व ‘ए’, स्टार्च व मँगेनीजचे प्रमाणे पुष्कळ असते. शिंगाडय़ापासून तयार होणाऱ्या रेसिपीज्..
विष्णूज् मेन्यू कार्ड : शिंगाड्याची गोष्ट
सध्या बाजारात काही ठिकाणी ओले शिंगाडे दिसू लागले आहेत. शिंगाडय़ाचा समावेश फलाहारात होत असला तरी आपल्याकडे शिंगाडय़ाचे पीठ करून त्यापासून जास्त पदार्थ केले जातात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-12-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water nut food recipes