आजची तरुण पिढी उपास करते का? आणि केला तर कोणत्या कारणासाठी करते, हे जाणून घ्यायचा प्रयत्न व्हिवानं केला. रोजचं जेवून कंटाळा आला म्हणून, घरातले सगळेच करतात म्हणून उपास करणारे जास्त. डाएटच्या दृष्टीनं बरं असतं उपास करणं,असंही काहींनी सांगितलं. उपासाबद्दल तरुण पिढीला काय वाटतं, ते त्यांच्याच शब्दात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तरा करजगार
(इव्हेंट मॅनेजमेंट स्टुडंट)
मी उपास करते. पण धार्मिक किंवा डाएटिंगचासुद्धा त्यामागे हेतू नसतो. रोजचं वरण – भात, भाजी, पोळी जेवून कंटाळा येतो. त्यापेक्षा काही वेगळं खायची संधी मिळते म्हणून मी उपास करते. आषाढीच्या दिवशी घरात सगळ्यांचाच उपास असतो. त्यामुळे मलाही आपसुकच उपास घडतो. फिगर मेंटेन करण्यासाठी उपास करणं मला पटत नाही आणि मी तसं करतही नाही.

प्राजक्ता भिडे
(बीए स्टुडंट) –
सगळ्याच संस्कृतींमध्ये उपासाची संकल्पना आहे त्यामागचं लॉजिक शरीर तंदुरुस्त राखणं हेच असावं, असं मला वाटतं. उपास करण्यात मला गैर काहीच वाटत नाही. पण आजकाल चुकीच्या पद्धतीनं उपासाच्या नावाखाली डाएटिंग केलं जातं, ते मला पटत नाही. वजन कमी करण्यासाठी मी उपास करत नाही. तर आवश्यक आहाक घेऊन जीमला जाते. वर्कआऊट करते. फिटनेससाठी उपासापेक्षा व्यायामच योग्य आहे, असं मला वाटतं.

कौशल रेडे
(इंजिनिअरिंग स्टुडंट)
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्री असे वर्षांतले तीन उपास मी दरवर्षी न चुकता करतो. त्यात धार्मिकतेचा भाग आहेच. या तीन उपवासांव्यतिरिक्त आठवडय़ातले एक – दोन दिवस मी स्वतच ठरवतो आणि त्या दिवशी फक्त नाश्ता करतो. मग दिवसभर काही खआत नाही.  त्यामुळे सततच्या अरबट चरबट पेटपुजेलाही आराम मिळतो. उपास नसतानाही एक दिवस मुद्दाम प्लॅन करून जेवणापासून सुट्टी घेण्यात मला गंमत वाटते आणि त्याचा मला खरंच खूप फायदा होतो.

अपूर्वा भालेकर
(आर्किटेक्चर स्टुडंट)
मी संकष्टीचा उपास करते. मी आर्किटेक्चरला आहे. आमचं श्रेत्रच धावपळीचं आहे. त्यात माझंही शेडय़ूल तसंच धावपळीचं आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्या नादात ठरलेल्या वेळेला खायला वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे आपोआप एक प्रकारचा उपवासच घडतो. मी माझ्या आरोग्याच्या बाबतीत खूप सतर्क आहे. पण डाएटिंगसाठी उपास करत नाही. माझ्या डाएटिशियननं मला आहाराचं वेळापत्रक दिलंय. ते पाळण्याचा मी प्रयत्न करते.

अंचिता फडणीस –
(मेडिकल स्टुडंट)
मी धामिक कारणासाठी उपास करत नाही. मेडिकलची विद्यार्थिनी असल्यामुळे कामाचा प्रचंड ताण असतो. दिवसभर एनर्जी राहावी म्हणून आवश्यक आहार घेणं गरजेचं असतं. कधी कधी नाईलाजानं जंक फूड खाल्ल जातं. असं जास्त वेला खाल्ल गेलं, तर मग मी आठवडय़ातून एक दिवस ठरवून त्या दिवशी फक्त फळं खाते. उपासाच्या दिवशी केले जातात ते पदार्थ खूप तेलकट तूपकट असतात. मी ते खात नाही. आठवडय़ातून एक दिवस खाण्यापासून ब्रेक घेतला तरी पूर्ण उपाशी मी कधीच राहात नाही.

मिनोती प्रधान
(बीए स्टुडंट)
मी ठरवून उपास करत नाही. मला वाटतं, ज्या वेळी भूक लागेल त्या वेळेस खाल्लच पाहिजे. घरी सगळ्यांचा उपास असेल तेव्हा माझाही उपास घडतोच. मी त्या दिवशीचे उपासाचे पदार्थ तेलकट असतील ते खात नाही. त्याऐवजी फळं, गूळ- शेंगदाणे असे पौष्टिक पदार्थ खाते. मला वाटतं, रोजचं बॅलन्स्ड डाएट असेल तर वेगळा उपास करण्याची गरजच पडणार नाही.

रुमीन इनामदार
(मेडिकल स्टुडंट)
आता रमजानचा महिना सुरू झालाय. त्यामुळे माझ्या घरात सगळ्यांचेच उपास आहेत. घरातलं वातावरण धार्मिक आङे. त्यामुळे त्याच भावनेनं उपास केला जातो.  रमजानचे उपास खूप कडक असतात. परंतु लहानपणापासून मी हे उपास करत आले आहे. त्यामुळे कडक असले तरी या उपासांची मला सवय आहे.

मधुरा जोशी
(डाएट अँड न्यूट्रिशन स्टुडंट)
मला वाटतं, उपास आणि डाएटिंग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरेच लोक डाएटिंगसाठी उपास करतात. परंतु उपास करण्याचा आणि वजन कमी होण्याचा काही संबंध नाही. उलट त्यामुळे शरिरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. मला उपास करणं ही संकल्पना मुळात पटत नाही.

गायत्री लेले
(पॉलिटिकल सायन्स स्टुडंट)
आमच्या घरातलं वातावरण फार धार्मिक नाही आणि उपास करणं माझ्या तब्येतीला मानवत नाहीत त्यामुळे मी उपास जनरली करत नाही. डाएटिंगसाठी तर उपास करणं मला झेपणारच नाही. मी नियमित आणि पोषक आहार घेण्याला मान्यता देते.