फॅशनविषयक डूज अॅण्ड डोण्ट्स एव्हाना साऱ्यांचे पाठ झाले असतील. आपली चण, वर्ण, बॉडीटाइप याला सूट होणारं काही निवडताना नेहमी त्याच त्याच प्रकारचे कपडे खरेदी केले जातात. त्या सूट होणाऱ्या कपडय़ांमध्ये आपण छान दिसतो हे खरं. पण वॉर्डरोबमधल्या वैविध्याचं काय? त्यासाठी फॅशनचा सेफझोन तोडून थोडे वेगळे प्रयोग केले पाहिजेत.
‘तुम्ही ओव्हरवेट असाल, तर आडव्या स्ट्रइप्सचे कपडे घालू नका, जाडे दिसाल’, ‘स्कीनटोन डार्क असेल तर ब्राईट रंग वापरू नका’, ‘अतिबारीक असाल तर फिटेड ड्रेस घालू नका’… कोणत्याही फॅशन मासिकात, फॅशन वेबसाईटवर किंवा वृत्तपत्रातला एखादा फॅशनविषयक कॉलम पाहा, त्यात ही ‘डूज अँड डोण्ट्स’ची यादी असतेच. त्यात नकारार्थी सूचना अधिक असतात. त्यामुळे खरेदीला जाताना आपण आपल्या वर्णाचा, शरीरयष्टीचा, उंची- वजन आणि चणीचा-ठेवणीचा वाजवीपेक्षा जास्त विचार करत बसतो. याचा परिणाम काय तर तुमचा चॉइस लिमिडेट राहतो आणि वॉडरोबमध्ये चार बेसिक जीन्स, लेगिंग्स, एकाच पॅटर्नचे कुर्ते आणि टॉप्स यापलीकडे वेगळेपण काही राहात नाही. सलवार सूट आणि साडय़ांना आपल्याकडे हे नियम लागू नसतात, त्यामुळे

वॉडरोबमधली त्यांची ठेवणीतली जागा मात्र ठरलेली असते. हीच बाब शूज, बॅग्स, दागिन्यांची सुद्धा!
लहान मुलांची एक सवय असते, ‘हे करू नका’ असं त्यांना विचारलं की, ते पहिल्यांदा ‘का?’ विचारतात. कारण पटेपर्यंत एकदातरी ती गोष्ट करतातच. लहान मुलांचा हा हट्टीपणा (की कुतूहल ?) मोठेपणी मात्र मागे पडतो आणि आपण तडजोडी करायला लागतो. पण तुमच्या वॉडरोबच्या बाबतीत मात्र हा हट्टीपणा करायला पूर्ण वाव आहे. फार तर काय, काही कपडय़ांच्या बाबतीत निर्णय चुकतील. पण एखाद्या वेगळ्या चॉइसनं एकंदर लुकला चार चांद लागतील. त्यामुळे चला.. यावेळी फॅशनचे सेफझोन तोडून थोडे प्रयोग कसे करायचे ते बघू या.
बॉडीटाईप आणि ड्रेसिंग

सुरवात होते ती.. अमूक शरीरयष्टीला हे सूट होणार ‘नाही’ ला ‘का?’ हा प्रश्न विचारून. बहुतेकदा ठरावीक कपडे, रंग, पॅटर्न योग्य पद्धतीने घातले नाही, की त्याचं फिटिंग चुकतं. अर्थात हे नियम प्रत्येकाबाबत वेगवेगळे असतात. पण फॅशन कॉलम्समध्ये इतकं सविस्तर लिहण्याची मुभा नसते. त्यामुळे काही सार्वत्रिक नियम दिले जातात. उदाहरण घ्यायचंच झालं तर, हेवी वेट मुलींनी आडव्या पट्टय़ांचे कपडे घालू नये, असं म्हटलं जातं. हे चुकीचं नाही. कारण आडवे पट्टे शरीराला ब्रॉडनेस देतात. तो दृष्टीभ्रम असतो. पण त्यामुळे तुम्ही जाडे दिसतात. हा नियम पळताना तुम्ही पेअरशेप आहात की अॅपलशेप ते बघा. अॅपलशेपमध्ये खांदे रुंद असतात, पोटाला घेरी आणि कमरेत जास्त वजन असतं. अशावेळी तुम्ही आडव्या पट्टय़ांचे टॉप्स घालू नका. त्यातही बारीक पट्टे चालतील, पण मोठे पट्टे टाळा. पण तुमची आडव्या पट्टय़ांचा स्कर्ट, वन पीस ड्रेस नक्कीच घालू शकता. याच्या विरुद्ध पेअरशेपमध्ये आडव्या पट्टय़ांचे टॉप्स घालता येतील, पण बॉटमवेअर नाही. उंची कमी असेल तर मोठय़ा बॉर्डरच्या साडय़ा, ड्रेस वापरता येत नाही, असा आपल्याकडे समज आहे. सध्याच्या मोठय़ा बॉर्डरच्या साडय़ांच्या ट्रेंडमध्ये बऱ्याच मुलींची यामुळे पंचाईत होते. या जाड बॉर्डर्समुळे उंची कमी दिसते, हे खरं आहे. पण मोठय़ोबॉर्डरची साडी आवडली, तर किमान साडीचा रंग सटल असेल असं बघा. त्यात नाजूक एम्ब्रॉयडरी, छोटे प्रिंट्स हवे. मग मात्र ही समस्या जाणवणार नाही. उंची कमी असेल तर लांब मॅक्सी ड्रेस, स्कर्टसारखे प्रकार पण टाळले जातात. पण लांब ड्रेसऐवजी काफ लेन्थ, मिड थाय लेन्थ असे मध्येच कट होणारे ड्रेस वापरणे टाळा. वापरायचे असल्यास हिल्ससोबत पेअर करा. बारीक असाल तर उभे पट्टे वज्र्य म्हणतात. पण उभ्या पट्टय़ांच्या पलॅझो पॅण्ट, ओव्हरसाईज टी—शर्टने शरीराला भरीवपणा मिळतो. मग ते का टाळा?

रंग
कोणता रंग कोणी घालावा, याचे कित्येक ठोकताळे बांधले गेले आहेत. पण तुमच्या स्कीनटोन, बॉडीस्ट्रक्चरवर कोणता रंग साजेसा दिसतो आणि मुख्य म्हणजे तो कसा वापरा पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. रुंद खांदे असल्यास ब्राइट रंगाचा बंद गळ्याचा टय़ुनिक टाळा. पण तेच ब्रॉड नेकचा वन पीस ड्रेस छान दिसेल. पाय किंवा पोट ज्या भागात ओव्हरवेट असेल तिथे ब्राइट रंग, बोल्ड प्रिंट, हेवी एम्ब्रोयडरी नको. त्यामुळे शरीराचा जाडेपणा अधोरेखित होतो. अर्थात लेअरिंग करून त्यावरचा फोकस कमी करता येतोच. अगदी आतापर्यंत मुलींचा रंग असलेल्या गुलाबी रंगाने आता पुरुषांच्या वॉडरोबमध्ये जागा पटकावली आहे. त्यामुळे आता एखाद्या रंगामुळे अडून बसायचं कारणच नाही.

शूज
हिल्स घालताना ही नकारघंटा अधिकच वाजते. फक्त कमी उंची असेल तरच नाही, तर उंच मुलींना सुद्धा याचा सामना करावा लागतो. ‘तू उंच आहेस, मग अजून हिल्स का?’ हा प्रश्न त्यांनाही विचारतात. पण तुम्हाला जास्त हिल्स घालायचे असतील तर नक्कीच घाला, त्यासाठी या प्रश्नाची चिंता करायची गरज नाही. आपल्या शरीरच पूर्ण वजन पायाच्या तळव्यांवर येत, त्यामुळे ओव्हरवेट असाल तर पेन्सिल हिल्स घालता येत नाही. (तसं हिल्स न वापरणं योग्यच.) पण म्हणून सर्वच हिल्सचे पर्याय संपले असं नाही. वेजेस, कीटन हिल्स वापरा. ते वेट बॅलन्स करतात. तळव्यांचा आकार मोठा आणि पसरट असेल, तर ओपन चप्पल घालता येत नाहीत. अशावेळी किंचित फ्लॅट हिल्सच्या चप्पला वापरा. हिल्समुळे त्या पसरत नाहीत आणि तळव्यांचा आकार बिघडत नाही.

दागिने
शॉर्ट हेअरस्टाईलसोबत लांब झुमके, मोठे स्टेटमेंट पीस शोभून दिसत नाहीत, अशी समजूत होती. झुमके घालणार असाल, तर नेकलाईन सिंपल असू दे. जेणेकरून लुकमध्ये समतोल साधला जाईल. मोठा नेकपीस घालायचा असल्यास कानातले छोटे ठेवा, म्हणजे हाच परिणाम साधता येईल.
कपडय़ांची नवीन स्टाइल ट्राय करताना अडचणी, संकोच, भीती वाटणे सहाजिकचआहे. पण थोडसं धाडस दाखवून आपणही ठरविलेल्या चाकोऱ्या मोडू शकतो. फक्त ‘का?’ विचारणं सोडू नका.. ल्ल

१. उभ्या आणि आडव्या पटय़ांच्या प्रिंट्सचे योग्य मिक्स मॅच कॉम्बिनेशन केले की तुमच्या बॉडीटाईपला साजेसे दिसतात.
२, ३. ड्रेसला आडव्या किंवा उभ्या रेषेत विभाजन केल्यास तुम्हाला जादाचे वेट लपवता येते.
४, ५. हेवी वेट मुली बहुतेकदा सेफ ड्रेसिंगच्या नादात ढगाळ, डल लूकचे कपडे घालतात. पण योग्य स्टायलिंग केल्यास ब्राईट, सटल रंगसुद्धा छान दिसतात.

Story img Loader