जुन्यातून नवीन, टाकाऊतून टिकाऊ अर्थात अपसायकलिंग करणे ही कला आहे. जुने कपडे घेऊन भांडी देणाऱ्या बोहारणी दिसेनाशा झाल्यावर आता ही कला आत्मसात करण्याला पर्याय नाही. जुन्या कपडय़ांपासून होम मेड डिझायनर वेअर बनवता येईल. कसं?

फार पूर्वीची गोष्ट नाही, पण नव्याने वसल्या जाणाऱ्या मुंबईत कधीकाळी दारावर बोहारीण यायची. जुन्या साडय़ा, शर्ट, कपडे यांच्या बदल्यात वाटी, चमचा अशी भांडी द्यायची. त्याकाळी आणि अजूनही गावांमध्ये आणि शहरातही कित्येक घरांमध्ये जुने कपडे गोधडी, पिशव्या शिवायला वापरले जातात. जुने कपडे होळीसाठी आणि नंतर थेट पायपुसणं करण्यासाठी. दिव्याची काजळीदेखील वापरायच्या भारतीय वृत्तीवर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर विनोदही फिरतात. पण आता तीच वृत्ती जगाला तारायला सगळ्यांना हवीहवीशी वाटू लागली आहे. सगळ्याची आता आठवण काढायची गरज म्हणजे नुकताच झालेला वसुंधरा दिन (२२ एप्रिल). पूर्वी आपल्याकडे कपडे अगदी जुने, वापरण्यास अयोग्य झाले की कपाटातून काढून टाकले जायचे. पण आता तर दर महिन्याला बदलणाऱ्या फॅशनच्या शर्यतीत ट्रेंड गेला की, कपडा नकोसा वाटू लागतो. मग या ‘नकोशा’ कपडय़ांचं करायचं तरी काय? हा प्रश्नसुद्धा तितक्याच तीव्रतेने जाणवू लागला आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

आपल्याकडील या नकोशा कपडय़ांमध्ये केवळ जुने, ट्रेंडमधून गेलेले कपडे नसतात. तर त्यात ड्रेस शिवल्यावर उरलेलं कापड, उसवलेले कपडे, जुन्या ओढण्या, स्कार्फ, कधीही न वापरलेले कपडेही असतात. त्यामुळे या कपडय़ांचं करायचं काय? हे ठरविण्याआधी त्याचं नीट वर्गीकरण करणं गरजेचं असतं. इंटरनेटवर सध्या जुने टी-शर्ट्स, ओव्हरसाइज कपडे नव्या पद्धतीने कसे वापरता येतील, याची अनेक टय़ुटोरिअल्स उपलब्ध आहेत. पण ते प्रत्यक्ष वापरून पाहिल्याशिवाय त्यांची उपयुक्तता लक्षात येणार नाही. असे प्रयोग करताना जुने कपडे वापरणे जरी अपेक्षित असले, तरी त्या कपडय़ांचा रंग उडालेला नसेल, फाटले किंवा डागाळलेले नसतील हे तपासणेसुद्धा गरजेचे आहे. नाही तर यांच्यापासून तयार केलेले नवे कपडेसुद्धा वापरण्यायोग्य राहणार नाहीत आणि तुमची मेहनतसुद्धा वाया जाईल. यातील बहुतेक व्हिडीओ परदेशी ब्लॉगर्सचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे उपलब्ध असलेली साधने आपल्याकडे आहेत का? हेदेखील पडताळून घ्या. कित्येकदा बाजारात आपल्याला मिळणारे फॅब्रिक कलर्स कपडय़ांवर तितके पक्के बसत नाहीत. स्टड्स चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे. कपडय़ाचा पोत कसा आहे, तो किती कट्स आणि स्टिचेस सहन करू शकतो हे तपासणे गरजेचे आहे. असे कपडे वापरताना चुकून उसवले गेल्यास फसगत होण्याची शक्यताही असते.

अनेक घरांमध्ये नवरात्री किंवा देवीच्या जत्रेनंतर मंदिरातील लिलावातून देवीच्या साडय़ा विकत घेतल्या जातात. या बहुतांशी नऊवारी साडय़ा असतात. काही समारंभाला हौस म्हणून आपणही नऊवारी साडय़ा घेतो. पण नंतर मात्र त्या कपाटात तशाच पडून असतात. यातील साडेपाच मीटर कापड कापून त्याची नेहमीची सहावारी साडी तुम्ही करू शकता आणि उरलेल्या कापडाचा छान ड्रेस शिवता येईल. कित्येकदा आपल्याकडील जुन्या साडय़ांचे कुर्ते, अनारकली शिवतो पण असे करताना कपडा रंग सोडत नाही ना याची खात्री करून घ्या. कारण बऱ्याचदा आपण साडय़ा दोन-तीन वापराने ड्रायक्लिनिंगला देतो. पण ड्रेस मात्र आपण घरीच धुणे पसंत करतो. दोन किंवा अधिक कापडांचा मिळून एक ड्रेस शिवतानासुद्धा ही काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कपाटात काही र्वष पडून राहिलेल्या साडय़ांची वीणसुद्धा हलकी होते. त्यामुळे त्यांचे कापड लगेच उसवण्याची शक्यता असते. म्हणून अशा ड्रेसेसना चांगल्या प्रतीचे अस्तर वापरणे गरजेचे असते.

नकोशा कापडापासून नवीन, सुंदर कपडे तयार करणे ही पण एक कला आहे आणि छोटय़ा ट्रिक्स, कल्पनाशक्तीच्या जोडीने तुम्ही हे प्रयोग नक्कीच करू शकता.

१) जुन्या जीन्सवर वेगवेगळे प्रयोग करून त्यांचे रूपं पालटता येते. त्यासाठी जास्त कष्ट घ्यायची गरजही नाही. बाजारात मिळणारे स्टड्स, बटन्स यांचा वापर तुम्ही करू शकता. अर्थात हे स्टड्स नीट बसवणे गरजेचे, नाही तर पायाला लागून इजा होण्याची शक्यता असते. शक्य असल्यास स्टड्स लावलेल्या जागी आतल्या बाजूने कापडाचा तुकडा शिवून घ्या.

२) बहुतेकदा आपल्या जीन्सची हेम वापरून खराब होते. फिटेड जीन्सच्या हेम्स आखूड करून त्या अँकल लेन्थ करू शकता किंवा बाजारात सुंदर कॉटन, क्रोशाच्या लेस उपलब्ध आहेत. या लेस हेम्सना बॉर्डर म्हणून वापरता येतात. टोन्र्ड जीन्स, डेनिम जॅकेट्सना हा प्रयोग करता येईल.

३) कित्येकदा छोटासा डाग लागला तरी चांगली ओढणी फेकावी लागते. पण तीच ओढणी कापून तिला वजनाने हलके लटकन, बॉर्डर्स लावून स्कार्फ म्हणून वापरता येईल.

४) साडीची अख्खी जरीची बॉर्डर हेम किंवा बटनपट्टीला लावण्याऐवजी वेगवेगळ्या बॉर्डर्स जोडून स्लिव्ह म्हणून वापरता येईल.

५) कॉटन, सिल्क, टसर अशा हेवी कापडाचे छोटे, रंगीत तुकडे एकत्र करून त्यांची फुले, पोटली बटन्स बनवता येतात. मिक्स मॅच करून कुर्ते, ड्रेसला पॅचवर्कसारखी लावता येतील. याच कापडांच्या लांब पट्टय़ा कापून त्यांची वेणी बांधल्यास वेस्ट बँड म्हणूनसुद्धा वापरता येईल.

६) ओव्हरसाइज शर्ट तुम्हाला वेस्टलाइनपर्यंत कापून श्रग म्हणून वापरता येतात. चेक्स शर्ट यासाठी उत्तमच. शर्टच्या स्लिव्हज कापायला विसरू नका. त्यालाही तुम्हाला हवं तसं सजवता येईल. त्यामुळे दरवेळी नव्या श्रगमध्ये पैसे खर्च करावा लागणार नाही.

७) साडीचा ड्रेस शिवण्याऐवजी जॉर्जेट साडीचा स्कर्ट शिवता येईल.

८) मध्यंतरी आलेला डबल, तीन कापडांपासून बनविलेल्या साडय़ांचा ट्रेंड अजूनही कायम आहे. जॉर्जेट, क्रेप, शिफॉनच्या वेगवेगळ्या रंगाच्या दोन, तीन साडय़ा कापून त्यांची एक साडी नक्कीच करता येईल. त्याला छान बॉर्डर, एम्ब्रॉयडरी केल्यास तुमची खास डिझायनर साडी घरीच तयार होईल.

– मृणाल भगत