फॅशनची हौस भागवताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि कुठे फॅशनबुद्धी पणाला लावायची हे सांगणारं सदर..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुमच्या मित्रांचा ग्रुप कितीही मोठा किंवा छोटा असू द्या. त्यात एखादा असा असतो, जो सगळ्यात भाव खाऊन जातो. तुमचा ग्रुप त्याच्याच नावाने ओळखला जातो. फेसबुकवर तुमच्या ग्रुपचे फोटो कितीही छान आले असले, तरी चर्चा मात्र त्याच्या फोटोंची जास्त होते. ड्रेसच्या बाबतीतसुद्धा पूर्ण ड्रेस कितीही सुंदर असू दे, सर्वाधिक भाव खऊन जाते ती ड्रेसची ‘नेकलाइन.’ पाहा ना, अगदी साधी गोलाकार नेकलाइन असो किंवा एम्ब्रॉयडरीने सजवलेली, पहिल्यांदा लक्ष तिच्यावरच जातं. बरं ही वाटत असली एक साधीशी नेकलाइन, तरी ती तुमच्या स्वभावाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही बोलून जाते, अगदी तुमच्या-आमच्या नकळत. थोडक्यात नेकलाइनची महती लक्षात घेता तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही.
गुगलवर ‘नेकलाइन’ टाकून सर्च केल्यास लक्षात येतं की, आपण मोजून थकून जाऊ . पण नेकलाइनची विविधता संपणार नाही. अगदी सगळ्यात सोप्पी गोलाकार नेकलाइन पाहिली, तरी सक्र्युलर नेकलाइन वेगळी आणि ओव्हल वेगळी दिसते. त्यामुळे ड्रेसला वेगवेगळा गेट-अप मिळू शकतो. त्यात गळ्यापासून किती लांब आहे आणि किती डीप आहे यावरसुद्धा तिचं दिसणं बदलतं. बरं हिला एखाद्या एम्ब्रॉयडरी, बॉर्डरपट्टी किंवा स्टड्सची जोड द्या. बाईसाहेबांचा तोरा अजूनच वाढेल. इतर आकारांची कहाणीही थोडय़ाबहौत फरकाने अशीच आहे. त्यामुळे नेकलाइनची निवड काळजीपूर्वक केलेली उत्तमच. त्यासाठी तुमच्या ड्रेस कसा असेल हे नक्की करा. संपूर्ण ड्रेसवर किती डिटेलिंग आहे, यावरून तुमच्या नेकलाइनची स्टाइल ठरवा. सिंपल कुर्ता शिवणार असाल तर नेकलाइनवर जास्त लक्ष देऊन तिला थोडं आकर्षक बनवायला हरकत नाही. पण ड्रेस एम्ब्रॉयडरी किंवा पॅटर्नने भरलेला असेल तर मात्र सिंपल नेकलाइन उत्तम. तुमचे खांदे रुंद असतील, तर मध्यम लांबीच्या नेकलाइन्स वापरा. पण बारीक शरीरयष्टीच्या असला तर मात्र ब्रॉड नेकलाइन्सनी खांदे फोकसमध्ये आणता येतात. मध्यंतरी वेगवेगळ्या फॅन्सी नेकलाइनच्या साडी ब्लाउजचा ट्रेंड आलेला. अनारकली ड्रेसेसच्या ट्रेंडने तर नेकलाइनच्या रूपाला अजूनच खुलवलं होतं. पण सध्या मात्र ट्रेंड साध्या, सिंपल नेकलाइन्सचा आहे. गोल, चौकोनी, आयताकृती, त्रिकोणी नेकलाइन्स डिझायनर्सची पसंती आहे. मागच्या वर्षी रिलॅक्स, इझी फिट ड्रेसेस ट्रेंडमध्ये होते. सत्तरच्या दशकातील बोहो, हिप्पी लुक यंदा पुन्हा पाहायला मिळाला होता. या ट्रेण्डमध्ये एरवी किचकट वाटणारे भौमितिक आकार शोभून दिसतात. यामुळे लुक कूल दिसतोच आणि फोकस बाकीच्या ड्रेसवर अधिक राहतो.
प्रत्येक निमित्तानुसार योग्य नेकलाइन निवडणं गरजेचं आहे. ऑफिस किंवा मीटिंगसाठीच्या पेहरावातील शर्ट, टय़ुनिकची नेकलाइन बेसिक, पण वेल स्टिच्ड असणे गरजेचे असते. चायनीज कॉलर, शर्ट कॉलर, बेसिक भौमितिक आकाराची नेकलाइन फॉर्मल्समध्ये वापरल्या जातात. मध्यम डीप नेकचे टय़ुनिक्स, शर्ट हल्ली फॉर्मल्समध्ये वापरले जातात. सेमी फॉर्मल जॅकेट्स त्यांना जोड म्हणून वापरतात. डीप नेक, बॅकलेस, हॉल्टर नेकलाइनच्या बोल्डनेसमुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतोच. त्यांना योग्य रीतीने कॅरी करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. बॅक फोकसमध्ये ठेवायची असल्यास समोरच्या बाजूची नेकलाइन बंद गळ्याची किंवा बोट नेक ठेवावी. त्यामुळे ड्रेसमध्ये अवघडलेपणा येत नाही. साडीच्या ब्लाउजमध्ये बॅकनेकला जास्त महत्त्व असतं. साडीचा पदर किती जाड आहे आणि तो तुम्ही नक्की कसा घेणार आहात यावर ब्लाउजची नेकलाइन ठरते. पदर किंवा नेकलाइन यापैकी एकच गोष्ट फोकसमध्ये असली पाहिजे. शिफॉन, नेटच्या नाजूक, वजनाने हलक्या साडय़ांवरडीप नेकलाइनचे ब्लाउज उठून दिसतात. साडीची बॉर्डर मोठी असल्यास ब्लाउजला मोठी बॉर्डर घेणं टाळा.