वैष्णवी वैद्य
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लग्न सोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. त्यामुळेच की काय सध्या सगळेच लग्न समारंभ शाही थाटात घडवण्याचा ट्रेण्ड लोकप्रिय झाला आहे. अगदी डेकोरेशनपासून कपडय़ांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. फक्त वर-वधूच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच राजेशाही थाटात वावरते. ‘व्हिवा’च्याच एका लेखातून आपण पेशवाई थाटातील लग्न सोहळय़ाविषयी माहिती घेतली होती. कोविडच्या काळात थांबलेला शाही थाटातील लग्नसराईचा ट्रेण्ड आता पुन्हा जोरात आहे. यात महत्त्वाची भूमिका साकारतात ते म्हणजे डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. हल्ली लग्नाचा राजेशाही थाट हा फक्त श्रीमंत किंवा सेलेब्रिटींचा खेळ राहिलेला नाही..
हल्ली तरुणाई लग्नाच्या कपडय़ांबाबतीत अतिशय चोखंदळ झाली आहे. त्यांचे विचार स्पष्ट असतात. प्रत्येकालाच वेगळं काही तरी हवंय आणि आज फॅशन क्षेत्र इतकं प्रगल्भ आहे की, प्रत्येक जण आपापली वेगळी स्टाईल करू शकतोय. लग्नाच्या पोशाखासाठी पेस्टल रंग ट्रेण्डमध्ये आहेत यात वादच नाही, पण म्हणजे गडद रंग लोप पावतायेत असेही नाही. त्या रंगांमध्येही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून सुंदर पेहराव करता येतो. वेलवेट फॅब्रिकमध्ये फार फिकट रंग नसतात, पण आता डार्क वेलवेट नऊवारी साडीचीही फॅशन आली आहे. लाल, हिरव्या वेलवेट नऊवारी साडय़ा व त्यावर कॉन्ट्रास्ट असा शेला राजेशाही लुक देतो, असे अनेक नामांकित डिझायनर्सचे म्हणणे आहे.
मोठय़ा आणि ब्रॅण्डेड स्टायलिस्टसोबत स्टार्टअप स्टायलिस्टशीसुद्धा बोलून त्यांच्या कल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फॅशन डिझायनर तेजश्री गायकवाड सांगते, ‘लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी कपडे बनवून घ्यायचे आहेत, पण प्रामुख्याने हा मुद्दा जाणवतो की मुलींना हे सगळे कपडे नंतरही घालायचे आहेत. त्यामुळे ते हेवी किंवा भरजरी असले तरी ट्रेण्डी पाहिजेत. तसंच आता रंगसंगतीमध्येही बदल होताना दिसतायेत. हळदीला पिवळा किंवा मेंदीसाठी हिरवा रंगच पाहिजे असं काही राहिलेलं नाही. थोडा बॉलीवूडचा परिणाम म्हटलं तरी चालेल. अगदी रॉयल नाही, परंतु इंस्टाग्रामवर ट्रेण्डी असलेले, विशिष्ट थीमचे कपडे लग्नात आजकाल सगळे घालताना दिसत आहेत. कस्टमायझेशनला आज जास्त महत्त्व आहे हे नक्की.’
वेडिंग कलर्समध्येही पेस्टल्सचा बोलबाला आहे हे आता त्रिवार सत्य आहे. अगदी रेशमी पैठण्यासुद्धा आजकाल पेस्टल कलर्समध्ये उपलब्ध आहेत. नुकतेच बोहल्यावर चढलेल्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीचा लुक पाहिलात तर तिनेही लग्नाचा दिवशीसाठी फुशीय पिंक अशा पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. लग्न सोहळा आजकाल किमान ३-४ दिवसांचा असतो. मेंदी, संगीत, हळद या सगळय़ांसाठीच वधू-वर आणि त्यांच्या घरच्यांची कपडय़ांची एक विशिष्ट थीम ठरलेली असते.
सध्या वधू-वरांना कोणकोणते रंग आवडतायेत हेही फार महत्त्वाचे आहे. या सगळय़ा डिझायनर्सशी बोलून काही ट्रेण्ड सेंटर रंग लग्नसराईसाठी सध्या प्रसिद्ध आहेत हे समजले. ते का आहेत हेसुद्धा डिझायनर्सने सांगितले. या सगळय़ा रंगांचे वैशिष्टय़ म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या पोशाखात हे रंग सुंदर दिसतात. पारंपरिक पैठणी, जरीची साडी ते अगदी लेहेंगा किव्हा वेस्टर्न गाऊनमध्येही हे रंग पाहायला मिळतात.
अॅप्रिकॉट (जर्दाळू) कलर
पिवळट केशरी असा हा रंग असतो. हा सध्या ट्रेण्ड सेंटर रंग आहे. वधू-वरांना कलर कॉर्डिनेट करण्यासाठी हा रंग अतिशय उठावदार दिसतो. तुम्ही इतरांच्या लग्न सोहळय़ातही या रंगाचे पोशाख परिधान करू शकता. कुठल्याही कलर कॉम्प्लेक्सच्या व्यक्तीला हा रंग चांगला दिसतो. डिझायनर्स सांगतात, हा रंग लाल, राणी किंवा तत्सम डार्क रंगाच्या समन्वयात अतिशय उठून दिसतो.
स्यान (निळसर) रंग
हा फ्रेश आणि आधुनिक रंग आहे. उन्हाळय़ातल्या लग्नांमध्ये हा रंग परफेक्ट फिट होऊ शकतो. मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर्सना या रंगात जास्तीत जास्त कल्पकता आणता येते. हा रंग जरा फेंट शेडकडे जाणारा असल्याने सिल्व्हर किंवा तत्सम चकचकीत रंगाशी समन्वय होऊ शकतो.
ऑलिव्ह ग्रीन कलर
हा फारच लोकप्रिय रंग आहे. ऑफबीट आणि हटके स्टायिलगसाठी हा रंग अतिशय आकर्षक आहे. मेंदी, संगीत किंवा रिसेप्शनसाठी हा रंग भरजरी ज्वेलरी आणि मेकअपसोबत स्टाइल केल्यावर वधूसह इतरांनाही खुलून दिसू शकतो. कॉपर, डार्क हिरवा, गुलाबी असे रंग तुम्ही ऑलिव्ह ग्रीनसोबत परिधान करू शकता. डिझायनर्सच्या भाषेत हा रंग अंडर-टोन्ड आहे, त्यामुळे स्टायलिस्टने हा रंग स्टाइल करताना अतिदक्षता घेणे गरजेचे आहे.
फुशिया पिंक कलर
हा अतिशय गोड आणि मोहक रंग आहे. कुठल्याही वयोगटातल्या स्त्रीला हा रंग उठून दिसतो. डिझायनर साडी, लेहेंगा, इंडो-वेस्टर्न पॅन्ट सूट अशा अनेक प्रकारे या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. हा रंग शक्यतो सिल्व्हर रंगाशी जास्त समन्वय साधतो किंवा अशाच लाइट पेस्टल रंगांसोबत छान दिसतो.
स्मोकी कलर
हा रंग चॉकलेटी, मरून अशा रंगाच्या जवळ जाणारा. रंगात फार वेगळं काही नाही, कारण भारतीय लग्न परंपरेत जुन्या काळात शालू अशाच रंगांचे असायचे. तुम्हाला रॉयल लुक द्यायचा असेल तर हा रंग सुयोग्य आहे. या रंगावर फोटोशूट अतिशय राजेशाही दिसते; परंतु हा रंग डार्क असल्याने तुमचा स्किनटोन, मेकअप, दागिने या सगळय़ाकडे खूप बारकाईने लक्ष द्यावे लागते. लाइट सोनेरी, मोती असेच रंग याला कॉन्ट्रास्ट होतात.
लग्न समारंभ म्हटलं की, काही रंग डोक्यात पक्के असतात, पण आज तशी परिस्थिती नाही. प्रेझेंटेबल दिसण्यासाठी गडद किंवा डार्क रंगांची गरज नाही. पेस्टल, स्मोकी, मिक्स अन् मॅच रंगसंगती आजकाल बघायला मिळतेय. रॉयल वेडिंगचा ट्रेण्ड आज कपडे, दागिने, मेकअप, लोकेशन अशा सगळय़ाच माध्यमांतून बघायला मिळतो आहे. हा रॉयल लुक आणण्यासाठी कापडापासून ते आय मेकअपपर्यंत सगळं जुळवून आणण्यात डिझायनर्स आणि स्टायलिस्ट सतत मग्न असतात. बॉलीवूडचा एकूणच प्रभाव आजच्या लग्नाळू तरुणाईवर झालेला दिसतोय. कियारा अडवाणीचा रॉयल संगीत लुक तरुणाईने फारच उचलून धरला. तिचा स्वरोस्की पर्ल्सचा लेहेंगा अगदी डोळय़ाचे पारणे फिटवणारा होता. अथिया शेट्टी व के. एल. राहुलनेही रॉयल परंतु डिसेन्ट लुक केला होता. त्याचेही सगळीकडून कौतुक झाले.
नवरदेवाच्या फॅशनलाही काही परिसीमा राहिलेली नाही. ‘मान्यवर’ आणि इतर तत्सम ब्रॅण्डशी बोलल्यावर असे लक्षात आले की, कशिदा वर्क केलेली भरजरी शेरवानी आणि दुपट्टा, ब्रोकेड पॅटर्नचं जॅकेट, हाफ लाइट आणि हाफ गडद फ्युजन पद्धतीचे कपडे, शॉर्ट कुर्ता, गडद रंगांचे चिकनकारी कुर्ते असे काही ट्रेण्ड्स तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. पैठणी फॅशन तर आता डेली ट्रेण्ड झाला आहे. आधी फक्त समारंभात केली जाणारी फॅशन आता प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांत होताना दिसते आहे. मोठमोठे ब्रॅण्ड्स वेडिंग कलेक्शन घेऊन येत आहेत. मोहे, कोहिनूर, रघुकुल, कांथा, पेशवाई अशा लोभस नावांच्या वेडिंग कलेक्शनची मांदियाळी सध्या पाहायला मिळतेय. एरवी तरुणांबद्दल मानला जाणारा समज, की त्यांना लवकर लग्न करायला आवडत नाही, सगळं शॉर्टकट लागतं, वगैरे वगैरे. हे सगळंच बाजूला ठेवून आजची तरुणाई लग्नाच्या बाबतीत किती हौशी आहे हेच यातून दिसून येतं आहे.