नक्को ग बाई हा उन्हाळा.. सगळी नुसती चिकचिक.. सारखं पाणी पाणी होतंय.. जिवाची तगमग नुसती.. हे आणि असले शेकडय़ांनी उद्गार काढत आपल्याकडून बऱ्याचदा उन्हाळ्याचा उद्धार केला जातो. खरं तर सीझन बदलला की त्यानुसार आपण सेट होईपर्यंत थोडा त्रास होतोच. पण हे लक्षात न घेता केवळ नावं टिकल्या ठेवल्या नाहीत तर कसं होणार पण उन्हाळ्याला कायम नावं ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये. तो सुसह्य करायचा असेल तर थोडा दिमाग लगाना पडता हैं बॉस? त्यासाठीचे हे काही फण्डे.  
उन्हाळा आपण कसा निभाणार? उन्हाचा पारा नि घामाच्या धारा.. विजेच्या बिलाचे वाढते आकडे नि कोल्ड्रिंक्सवर होणारा खर्च.. त्यावरून घरच्यांची होणारी ओरड.. असे सगळे विचार पहिल्यांदा मनातून काढून टाका. उन्हाळाही मस्तच आहे. तो इतर ऋतूंसारखाच छान जाणारेय, हे मनाशी पक्कं ठरवून टाका.

डॅशिंग डाएट
आता पोटोबाकडं वळू या. पोटोबा शांत तर पुढची कामं होतात राव. त्यासाठी काय करावं?
* पाणी म्हणजे जीवन वगरे फिलॉसॉफी पुस्तकांतच न ठेवता ती अप्लाय करा. सो, पाणी बेस्टच. फक्त उन्हातून आल्या आल्या फ्रिजमधलं पाणी पिणं टाळाच. थोडय़ा वेळानं माठातलं वाळा घातलेलं पाणी पिणं झकास.
* तहान लागल्यावर पाणी प्यायला हवंच. इतर वेळी संत्र-मोसंब वगरे ताज्या फळांचा रस घ्या.
* किलगड, जांब, टरबूज, खरबूज, आंबा इत्यादी सीझनल फळं आवर्जून खा.  
* लिंबू, आवळा, कैरी, कोकम, जांभूळ इत्यादींपासून घरी तयार केलेलं सरबत प्या.
* शहाळ्याचं पाणी अधूनमधून प्या.
* घरातलं गोड ताक प्या.
* गोड, तुरट चवीचे पदार्थ खा.
* घरातून बाहेर पडताना पाण्याची बॉटल सतत सोबत ठेवा.
* कोल्ड्रिंक्स, बर्फाचे गोळे, कुल्फी नि आईस्क्रीम खाण्याचा अतिरेक टाळा.
*    सकाळी घराबाहेर पडताना व्यवस्थित नाश्ता करूनच बाहेर पडा.
ड्रेस कुल..
पोटोबा निवांत झाल्यावर आता बाहेर जायला काही हरकत नाहीये. त्यासाठी काय कराल?
*    उन्हाळ्यात पांढरा आणि पेस्टल कलर्सची चलती असते. या रंगसंगतीतले लखनवी, चिकन, कशिदाकारी केलेले मटेरिअल वापरणं मस्ट असतं.
*    मिक्स अ‍ॅण्ड मॅच कॉम्बिनेशन, प्लेन किंवा फ्लोरी िपट्र, अनारकली, धोती, टय़ुनिक्स असं काहीही असलं तरी त्यासाठी कॉटन मटेरिअलशिवाय बेस्ट ऑप्शन नाही.
*    कॉटनखेरीज मटेरिअल वापरायचं असल्यास सिल्कला प्रेफरन्स द्यावा.
*    लूज फिटिंग स्कर्ट आणि िपट्रेड कुत्रे वापरता येतील.
*    टी शर्टमध्ये कॅची स्लोगन्सवाले, प्लेन, डिजिटल िपट्र, अनिम िपट्र अशी व्हरायटी आहे.
*    मऊसूत खादीचा पर्याय ट्राय करून बघाच.
*    समरकोट, हॅट, कॅप, स्कार्फ, स्टोल वापराच.  
*    हेअरस्टाईल म्हणून मुलींनी हाय पोनी बांधावा. मुलग्यांनी सोल्जर कट करावा.
*    अतिमेकअप करणं टाळावं.
*    सॅण्डल्स, फ्लोटर्स असे ओपन फूटवेअर वापरा.
कुल केअर..
१. बाहेर पडण्यापूर्वी एसी किंवा कुलरची हवा खाण्यापेक्षा नॉर्मल टेंपरेचरमध्ये राहा, म्हणजे बाहेर पडल्यावर त्रास होणार नाही.
* पर्स किंवा पाऊचमध्ये ब्रॅण्डेड सनग्लासेस, रुमाल किंवा टिश्यू पेपर असावाच.
* आवळा सुपारी, सुकामेवा अशा पौष्टिक गोष्टी सोबत ठेवा.
* तहान लागल्यास पाणी किंवा ताजा उसाचा रस प्या.
* मसालेदार, तेलकट, मांसाहारी पदार्थ खाऊ नका.
* गाडय़ांवरचे पदार्थ खाणं टाळा.
* अति व्यायाम आणि अति श्रमाची कामं करू नका.
* उन्हात अति फिरू नका. जरुरीप्रमाणं पुरेशी विश्रांती घ्या.
* सतत चॅटिंग, मेसेजिंग केल्यानं होणारी रात्रीची जागरणं टाळा.
* कट्टय़ावर भेटायची वेळ संध्याकाळची ठेवा.
* घरी राहून बोअर होण्यापेक्षा घरातच क्रिएटिव्ह वर्क करा.
* आवडीचा छंद जोपासा.
तेव्हा, फ्रेण्डस्, हे फण्डे ट्राय करून बघाच. त्यामुळे उन्हाच्या झळा थोडय़ा कमी लागतील नि समर व्हेकेशनमध्ये बोअर होणार नाही. सगळ्यांना हॅप्पी समर व्हेकेशन..

Story img Loader