सध्या नेटीझन्समध्ये नेट न्युट्रॅलिटीची जोरदार चर्चा आहे. नेट न्युट्रॅलिटीविषयीची माहिती देणारा ‘एआयबी’चा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायलर आहे. पण याबाबतची जागरुकता केवळ मेट्रोपुरतीच मर्यादित आहे की काय, असं वाटायला लावणारी परिस्थिती मराठवाडय़ात दिसली. नेट न्यूट्रॅलिटीविषयी मत विचारायला गेलो असता औरंगाबाद शहरामधीलच ७० टक्के तरुणांना याविषयी महिती नसल्याचे लक्षात आले. ज्यांना माहिती होती, त्यांनी मात्र मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी डेटा युझर्ससाठी वेगळे पॅकेज देणे चुकीचे आहे, असेच मत व्यक्त केले.  इंटरनेट पॅकविषयी इत्यंभूत माहिती असणाऱ्यांना नेट न्यूट्रॅलिटीबाबत नेमकेपणाने सांगता येत नाही. आम्ही फक्त व्हॉट्सअॅप वापरतो, असेही उत्तरे काहीजण देतात.
लॉ चा अभ्यास करणाऱ्या मिलींद पोटेने सांगितले, ‘मला नेट न्युट्रॅलिटविषयी महिती आहे. विशिष्ट पॅकेजच्या बंधनामुळे स्वातंत्र कितपत मिळेल यात मला शंका वाटते.’ ‘बीएससी’ करणाऱ्या ऋषीकेश उपासनी म्हणतो, आता फेसबुक आणि व्हॉटस्अॅपसाठी वेगळे पॅकेज देणार असल्या तर पॉकेट मनी महागणार आहे. ‘एमसीए’करणारी समिधा तुंगेला नेट न्युट्रॅलिटविषयी फारशी माहिती नाही. ‘लॉ’चा अभ्यास करणाऱ्या उत्तरा परांजपेला नेट न्यूट्रॅलिटीविषयी थोडी माहिती आहे. इंटरनेट वापराचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे, असंच आम्ही विद्यार्थ्यांचं मत असल्याचं ती सांगते.
प्रतीक्षा पाठक -viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा