व्हॉट्सअॅपवर आता मिनिटामिनिटाला स्टेटस बदलण्याचा ट्रेंडच आलाय. कधी कधी हे स्टेटस मेसेजेस अगदी तऱ्हेवाईक, मजेशीर आणि आकर्षक असतात. अशाच काही फंडू स्टेटसबद्दल..
मनाचा थांग कुणाला लागत नाही, दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे हे कोणाला कळत नाही असं म्हणतात; परंतु आता समोरच्या व्यक्तीच्या मनात काय घडत असेल, ती व्यक्ती या क्षणाला काय करत असेल, कुठे असेल याचा अंदाज आपण त्या व्यक्तीला न भेटताच घेऊ शकतो आणि तुम्ही घेतलाही असेल. कसा? तुमचा मोबाइल आहे ना! फेसबुक, ट्विटरप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही आपलं ‘स्टेटस’ आणि ‘डिपी’ (डिस्प्ले पिक्चर) टाकायच्या ट्रेंडची बरीच चलती आहे. ‘हे देअर!!आय अम युिझग व्हॉट्सअॅप’ असं कोणाच्या नावावर पाहिलं न् पाहिलं की लगेच आपला मोर्चा वळतो तो त्या व्यक्तीचा ‘डिपी’ झूम करून पाहण्याकडे!!
कशाचे नाही पण निदान स्टेटसचे तरी आपण रेग्युलर वाचक झालो आहोत असं म्हणायला हरकत नाही. दिवसातून कमीतकमी एकदा तरी सगळ्यांच्या स्टेटस आणि डिपीवर नजर फिरवली जातेच जाते. असो.. पण या स्टेटसचे वेगवेगळे नमुने अगदी टाइमपास म्हणून जरी चाळले तरी लोकांच्या कल्पनाशक्तीची चुणूक त्यातून बघायला मिळते. ‘पायाला मुंग्या आल्या आहेत’ हे स्टेटस वाचून असंही स्टेटस असू शकतं यावर विश्वास ठेवावाच लागतो. ‘पाहिलंत ना स्टेटस आता घरी जा’ असं म्हणून धमकी देणारे किंवा ‘टायिपग’ असं म्हणून अजून स्टेटस लिहीत आहोत असं सांगणारेही काही तऱ्हेवाईक स्टेटस सापडतात. कोणी बाहेरगावी जाणार असेल तर इनडिविज्युअल मेसेज करण्यापेक्षा ‘कान्ट टॉक रोिमग’ असं स्टेटस टाकलं की एका फटक्यात काम होऊन जातं. कोणाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा स्टेटस म्हणून टाकायचा वेगळा ट्रेंड आलाय. एवढंच नाही तर ग्रुपवरसुद्धा ग्रुपचं नाव म्हणून मित्राच्या बर्थ डेच्या दिवशी ‘हॅपी बर्थ डे अमुक अमुक’ असं टाकून त्याचा बर्थ डे अगदी दिमाखात स्टेटसद्वारा झळकत असतो!!
व्हॉट्सअॅपवरच्या ग्रुपचं नाव हीसुद्धा एक इनटरेिस्टग गोष्ट असते. ग्रुपमध्ये खूपच हल्लाबोल व्हायला लागला म्हणून ‘आता झोपा सगळे’ असं जणू काही नोटीसरूपी स्टेटसच ग्रुपमधल्या एकाने टाकलं; तर ग्रुपला काहीच नाव सुचत नव्हतं म्हणून ‘एक्स.वाय.झेड.’ नाव देणाराही अपवादात्मक ग्रुप सापडतो. एकानं तर ‘बिननावाचे शहाणे’ असंच आपल्या ग्रुपला नाव देऊन टाकलं होतं.
एरवी खूप महिन्यात एखाद्याशी संवाद झाला नसला तरी डिपी पाहून ‘नाइस डिपी’ किंवा स्टेटस वाचून ‘काय झालाय?’ असा कोणाचा तरी मेसेज येतोच येतो. कदाचित पुन्हा त्याच्याशी बोलणं होतही नाही; पण डिपी आणि स्टेटसची दखल प्रत्येकजण घेत असतो. बोअर होत असताना सहज चाळा म्हणून कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन स्क्रोल डाऊन करत करत प्रत्येकाचे फोटोज आणि स्टेटस आपण आवर्जून पाहतो.
‘डिपी’ ठेवण्याबाबत पण सगळेच आता जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला फोटोची क्रेझ असतेच; पण आता ‘ए माझा एक चांगला पिक काढ ना डिपीसाठी’ असं बऱ्याच वेळा घडलं असेल. अजून एक ‘टिपी’ गोष्ट म्हणजे स्वत:चा छान क्लोजअप फोटो असण्यापेक्षा नखांना नव्याने लावलेल्या नेलपेंटचा, केसांचा कट केल्याचा, डोळ्यातल्या लेन्सचा, हातातल्या घडय़ाळाचा किंवा बांगडय़ांचा, आज बनवलेल्या जेवणाच्या ताटाचा असे नानाविध फ्रेमचे फोटोज टाकण्याचासुद्धा सुळसुळाट सुरू झालाय.
जगाच्या पाठीवर माणूस कुठेही असेल तरी माणसाचे बदलत जाणारे मूड्स स्टेटसवर हमखास उमटतात. स्टेटसचं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे काहीजण शब्दांचा वापर न करता स्माइलीजने आपल्या भावना व्यक्त करतात. पुस्तक आणि टेन्शनचं स्माइली घातलं की समजायचं – इस बंदे की एक्झाम है!! हे आता सांगावं लागत नाही. कोणी म्युझिकचे सिम्बॉल्स घालतात; तर कोणी शब्दांचाच वापर करून ‘नो स्टेटस’ असं चक्क सांगून स्टेटस अपडेट करतात. काहीजण बिचारे वर्षांनुवर्षे (बाय डिफॉल्ट) हे देअर!!आय अम युिझग व्हॉट्सअॅप हेच लोकांना ओरडून सांगण्यात आनंद मानतात!!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा