हॅलो मॅडम, मी मेडिकलला चांगल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळणे शक्य असूनही बीएस्सीला जाण्याचा निर्णय घेतला. मला झूलॉजीमधून बीएस्सी करायचं आहे. कारण प्राणी, एस्पेशली कीटकांचा अभ्यास करणे हे माझं पॅशन आहे. पुढे माझा त्यात करिअर करायचा विचार आहे. म्हणून मी मुंबईमधल्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण इथले शिक्षक खूपच रिलक्टन्ट वाटतात. फॉर एक्झाम्पल, एकदा केमिस्ट्रीच्या मॅडम जो कन्सेप्ट शिकवत होत्या, त्याविषयी मला अजून जाणून घ्यावंसं वाटलं म्हणून मी त्यांना लेक्चर संपल्यावर विचारलं. तर त्या म्हणाल्या, हे एवढेच सिलॅबसमध्ये आहे, तेवढंच नीट करा. ते पण जरा ओरडूनच. दुसरा इन्सिडन्ट म्हणजे आमच्या वर्गातल्या एका मुलीनं बॉटनीच्या सरांना एक सिलॅबसबाहेरचा डाऊट विचारला. त्यांनी तिला त्याचं उत्तर दिलं. पण मी एक डाऊट विचारायला गेले तर म्हणाले की ते तुम्हाला मी जेव्हा तो दुसरा चॅप्टर शिकवेन तेव्हा कळेल. कधीकधी मला असं वाटतं की हे सगळे शिक्षक ठरवून माझ्याशी असं वागतायत. मी खूप इन्ट्रोस्पेक्शन करून पाहिलं, पण माझी काय चूक झाली हेच कळत नाही. मला आजकाल नवीन काही वाचावंसं वाटत नाही, कारण कुणी डाऊट क्लिअर करणार नसेल तर काय उपयोग? कॉलेज बदलावं का, की कोचिंग क्लास जॉइन करावा? मी काय करू? माझा पूर्ण गोंधळ उडालाय.
– शेफाली
हाय शेफाली, कीटक म्हटलं की बहुतेक मुली ईऽऽऽऽ करून ओरडतात, तिथे तू मात्र कीटकांचा अभ्यास करणं हे पॅशन आहे म्हणतेस! ग्रेट!
तुझ्यासारखा चाकोरीबाहेरचा विचार खूप जण करतात आजकाल. प्रत्येकाची आवड, क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे पूर्वी जसं काही ठरावीक कोर्सेस करणं म्हणजेच बेस्ट असं समजायचे तसं आता समजलं जात नाही. तुझी आवड ठामपणे समजून तू मेडिकल सोडून बीएस्सीला अ‍ॅडमिशन तर घेतलीस, पण आता तुला काही अडथळे जाणवायला लागलेत. बारावीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतरचं शिक्षण यात फरक असतो हे तुझ्या आता लक्षात आलं असेल. तोपर्यंत बऱ्यापैकी स्पूनफीडिंग केलं जातं. मार्क्‍स मिळवून पुढे अ‍ॅडमिशन घेणं हेच सर्वाचं ध्येय असतं. पण आता मात्र पद्धत बदलते. बराचसा अभ्यास, रिसर्च आपला आपण करावा लागतो. मला वाटतं तुलाही तसं करावं लागेल. काही थोडय़ा लकी जणांना लाभतातही चांगले शिक्षक. पण बऱ्याच जणांना हे शिवधनुष्य आपलं आपणच पेलावं लागतं. या एक दोन अनुभवांनी तुझा इंटरेस्ट घालवू नकोस विषयातला.
तू ‘एम्पथी’ हा शब्द ऐकलायस का कधी? ही सिम्पथीपेक्षा वेगळी असते. मराठीत त्याला सहसंवेदना असं म्हणतात. यात दुसऱ्याची कीव किंवा रागराग करण्याऐवजी त्यांच्या बाजूनं विचार केला जातो. ही एम्पथी तू तुझ्या शिक्षकांच्या बाबतीत आजमावून बघ. ते वर्षांनुवर्ष हाच विषय शिकवतायत प्रॉबेबली. अनेक स्टुडन्ट्स त्यांनी पाहिले, अनुभवले, सहन केले असतील. त्यातून त्यांनी काही ठोकताळे बांधलेले असतात की आजकालच्या मुलांमध्ये सिन्सिअरिटी नाही, कष्ट करण्याची तयारी नाही, त्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर नाही इ. इ. त्यांच्या तुझ्याबद्दलच्या दृष्टिकोनामागे हे पूर्वी आलेले कटू अनुभव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुझ्याबरोबर आणखी काही वेळ घालवल्यावर, तुझ्या अभ्यासातून, प्रोजेक्ट्समधून कदाचित तुझा जेन्युइननेस त्यांच्या लक्षात येईल. हळूहळू ते तुला अ‍ॅप्रिशिएट करायला लागतील. अशा एखाद्या मनापासून  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिकवायला त्यांनाही बरं वाटतं. तुझी काही चूक तुला सापडली नाही असं लिहिलंयस तू. यात कुणाची तरी चूक असतेच असं नाही. एकाच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा इतकंच. आपल्याला होणाऱ्या त्रासाची संपूर्ण जबाबदारी आपलीच असते, त्यासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरून चालत नाही असं अनेक विचारवंतांनी म्हटलंय. तुझ्या मूडची, तुझ्या यशाची जबाबदारी तुझीच आहे हे तूही लक्षात ठेव.
तुझे सीनिअर्स, या क्षेत्रात काम करणारे इतर लोक, पुस्तकं, इंटरनेट आणि काही काळानं कदाचित तुझे शिक्षक इतके सगळे आहेत तुला मदत करायला! आनंदानं आणि उत्साहानं तुझी अनयुज्वल पॅशन फॉलो कर.
Push yourself because, no one else is going to do it for you!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.