मुंबईतल्या वांद्रे उपनगरातला प्रसिद्ध बॅण्ड स्टॅण्ड म्हणजे प्रेमी युगुलांचा अड्डा. गर्दीचे ठिकाण असूनही जोडपी समुद्रालगतच्या खडकांवर प्रणयाराधनेत मग्न असतात. त्यांना दुरून बघणारे आंबटशौकीनही इथे मोठय़ा संख्येने असतात. मागील आठवडय़ात अशाच एका जोडप्याचा नको त्या अवस्थेतील एक फोटो कुणीतरी क्लिक केला आणि हा फोटो व्हॉटसअॅपवर फिरू लागला. त्यातच कुणी तरी या मुलाला आणि मुलीला फेसबुकवरून शोधून काढले आणि त्याचाही फोटो ‘हाच तो मुलगा’ म्हणून पुन्हा फिरू लागला. अर्थात मूळ फोटोतील मुलं वेगळी असतीलही. पण या मुलाचीही नाहक बदनामी होऊ लागली. या मुलाच्या ‘फेसबुक’ वॉलवर तर शिव्यांचा, टिंगलटवाळीचा भडिमार झाला. नंतर उघडकीला आलं की, त्याच्या एका मित्रानेच गंमत म्हणून त्याचा फोटो एडिट करून पसरवला होता. त्या मित्राने दिलगिरी व्यक्त केली. पण तोपर्यंत या मुला-मुलीची बदनामी होत राहिली. अशा पद्धतीने फोटो काढणे, ते सोशल मीडियावर पसरवणे किती गंभीर गुन्हा आहे, याची गंमत म्हणून असं करणाऱ्यांना कल्पना नसते. जे पीडित असतात त्यांना कुठे तक्रार करायची तेदेखील माहीत नसतं.
सध्या प्रत्येकाच्या हातात चांगल्या प्रतीचे (चांगल्या मेगापिक्सलचे) कॅमेरे असलेले स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे कुठेही, कधीही, कुणाचेही फोटो काढले जातात. मुलींचे फोटो काढण्याची आणि ते पसरविण्याची विकृती त्यामुळे वाढीस लागली आहे. सोशल मीडियामध्ये तर असे प्रकार सर्रास घडत असतात. पटापट फोटो काढण्याची आणि ते सोशल साइट्सवर अपलोड करण्याची क्रेझ असते. आपल्या प्रेयसीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढण्याची विकृतीही तयार होते आहे. मग हे फोटो केवळ गंमत म्हणून मित्रांना पाठवले जातात. तेथून मग ते ‘व्हायरल’ होत जातात. आपण काय करतोय याची असे फोटो पाठविणाऱ्यांना कल्पना नसते. मुलींनादेखील आपल्याला ‘व्हिक्टिम’ बनवले जातेय याची कल्पना नसते. पिकनिक, पार्टीच्या वेळी बेसावध क्षणाचे फोटो काढले जातात. मग हे एमएमएस काही क्षणातच जगभर पसरतात. आपला कुणी फोटो काढलाय याची त्या मुलींना कल्पनाही नसते. अशा वेळी काय करायचं हेसुद्धा त्यांना माहीत नसतं. खरं अशा प्रकरणाबाबत तक्रार करणं खूपच सोप्पं असतं. अगदी घरबसल्या आपण तक्रार करून हे प्रकार थांबवू शकतो. अशा तक्रारी वाढतील तशी जरब वाढेल गैरप्रकार कमी होतील.
सायबर गुन्हेतज्ज्ञ अॅडव्होकेट प्रशांत माळी यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात अगदी सखोल आणि प्रत्येक गुन्ह्य़ाबाबत तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या मुलीची बदनामी केली दर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल होतो. कुठल्याही मुलीचा तिला न विचारता साधा फोटो काढला आणि तिने तक्रार केली तर भादंवि संहितेच्या कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल होतो. एखाद्या मुलीचा विवस्त्रावस्थेतील फोटो काढला तर कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल होतो. हाच फोटो जर सोशल साइट्सवर, व्हॉटसअॅपवर पसरवला तर कलम ३५४ बरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल होतो. यामध्ये विना वॉरंट अटक करण्याची तरतूद असते. एखाद्या जोडप्याचा सेक्स करताना फोटो, व्हिडीयो काढला आणि प्रसारित केला तर माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल होतो. त्याला ५ वर्षे कारावासाची शिक्षा आहे. हे जोडपे जर अल्पवयीन असेल तर ६७ (ब) नुसार गुन्हा दाखल होतो. त्याला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात तेव्हा..
मुंबईतल्या वांद्रे उपनगरातला प्रसिद्ध बॅण्ड स्टॅण्ड म्हणजे प्रेमी युगुलांचा अड्डा. गर्दीचे ठिकाण असूनही जोडपी समुद्रालगतच्या खडकांवर प्रणयाराधनेत मग्न असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-05-2015 at 01:14 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When photos videos become viral