डिसेंबर महिना म्हणजे पाटर्य़ाचा महिना.. पण नेहमी तशाच पाटर्य़ाना जाऊन बोअर होतं आणि लोक जायचं टाळायला लागतात. तुमच्या घरची पार्टी इंटरेस्टिंग कशी कराल, हे सांगणाऱ्या काही भन्नाट थीम आयडियाज..
एकदा का डिसेंबर महिना आला की प्रत्येकाला पार्टीज्चे वेध लागू लागतात. कॉलेजचे कट्टे, ऑफिसमधील टी टाइमच्या गप्पा, सोसायटीतील सोशल ग्रुप अगदी फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या वॉल्स पार्टीज्च्या रंगात रंगून जातात. साहजिकच आहे ते. डिसेंबर महिना म्हटला की हुडहुडी भरणारी थंडी, ख्रिसमसची रोषणाई आणि नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी असं भलंमोठ्ठं चित्र डोळ्यांसमोर उभं ठाकतं. त्यात शाळा कॉलेजच्या परीक्षा संपलेल्या असतात, ऑफिसला जाणारी मंडळी सकाळी पडणाऱ्या गारव्याने सुस्तावतात आणि रोज दांडी मारायचे नवीन नवीन पर्याय शोधत असतात. कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला आणि ग्राहकांना गिफ्ट्स, शुभेच्छापत्रं वाटण्याच्या औपचारिकतेमध्ये गुंतलेल्या असतात. गावांमध्ये या दिवसांत शेतात साजरे केले जाणारे शेकोटी, पोपटीसारखे कार्यक्रम कित्येकांना खुणावत असतात. कित्येकांच्या स्वप्नात बीयर, वाईन किंवा व्होडकाच्या बाटल्या फेर घालून नाचत असतात आणि त्यांना खुणावत असतात. एकूणच काय प्रत्येक जण सुस्तावलेला असतो आणि पार्टी करण्याचे विविध बहाणे शोधत असतो.
मग या दिवसात पाटर्य़ाना उधाण येतं. प्रत्येक ऑफिसची न्यू इअरची एक पार्टी ठरलेली असतेच. त्याच बरोबर सोसायटीच्या मेंबर्सची पार्टी, कॉलेजच्या अड्डय़ावरच्या मित्रांची पार्टी, नातेवाईकांचं गेट टुगेदर अशा अनेक पार्टीज ठरवल्या जातात. त्यात डिसेंबर महिन्यात कोणाचा बर्थ डे किंवा लग्नाचा वाढदिवस असला तर विचारायलाच नको. पण इतक्या सगळ्या पार्टीज ना हजेरी लावायची म्हणजे ती पार्टी पण तितकीच इंटरेिस्टग असली पाहिजे. नाही तर नुसतं खा, प्या, गप्पा मारा आणि घरी या हेपण रुटीनसारखं बोअिरग होऊन जातं. महिना अखेपर्यंत या ज्यादा पाटर्य़ाचं अपचन होऊ लागतं. मग आधी पार्टीज ना जायला कारण शोधणारी लोकं पार्टी टाळायचे मार्ग शोधू लागतात.
आपल्या घरच्या पार्टीचं असं होऊ नये असा विचार जर तुम्ही करत असाल, तर यावर मस्त उपाय म्हणजे थीम पार्टी. एखाद्या विशिष्ट थीमनुसार पार्टीचा माहोल तयार करायचा, पाहुण्यांना तसंच ड्रेस अप होऊन यायला सांगायचं आणि अगदी फूड िड्रक्ससुद्धा त्याच थीमनुसार सव्‍‌र्ह करायचे. अशाच काही भन्नाट थीम आयडियाज खास तुमच्यासाठी.

१.  बॉलीवूड थीम पार्टी
बॉलीवूड म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. त्यामुळे बहुतेकदा थीम पार्टीचा विषय निघाला की बॉलीवूड ही थीम पहिल्यांदा डोक्यात येते. थीम पार्टीजमधली सर्वात जुनी पण क्लासिक थीम आहे ही. यावेळी यात तुम्हाला वेगळेपण आणायचं असल्यास नेहमीप्रमाणे एखाद्या चित्रपटातील पात्रांची वेशभूषा करण्याऐवजी बॉलीवूडच्या फेमस जोडय़ांची वेशभूषा तुम्ही करू शकता. त्यातही सध्या दीपिका-रणवीर सिंग, रणबीर-कतरिना, श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूर अशा हिट जोडय़ाप्रमाणे तुम्ही ड्रेस्ड अप होऊ शकता. यावर्षी बॉलीवूडनी शंभर वर्षांचा पल्ला गाठला आहे. तुमच्या नातेवाईकांच्या गेट टुगेदरसाठी ही थीम ठेवल्यास प्रत्येक जण त्यांच्या काळातील हिट जोडीप्रमाणे तयार होऊन येऊ शकतो. मग एकाच पार्टीत दिलीपकुमार-सायराबानू, धर्मेद्र-हेमामालिनी आणि अभिषेक-ऐश्वर्या एकत्र पाहायला मिळतील.
 
२. सचिन मॅनिया थीम :
याच वर्षी आपल्या सर्वाच्या लाडक्या सचिननं क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्यामुळे यावेळी त्याच्या कारकिर्दीला एक सलाम म्हणून खास ‘सचिन थीम’ तुम्ही ठेवू शकता. संपूर्ण खोली सचिनच्या पोस्टर्सनी रंगवून, सचिनच्या आतापर्यंतच्या प्रवासाची एक छोटीशी चित्रफित बनवून त्याच्या आठवणींना उजाळा देऊ शकता. अगदी पार्टीत सगळे सचिनची वेशभूषा, खास करून कुरळ्या केसांचा विग घालून सामील होऊ शकता. बरं हे सगळं करताना सचिनचे आवडते खेकडे मेन मेन्यूमध्ये नक्की ठेवा.

३. साऊथ आफ्रिका फिवर :
यासाठी तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमधील नियॉन रंगांच्या कपडय़ांना पुन्हा बाहेर काढावे लागेल. त्याचबरोबर फ्लोरल िपट्र्स इज मस्ट. तुम्ही जर फार्महाऊसवर पार्टी आयोजित करत असाल तर शेकोटी बाजूला बाब्रेक्यू आणि सोबत जॅझ म्युझिक वाजवून एक माहोल तयार करू शकता. तुमच्या ग्रुपमध्ये कोणी गिटार वाजवणारा असेल तर क्या बात. बाब्रेक्यू बरोबर मद्याचे पेले रिचवत मस्तपकी तुम्ही पार्टी उपभोगू शकता.

४. मॅड ओव्हर सोशल मीडिया :
हल्ली कुठेही कितीही धमाल पार्टी चालली असली तरी त्यातही काही जण आपल्या मोबाइलला चिटकून असतात. कोणी फेसबुकवर फोटोज अपलोड करत असतं, तर कोणी ट्विटरवर चिवचिवाट करत असतं. त्यांना बाकी पार्टीशी काही घेणंदेणं नसतं. ते आणि त्यांची वॉल बस. मग अशांसाठी हीच वॉल पार्टीत प्रत्यक्षात आणली तर.. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त पार्टीला येताना प्रत्येकाला सफेद किंवा इतर कोणत्याही पेस्टल रंगातला प्लेन टीशर्ट घालून यायला सांगायचं. पार्टी सुरू झाल्यापासून त्यातील प्रत्येक गोष्ट आपण एकमेकांच्या टीशर्टवर लिहित जायचं. मग एखाद्याचं अतिखाणं असो वा कोणाचा पकाव जोक, एखाद्याची विचित्र डान्स मूव्ह असो वा कोणाची क्रेझी हेअरस्टाईल.. प्रत्येक गोष्ट ही वॉलवर लिहिल्याप्रमाणे टीशर्टवर लिहित सुटायचं. त्यावर लाईक, कमेंट गोळा करायच्या. मुख्य म्हणजे अशा पार्टीजमध्ये कित्येक नवीन रिलेशन्स बनतात आणि जुनी तुटतात. या सगळ्यांच्या नोंदीसुद्धा यावर करायच्या. काय माहीत पार्टीत येताना ‘सिंगल’ असलेला जाताना मात्र ‘इन रिलेशनशिप’ म्हणून मिरवत जाईल.

५. फ्रीडम ऑफ चॉइस थीम :
आज प्रत्येकाला त्याच्या वाटणीचं स्वातंत्र्य हवं असतं. मत मांडण्याचं स्वातंत्र्य, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य आणि अजून बरंच काही. अशावेळी पार्टीला जाताना आपल्या मूडनुसार वागण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं ना. म्हणून ही थीम. जर तुम्ही एखाद्या फार्म हाऊस किंवा रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित करणार असाल तर ही थीम ट्राय करायला काहीच हरकत नाही. यात करायचं काय, तर.. प्रत्येकाने त्याला हवं त्याप्रमाणे तयार होऊन यायचं. मग कोणी वेस्टर्न लुकमध्ये येईल तर कोणी इंडियन. एखादा बरमुडा आणि टी शर्टमध्ये पण येऊ शकतो. पार्टीत एकच डान्स फ्लोर ठेवण्याऐवजी कॅरम, चेससारखे हलके फुलके गेम्स, एखादा विडीयो गेम, कुठेतरी टीव्हीवर एखादा कॉमेडी सिनेमा, कुठे तरी कराओके तर कुठे फोटोसेशन आणि या सगळ्यात स्वििमग पूल असेल तर मस्तंच. पार्टीचा बुफेपण नेहमीप्रमाणे ठरावीक डिशेसचा न ठेवता असा ठेवावा जो प्रत्येक जण आपल्या पसंतीप्रमाणे चार गोष्टी एकत्र करून त्याक्षणी २ मिनिटांत बनवून घेऊ शकेल. उदा. बर्गर, पास्ता, पिझ्झा यांसारख्या डिशेस, चाट किंवा कोपऱ्यात एखादा बाब्रेक्यू. त्यात कॉकटेल्स आणि मॉक्टेल्स पण आलीच.

६.  ब्रँन्डिंग मायसेल्फ :
आज प्रत्येकाला साध्या पेनापासून ते कपडय़ांपर्यंत प्रत्येक गोष्ट ब्रँन्डेड लागते. तुमची पार्टी ब्रँन्डशिवाय कशी पूर्ण होऊ शकेल? पार्टीचा ड्रेसकोड ठरवताना एखाद्या उत्पादनाला डोळ्यांसमोर ठेवा. उदा. कोल्ं्रिडक्स, एनर्जी िड्रक्स, वेफर्स किंवा चॉकलेट्स आणि प्रत्येकाला त्या उत्पादनातील त्याच्या आवडीच्या ब्रँन्डनुसार तयार होऊन यायला सांगा. फक्त उत्पादन निवडताना ही काळजी घ्या की त्यात जास्तीत जास्त ब्रँड्स असतील आणि त्यांची रंगसंगती आकर्षक असेल. तरच पार्टीत विविधता येईल. पार्टी रंगात आल्यावर अचानकपणे एकेकाला स्टेजवर बोलावून त्याच्या ड्रेसविषयी चार शब्द बोलायला सांगा आणि एकेकाची काय मजेशीर उत्तरं मिळतायत ते पाहा.

एकूण काय आपल्याला पार्टी करायचे बहाणे हवे असतात. ते शोधाच, पण त्याचसोबत तुमची पार्टी अजून इंटरेिस्टग कशी होऊ शकते, याचीपण शक्कल लढवा.