हुडहुडी भरवणाऱ्या थंडगार वातावरणात गरमागरम, चटकदार आणि स्पायसी फूडची सध्या कॅम्पसमध्ये डिमांड आहे. तळहाताएवढा समोसा आणि बटाटावडा, त्यातील लाल चटणीसोबत तळलेल्या हिरव्यागार मिरच्या, वर सोडलेलं बारीक मीठ अन् त्याच्यासोबतीला एखादी चटणी ही प्रत्येकालाच परवडणारी डिश कॉलेजिअन्सची ऑल टाइम फेव्हरेट. कॅम्पसमधील तरुणांचे खाण्याचे नखरे सध्या खूप वाढलेत. थंडीच्या माहोलमध्ये खाण्यासाठी काही चटकमटक मिळालं नाही तर पुढचं लेक्चर अटेंड करायचं कसं! म्हणूनच कॉलेजिअन्स पोटाची काळजी घेण्यासाठी कॉलेज रोडवर फेमस असणाऱ्या एका छोटेखानी पण चांगल्या टपरीकडे वळतात. कॉलेजिअन्सचा थंडीतील खाण्याचा नखरा सांगतेय,प्रियांका पावसकर
कॉलेजचं हेक्टिक शेडय़ुल्ड सांभाळता सांभाळता थंडी ‘एन्जॉय’ करायची असेल तर कॅम्पसमध्ये टाइमपास या व्यतिरिक्त दुसरा अल्टीमेट पर्याय म्हणजे ‘खवय्येगिरी.’ कारण थंडी म्हटलं की, भुकेची लाट उसळते आणि आपल्या यंगिस्तानकडून तर या काळात भुकेला आग्रहाचं निमंत्रण असतं. मस्त गारव्यात कॅम्पसमध्ये पायपीट झाल्यावर पोटातही कावळे ओरडायला लागतात आणि मग एखादा खवय्या ग्रुप वर्गात शिरल्याबरोबर हाय, करायच्याही आधी ‘आज डब्यात काय आणलंय?’ हे विचारतात. वर्गातली डबा आणणारी सभ्य पोरं यांना खादाड ग्रुप म्हणून हिणवतात.. अर्थात त्याला तसं कारणसुद्धा असतं. शिस्तीत डबा आणणाऱ्यांचे डबे संपवल्यानंतरही या खवय्यांचा मोर्चा पुन्हा कॉलेजच्या कॅन्टीन किंवा नाक्यावरच्या एखाद्या रेस्टॉरंट अथवा धाब्यावर खाण्यासाठी तासन्तास रेंगाळताना दिसतो.
थंडीच्या माहोलमध्ये खाण्यासाठी काही चटकमटक मिळालं नाही तर पुढचं लेक्चर अटेंड करायचं कसं! म्हणूनच कॉलेजिअन्स पोटाची काळजी घेण्यासाठी कॉलेज रोडवर फेमस असणाऱ्या एका छोटेखानी पण चांगल्या स्टोअरमध्ये जातात. जिथे प्रत्येकाच्याच जिभेची मागणी पुरवली जाते. कॉलेज जीवनात अनेक चांगली ठिकाणं फिरूनही त्या फेमस जागेवरील पदार्थ खाण्याचं या खवय्यांना अप्रूप असतं. कॉलेजच्या जवळपास कोणत्याही टोकाला एखादा हॉट आयटम खायला मिळाला तर त्याबद्दल कधी जाऊन कॉलेज कट्टय़ावर सांगतो असं कॉलेजिअन्सना होतं. अशा वेळी थंडीतील भुकेच्या नावावर घरून मिळालेल्या पॉकेटमनीचा पुरेपूर वापर केला जातो आणि मग हे कॉलेजिअन्स कॅम्पसमध्ये आजिबात वेळ न दवडता असं चांगलंचुंगलं खाण्यासाठी त्या चíचत जागेकडे धूम ठोकून हजेरी लावतात.
हुडहुडी भरवणाऱ्या थंडगार वातावरणात गरमागरम, चटकदार आणि स्पायसी फूडची सध्या कॅम्पसमध्ये डिमांड आहे. तळहाताएवढा समोसा आणि बटाटावडा, त्यातील लाल चटणीसोबत तळलेल्या हिरव्यागार मिरच्या, वर सोडलेलं बारीक मीठ अन् त्याच्यासोबतीला एखादी चटणी ही प्रत्येकालाच परवडणारी डिश कॉलेजिअन्सची ऑल टाइम फेव्हरेट. ऑल सिझन डिमांड असणारे चाट पदार्थ थंडीतही कॉलेजिअन्समध्ये भाव खाताएत. चाट आयटमसाठी कॉलेज खवय्यांची वाढती मागणी पाहून पँन्ट्री किंवा छोटेखानी स्टोअर्स मध्येही चाट तयार केले जाऊ लागलेत हे विशेष.
बर्गर हे पदार्थही सध्या खवय्यांमध्ये डिमांडेड आहेत. थंडीमध्ये तर हाच पफ नावाचा पदार्थ कॅम्पसमध्ये चांगलाच जोर धरून आहे. त्यात चीज पफ, मन्चुरियन पफ, पनीर पफ असे अनेक प्रकार चाखावयास मिळेतायेत. बरं हे पदार्थ देताना थंड आहेत, कधीचे आहेत असं म्हणायला वाव नाही. कारण प्रत्येक वस्तू तुम्हाला ओवनमधून गरमागरम मिळते, त्यामुळे कॉलेज खवय्यांची खाण्याची मजा शाबूत राहतेय. या काळात इटालियन, मेक्सिकन खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी कॉलेजिअन्स चायनीज कॉर्नर किंवा नॉनव्हेज रेस्टोमध्येही गर्दी करू लागलेत. कारण स्पायसी फूडचं बेस्ट कॉम्बीनेशन याशिवाय इतरत्र कुठेच नसतं. बेबीकॉर्न, व्हेज मशरूम, थाई, शेजवान, मेक्सिकन व्हेज, रशियन सलाड, ग्रिल्ड चिकन वगरे पदार्थ कॉलेज खवय्यांच्या विंटर स्पेशल फूडच्या हिटलिस्टमध्ये आहेत.
थंडीच्या दिवसात कॉलेजिअन्सची खवय्येगिरी ही अधिकच वाढलेली असते. या दिवसांत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सर्वकाही मिळतंच असं नाही. त्यामुळे पारंपरिक पदार्थ खाऊन कंटाळलेले कॉलेजिअन्स कॉलेजच्याच शेजारी असलेल्या आवडीच्या रेस्टोमध्ये जात आहेत. आवडता मेन्यू केल्यावर त्यावर मस्त ताव मारून थंडीतली खवय्येगिरी ही मंडळी एन्जॉय करताना दिसत आहेत. थंडीतल्या खादाडीचे अनुभव प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी अशाच काही कॉलेजमधील खवय्यांची घेतलेली प्रातिनिधिक झलक.
थंडीचा नखरा
हुडहुडी भरवणाऱ्या थंडगार वातावरणात गरमागरम, चटकदार आणि स्पायसी फूडची सध्या कॅम्पसमध्ये डिमांड आहे. तळहाताएवढा समोसा आणि बटाटावडा, त्यातील लाल चटणीसोबत तळलेल्या हिरव्यागार मिरच्या, वर सोडलेलं बारीक मीठ अन् त्याच्यासोबतीला एखादी चटणी ही प्रत्येकालाच परवडणारी डिश कॉलेजिअन्सची ऑल टाइम फेव्हरेट.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-12-2012 at 12:50 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter strut