वन पीस ड्रेस
वन पीस ड्रेस कुठल्याही पार्टीत तुमचा लूक उठावदार करतोच, पण रोज कॉलेजला घालायलाही तो आयडियल ठरतो. असा एकतरी ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवाच. फ्लोरल िपट्र असलेला हा ड्रेस तर कोणत्याही ओकेजनमध्ये घालायला चांगला ठरेल, असे वाटते. याला वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीजबरोबर घातल्यास दर वेळी तो तुम्हाला नवीन लूक देईल. तुम्ही सफेद जॅकेट, स्कार्फ किंवा लेिग्गगबरोबरही हा ड्रेस घालू शकता.
यूएसपी उठावदार फॅशन, फ्लोरल प्रिंट
ठिकाण: बांद्रा फॅशन स्ट्रीट
किंमत: १२०० रुपये

मल्टिकलर बॅग
कॉलेजसाठी कोणती बॅग निवडावी हा एक मोठा यक्षप्रश्न असतो. ती बॅग पुस्तकं राहतील इतकी मोठी तर हवीच असते, पण ट्रेंडी पण असली पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर मला या बॅगने दिलं. मोठी आहे त्यामुळे पुस्तकं ठेवायचा प्रश्न सोडवतेच, पण मल्टिकलर असल्यामुळे इंडियन आणि वेस्टर्न सगळ्या लूक्सवर मॅच होते. याच्यावर असलेल्या कलाकुसरीमुळे बाजारातील इतर बॅग्सपेक्षा ती थोडी हटके ठरते.
यूएसपी – मोठी तरीही ट्रेंडी  बॅग
ठिकाण : माहीम
किंमत : १६०० रुपये

फ्लोरोसंट ब्रेसलेट
फ्लोरोसंट रंगांचा ट्रेंड सध्या चलतीत आहे. जर हे भडक रंग घालायचे कसे ही भीती तुम्हाला सतावत असेल तर हे ब्रेसलेट त्यावर मस्त उपाय आहेत. फ्लोरोसंट कलरमधील ही ब्रेसलेट तुमच्या एखाद्या सफेद किंवा काळ्या कुर्तीबरोबर मस्त दिसतीलच, पण तुमच्या सिम्पल ड्रेसचा लूकच पालटू शकतो. पुन्हा ही ब्रेसलेट्स कुठल्याही आऊटफिटवर सूट होतील. जर टी-शर्ट आणि जीन्स घालत असाल तरी प्लेन टी-शर्टवरसुद्धा घालता येतील. फक्त ती किती घालायची हे तुमच्यावर आहे.
यूएसपी – फ्लोरोसंट कलर
ठिकाण : बांद्रा हिल रोडवर
किंमत : १० रुपये

हटके रिंग
रिंग्स या सगळ्यांनाच आवडतात. कधीही घालता येतात. एखाद्या ड्रेसवर घालायला मॅचिंग नेकलेस तुमच्याकडे नसेल तर अ‍ॅक्सेसरीजची उणीव भरून काढण्याचं काम रिंग करते. तशीच ही रिगदेखील आहे. हिचं वेगळेपण असं की, ही दोन बोटांत घालायची रिंग आहे. त्यामुळे पार्टीत तुम्हाला स्वत:ला जरा हटके लूक द्यायचा असेल तर ही अंगठी मी तुम्हाला सुचवीन. साधेसे मोती असलेली ही अंगठी तुम्ही ड्रेस, टी-शर्ट जीन्सवर घालू शकता. ग्रेट अ‍ॅक्सेसरी ठरेल.
यूएसपी – अंगठी दोन बोटांत घालता येते
ठिकाण : कुलाबा कॉजवे
किंमत : २०० रुपये

Story img Loader