माध्यम हा समाजमनाचा आरसा असं मानलं जातं. पण हल्लीची माध्यमातली स्त्री आणि प्रत्यक्षातली स्त्री यात नेमकं काय साम्य आहे ? टीव्ही मालिका आणि जाहिरातींमधून दाखवलेली ‘आजची तरुण मुलगी’ यंग जनरेशनला कशी वाटते, हे शोधण्याचा हा प्रयत्न..
विभावरी देशपांडे या अभिनेत्रीची एक सोशल नेटवìकग साइटवर वाचलेली ही पोस्ट, ‘‘एका मुलीचे वडील तिला ती फक्त सावळी असल्याने एका चांगल्या, सुशिक्षित आणि घरंदाज, गाडी, बंगला वगरे असणाऱ्या मुलाशी लग्न करायला सांगतात. जे त्या मुलीला करायचं नसतं. त्यानंतर अचानक कुठल्याशा फेअरनेस क्रीमबद्दल तिला माहिती मिळते आणि मग ती ते वापरायला लागते. सो कॉल्ड ‘गोरी’ होते आणि मग तिच्या वडलांना सांगते अजून फक्त दोन र्वष लागतील मला एक घर आणि गाडी घ्यायला. त्यानंतर मग मी अगदी परफेक्ट मॅच होऊ शकेल त्या मुलाशी. तात्पर्य – सावळ्या मुली म्हणजे आत्मविश्वासाचा आणि कुठल्याही कौशल्याचा, क्षमतेचा अभाव असलेल्या. त्यापेक्षा त्यांनी लग्नं करून नवऱ्याबरोबर संसार थाटलेला चांगला. शिक्षण, कौशल्य, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी केवळ शून्य !’’
खरं तर हाच एक सध्याचा साचेबद्ध ट्रेण्ड बनत चाललाय. सगळ्या जाहिरातींमध्ये आणि सीरियल्समध्ये, डेली सोप्समध्ये स्त्रियांचा प्रेझेन्स तर एक अविभाज्य घटकच! त्यांच्याशिवाय ते सारंच अपूर्ण! पण तरीही या सगळ्याचा एक साचा तर ठरलेलाच. डेली सोप्समध्ये नायिका या बिचाऱ्या, घरकाम करणाऱ्या, भाजी निवडणाऱ्या (मग ती भाजी नेहमी पालकचीच असते, कुठल्याही वेळी पाहा) तरीही गोड बोलून (बावळट आणि बिनडोक पद्धतीने) सगळ्यांचं मन जिंकणाऱ्या, तर याउलट त्यातल्या खलनायिका. एकदम भडक कपडे, मॉडर्न पेहराव घातलेल्या.. एक तर एकदम व्हाइट शेड असते आणि दुसरीकडे एकदम ब्लॅक. मधली ग्रे शेड तर फारशी कुठेच पाहायला मिळत नाही. कुठलंही चॅनेल चालू केल्यावर एकच सीरियल सगळीकडे लागलीय, असं वाटावं इतकं या सगळ्यात साधम्र्य असतं.
यावर बोलताना पुण्यातला आदित्य साठे म्हणाला, ‘आज मुळात ज्या सीरिअल्स चालतात त्यात रोज आपल्या आजूबाजूला दिसणारी स्त्री कधीच नसते. सासूविरुद्ध कारस्थानं, घराचा व्यवसाय बुडवण्यासाठीचे कट, काय वाट्टेल ते चालू असतं. आणि स्त्रीप्रधान सीरिअल्स म्हटल्या तरी त्यात त्या नायिकेला समाजातील आणि कुटुंबातील इतर स्त्रियाच कशा त्रास देतात हेच दाखवलं जातं.’ जाहिरातींबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, ‘त्यावर विचार केला तर स्त्रियांनी अंगविक्षेप केल्याशिवाय जाहिरात होऊच शकत नाही, असा मापदंडच आहे जणू. साधी ‘स्लाइस’ची जाहिरात बघा. मँगो पल्प किंवा ड्रिंकसारखं साधं प्रॉडक्ट आहे. तर मग त्यात सिडक्टिव्ह एक्स्प्रेशन्स वापरायची काय गरज आहे? आंब्याचा रस खाल्ल्यावर काय तुम्ही सेक्शुअली एक्साइट होणार आहात का?’
याउलट सध्या टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या एलआयसी किंवा हॅवेल्सच्या जाहिराती पाहिल्या तर कुठे तरी हे चित्र बदलल्यासारखं वाटतं. तशीच एक जाहिरात बनवली आहे ती जयसिंग यांनी.. टपरवेअर प्रॉडक्ट संदर्भात. यात स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा एक मुद्दा स्त्री सरपंचांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे दाखवला गेलाय. आणि त्याची टॅगलाइनसुद्धा ‘इफ शी कॅन, यू कॅन’ यामधूनच खऱ्या अर्थाने प्रेरित होतो. याबद्दलच वनिता जेठानी या मत्रिणीला विचारल्यावर ती म्हणाली, ‘पर्सनल केअर प्रॉडक्टच्या सगळ्याच जाहिरातींमध्ये स्त्रियाच दाखवलेल्या असतात. कारण स्त्रियाच घराची जबाबदारी उचलतात आणि घरंही चालवत असतात, घरातल्या प्रत्येकाची काळजी घेत असतात. जे बऱ्याच अंशी खरं असतं. त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही.’ पण पुन्हा सीरियल्सबद्दलचं मत विचारल्यावर वनिता म्हणाली की, हल्ली बहुतेक सीरियल्समध्ये इमोशनल अत्याचार वगरे दाखविला जातो. पण काही सीरियल्समध्ये खरंच काही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे दाखविल्या जातात. जसं ‘अफसर बिटीयां’ या सीरियलमध्ये एका गरीब घरातील मुलगी ‘आयएएस’साठी प्रयत्न करताना दाखविली आहे, जे खरंच स्तुत्य आहे. आणि आजकाल सुना सासूविरुद्ध बोलणाऱ्याही दाखवल्या जातात.
फक्त तिचा त्रास सहन करणाऱ्या नसतात. हीसुद्धा काही अंशी चांगली गोष्ट आहे. शिवाय रोमँटिक सीरियल्समध्ये मुली लाजाळू वगरे दाखवल्या जात नाहीत. याउलट त्या बोल्ड आणि आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या दाखवल्या जातात, तोसुद्धा एक बदलच म्हणावा लागेल,’ असंही वनिता म्हणाली.
सीरियल्सबद्दल ठाण्यातल्या अनुराग जाधव या मित्राचं म्हणणं असं पडलं की, देवयानी सीरियलमध्ये तर अत्याचार एवढा आहे की, नायिकेला चाबकाने वगरे फटके मारतात आणि त्यात कहर म्हणजे ते सारं बघायला स्त्रियांनाच मजा येत असते. याचं लफडं हिच्याशी, तिचं तिसऱ्या कुणाशी आणि लग्न तर हळदी-कुंकू केल्याप्रमाणे करतात. स्त्रियांवर अत्याचार नाही झाला तर सीरियल ‘हिट’ होत नाही, असं एक घाणेरडं समीकरण तयार झालंय.’ जाहिरातींचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डीओच्या जाहिराती. त्यात इतका अतिरेक असतो की, फक्त डीओ मारला म्हणजे मुली जवळ आल्याच समजा! ही अशी वृत्ती असते का स्त्रियांची,’ हाच प्रश्न अनुरागनं उपस्थित केला.
काही जाहिराती आणि सीरियल्ससुद्धा चांगला विषय हाताळत असतात यात शंका नाही. पण ते अतिरंजक बनवण्याच्या फंदात सगळी खिचडी करपून जाते. परिणामी त्यांची मूळ चव निघून जाते. सीरियलमधल्या स्त्रियांचा पेहराव तर किती सारे प्रश्न उपस्थित करतो. एवढय़ा भरजरी साडय़ा नेसून त्या घरात काम कशा करतात? त्यांच्या दागदागिन्यांकडे आणि भरजरी साडय़ांकडे पाहून तर हा प्रश्न पडतोच की घरात किंवा ऑफिसमध्येही अशा साडय़ा नेसून आणि तीन पदरी आणि त्या जोडीला अजून एक मोठं मंगळसूत्र घालून यांना कामं तरी कशी सुचतात? बरं त्या वापरत असलेल्या मोठय़ा टिकल्या, दागिने! एखादी तरी बाई रस्त्यात त्या तशा टिकल्या लावून फिरताना दिसते का? त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तर हा प्रश्न सतत पडतो की नक्की दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कुठल्या काळातल्या स्त्रिया दाखवायच्या आहेत? ज्यांनी किलोभर मेकअप करून नुसती रंगरंगोटी केलेली असते की, त्यामागे दाखवता येऊ शकणारं खरं चित्र कुठं असतं?
मुंबईतली स्वाती मोहन जाहिरातींबाबत गप्पा मारताना बोलली की, काही चहाच्या जाहिरातींमध्ये स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा असतो जो खरंच चांगला आहे. पण कॉस्मेटिक्स आणि फिटनेसच्या जाहिरातींमध्ये हे खूप प्रकर्षांने दाखवलं जातं की मुली त्यांच्या शरीराबद्द्दल आणि चेहऱ्याबद्दल समाधानी नाहीयेत. अरे? मग बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाचं काय? तिच्या मताप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्सच्याच जाहिराती काय ते मुलींना आणि स्त्रियांना एन्करेज करणाऱ्या असतात. एक अशाच प्रॉडक्टची जाहिरात आहे जिथे एक मुलगी पुढे जाऊन आर्मी ऑफिसर बनते, म्हणजे मुलींनी त्यांच्या यशात कुठलाच अडथळा येऊ देऊ नये हे सांगणारी ही जाहिरात खरंच फायदेशीर आहे असं ती म्हणाली. पण अजूनही काही जाहिरातींमधून आणि बऱ्याच सीरियल्समधून पुरोगामी विचारच पाहायला मिळतात. ते थोडं बदललं तर जास्त प्रमाणात सीरियल्स पाहणाऱ्या स्त्रियांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. या सगळ्यावरच शेवटी एक छान स्टेटमेंटसुद्धा स्वातीने केलं. ती म्हणाली, सीरियल्समधील स्त्रियांमधून समाजाचं, जनमानसाचं प्रतििबब उमटत असतं. सो एव्हरी अ‍ॅड अ‍ॅण्ड सीरिअल शुड टॉक अबाउट दि चेंज ऑर शुड बी दॅट चेंज!

व्हिवा वॉल
तरुण मित्र- मैत्रिणींनो.. मालिका आणि जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणाऱ्या तरुण स्त्रीप्रतिमा तुम्हाला कशा वाटतात, त्या खऱ्या वाटतात? कालसुसंगत वाटतात की काळाच्या मागे जाणाऱ्या? कोणती जाहिरात, कुठलं पात्र तुम्हाला पटतं? तुमचं म्हणणं, तुमचं मत आमच्यापर्यंत पोचवा. viva.loksatta@gmail.com   या आयडीवर मेल करून. पुढच्या अंकातल्या ‘व्हिवा वॉल’मध्ये तुमच्या पोस्टचा नक्की समावेश करू. तुमचं म्हणणं थोडक्यात, मुद्देसूद स्वरूपात देवनागरी लिपीत लिहून पाठवा. सोबत तुमचा फोटोही पाठवा. सब्जेक्ट लाइनमध्ये व्हिवा वॉल – मीडिया असा उल्लेख नक्की करा.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
Story img Loader