स्त्रियांची अंतर्वस्त्रं हा आपल्याकडे गोपनीयतेचा विषय मानला जातो. त्याविषयी चर्चा तर सोडाच, चारचौघात ‘ब्रा’चा उच्चार करणंसुद्धा पाप असल्यासारखं वाटतं. आधुनिक कपडय़ांमध्ये आत्मविश्वासपूर्वक वावरायचं असेल तर अंतर्वस्त्रांची निवडही अचूक असायला हवी. नेमकी याविषयीच आपल्याकडे अनास्था आहे. योग्य मापाची ब्रा वापरणं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या ‘व्हिवा’मध्ये या बोलायला अवघड पण आवश्यक अशा विषयासंदर्भात चर्चा केली आहे.
स्त्रियांची अंतर्वस्त्रं हा आपल्याकडे गोपनीयतेचा विषय मानला जातो. त्याविषयी चर्चा तर सोडाच चारचौघात ‘ब्रा’चा उच्चार करणंसुद्धा पाप असल्यासारखं वाटतं. त्यामुळेच की काय, अंतर्वस्त्रांबाबत, त्यातल्या प्रकारांबाबत, उपलब्धतेबाबत आजच्या भारतीय मुलीला अगदी कमी माहिती असते. परिणाम – अयोग्य मापाची अंतर्वस्त्रं वापरणं. आजची मुलगी अनेक बाबतीत आधुनिक झालीय, फॅशन कॉन्शस झालीय. वेगवेगळ्या स्टाइलचे, वेगवेगळ्या आधुनिक प्रकारचे कपडे घालणं तिला आवडायला लागलंय. पण अशा कपडय़ांसाठी आवश्यक असणारी अंतर्वस्त्र मात्र ती त्याच जुन्या पद्धतीची वापरतेय, किंवा अयोग्य पद्धतीनं वापरतेय. त्यामुळे फॅशनेबल कपडय़ातसुद्धा काही मुली बेंगरुळ दिसतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि कायमचा न्यूनगंड मनात तयार होतो.
आधुनिक कपडय़ांमध्ये आत्मविश्वासपूर्वक वावरायचं असेल तर अंतर्वस्त्रांची निवडही अचूक असायला हवी. योग्य मापाची ब्रा वापरणं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या ‘व्हिवा’मध्ये या बोलायला अवघड पण आवश्यक अशा विषयासंदर्भात चर्चा केली आहे. एका मोठय़ा हॉस्पिटलशी संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलतानाही या विषयी आपल्या स्त्रियांच्या मनात किती अनास्था असते याची जाणीव झाली. ‘महागडे, फॅशनेबल कपडे घालणाऱ्या स्त्रिया अंतर्वस्त्रांबाबत कमालीची अनास्था दाखवतात. थोडे पैसे या गोष्टीवरही खर्च करा, असं त्यांना म्हणावंसं वाटतं’, हा त्यांचा अनुभव.
अंतर्वस्त्रं हा तसा खासगी मामला. इंग्रजीत याला ब्रीफ्स म्हणतात. छोटी पण महत्त्वाची गोष्ट. पण आपल्याकडे आहे तितकी दुर्लक्षित ही इतरत्र कुठेही नाही. पाच मिनिटात होणारी ही खरेदी. दुकानात जाऊन खाली बघत सांगितलेला साईझ आणि त्यावर तो देईल तो ठरलेला माल घेऊन परत यायचं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा