लहानपणी आजी-आजोबांसोबत नागपूरला राहताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकायचे. त्यांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटायचं आणि मलाही काही बोलायचं असायचं. केवळ मलाच नाही तर आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याकडे आणि माझ्या आईकडे आपलं मन मोकळं करावंसं वाटायचं. या सुसंवादाकडे बारकाईने पाहिल्यावर दिसलं की, आई-आजी सगळय़ांचं म्हणणं ऐकून घेतात, तेही कुणाबाबत डावं-उजवं न करता. हेही लक्षात आलं की, जगात ‘ऐकून घेणाऱ्यांची’ संख्या खूप कमी आहे. पुढे मी लोकांशी बोलू लागले. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली. त्यांना कदाचित जराशी विचारपूस केल्यामुळे बरं वाटलं असावंङ्घ मला वाटलं, आपण लोकांना मदत करायला हवी. मग आपोआप लोकांचं ऐकता येऊ शकेल, अशा विषयांच्या अभ्यासाकडे वळले. या निर्णयात आई-बाबांचा भक्कम पाठिंबा मिळाला आणि मिळतो आहे. तो नसता तर माझ्या करिअरचा प्रवास सुरूच झाला नसता. मानसशास्त्राविषयी एकेक पैलू उलगडायला लागल्यावर वाटलं की, हेच तर सगळं माझ्या डोक्यात होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मानसशास्त्राचा अभ्यास करताना सगळय़ा पर्यायांचा विचार करायचा ठरवलं होतं. दिवसाअखेरीस विचार करताना कुणाला मदत करता आली तर आपल्याला बरं वाटतं, हेही मला जाणवलं होतं. काऊन्सेिलग सायकॉलॉजीविषयी ‘एम्पॉविरग पीपल टू लिव्ह देम लाइफ इन अ बेटर वे’ असं वाचलं होतं. समुपदेशन क्षेत्रात बरंच काही करण्याजोगं आहे हे कळलं. महाविद्यालयीन जीवनात मी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी केल्या, शिकले. त्यामुळे जीवनातलं वास्तव समजून घेता आलं. शिवाय प्राध्यापक, सहाध्यायांशी होणाऱ्या संवादांतून करिअरची दिशा ठरायला सुरुवात होऊन हळूहळू व्यक्तिमत्त्व विकास होत गेला. मार्च २०२० मध्ये मी दिल्लीतील ‘लेडी श्री राम कॉलेज’मधून बी.ए. (सायकॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स) झाले.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील बहुतांशी पुस्तकांचे लेखक अमेरिकेतले होते. अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्राइतकंच समुपदेशन क्षेत्राला महत्त्व दिलं जातं. मग तिथे जाऊन शिकावं असं वाटलं. माहिती शोधताना कळलं की, पेनसेलव्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापकांनी या क्षेत्रात बहुमोल योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्याची आस वाढली. त्यांना माझी कळकळ आणि मला काय म्हणायचं आहे, ते नेमकं कळेल असं वाटलं. हे विचार सुरू असताना करोनाचं संकट उद्भवलं. त्या काळात भारतातल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा; पण त्या अभ्यासक्रमात फारसा रस वाटला नाही. तेच ते पुन्हा अभ्यासते आहे असं वाटल्यानं तो सोडला. तेव्हाही आई-बाबांनी माझ्या मनानुसार अभ्यासक्रम निवडायला आणि त्यासाठीचं ठिकाण ठरवायला परवानगी दिली. मी परदेशातील अभ्यासक्रमांची माहिती काढली. सीनिअर्सशी बोलले. दरम्यान, फक्त अभ्यास एके अभ्यास न करता इंटर्नशिपसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. त्यापैकी ‘टाटा स्ट्राइव्ह’कडून बोलावणं आलं. त्यांच्या प्रकल्पातील इंटर्नशिप करताना राजस्थानमधल्या १६,००० गरीब विद्यार्थ्यांसाठी करिअर काऊन्सिलिंगचं मॉडय़ुल तयार करायचं होतं. नंतर शॉर्टलिस्ट प्रोफेशनल्समध्ये मी एचआर ॲण्ड रिक्रुटमेंटचा अनुभव मिळवत ह्युमन रिसोर्सेस असोसिएट म्हणून आधी इंटर्नशिप आणि नंतर नोकरीही केली. ही सगळी कामं वर्क फ्रॉम होम स्वरूपाची असल्याने सोयीचं ठरलं.
दरम्यान, मी तीन ठिकाणी प्रवेशासाठी अर्ज केले. त्या अर्जात संस्था व महाविद्यालयात, करिअर काऊन्सिलिंग आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करायचं आहे, असं नमूद केलं होतं. अनेकांना नोकरीची, करिअरची, ती टिकवण्याची किंवा दुसरी मिळवण्याची चिंता असल्याने त्या संदर्भात विचार केला जातो. मला त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे. माझं पहिलं प्राधान्य होतं त्याच फिलाडेल्फियामधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ पेनसेलव्हेनिया ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन’मधल्या M. S. Ed in counselling and mental health services या वर्षभराच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. ऑगस्ट २०२१ मध्ये मी इथे पोहचले ते कोणत्याही अडथळय़ांविना. इथे जगभरातून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे अनेक प्रकारच्या संस्कृती आणि परंपरांची, तिथल्या विविध विषयांची तोंडओळख झाली. या अभ्यासक्रमात केवळ अभ्यास नव्हे तर प्रॅक्टिकल वर्कही करायचं होतं.
आम्हाला ऑगस्टपासून आतापर्यंत फक्त डिसेंबरमध्ये दहा दिवसांची सुट्टी होती, पण आजूबाजूला पॅशनेट लोक आणि प्राध्यापक वावरत असल्याने अभ्यासाचं अवडंबर वाटत नाही. मीही तितक्याच उत्साहाने आणि आस्थेने अभ्यास करते आहे. करिअर काऊन्सिलिंग करणं, हे माझं मुख्य ध्येय आहे. सध्या वैयक्तिक पातळीवर करिअर थिअरी तयार करते आहे. करिअर काऊन्सिलिंगच्या लेक्चरला बसल्या बसल्या माझ्या डोक्यातली थिअरी लिहून काढली. ती वाचल्यावर लक्षात आलं की सातवीपासून आतापर्यंत जे शिकले, जी निरीक्षणं केली ते सगळं त्यात समाविष्ट झालं आहे. ती पुन्हा वाचल्यावर वाटलं, ही थिअरी नक्की काम करेल, तो ‘आय कॅन डू धिस’ असं वाटणारा क्षण कायमच लक्षात राहील. या थिअरीच्या अनुषंगाने मी करिअर डेव्हलपमेंट, प्रोफेशनल डेव्हलपमेंट या क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून त्यांचं मार्गदर्शन घेते आहे. अनुभवावर आधारित करिअर कसं घडवता येईल, यावर मी भर देणार आहे. भारतात संधींची कमतरता असल्याने ज्या क्षेत्रांची माहिती आहे ते काम लोक करतात, पण त्याच क्षमता आणि कौशल्यं दुसऱ्या क्षेत्रातही वापरता येऊ शकतात नि यशस्वी होता येऊ शकतं हे कुणी सांगत नाही. हे सांगतील अशा थेट विद्यार्थ्यांशी निगडित असणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांपर्यंत ही थिअरी पोहोचवायची आहे.
जुलै २०२२ पासून माझा M. Phil. Ed in Professional Counseling हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. मेंटिरग आणि काऊन्सेलिंगच्या माध्यमातून करिअर काऊन्सेलिंग अधिक प्रभावी कसं होऊ शकतं, हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. लोक करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतात, तेव्हा त्यामागे अनेक मुद्दे दडलेले असतात. अशा मुद्दय़ांचा विविधांगी सखोल विचार करून योग्य निर्णय सक्षमपणे घेण्यासाठी मी लोकांना समुपदेशन करू शकेन, अशा काही गोष्टी समुपदेशनाच्या प्रशिक्षणामुळे कळल्या. आम्हाला मागच्या सेमिस्टरमध्ये ‘करिअर काऊन्सेलिंग’ हा विषय शिकवला गेला. त्यासाठी अभ्यासपुस्तक लिहिणारे डॉ. स्पेन्सर न्हाईल्स हे करिअर काऊन्सेलिंगमधलं सगळय़ात मोठं नाव आहे. त्यांना मी अभ्यासाच्या संदर्भात ईमेल केला. त्यांनी माझ्या ईमेलला चटकन प्रतिसाद दिला. त्यांच्याशी तासभर संवाद साधता आला. त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्या क्षणी आपल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळणार आहे, हे मला जाणवलं. या क्षेत्रात केवळ थिअरीच नव्हे तर प्रॅक्टिकलही तितकंच महत्त्वाचं आहे, हे माहिती असल्याने अभ्यासासोबत थोडं कामही स्वीकारलं. ‘द व्हॉर्टन स्कूल’मधल्या कामासाठी मी भारतात असताना मुलाखत दिली होती. डॉ. रॅचेल अर्नेट यांच्यासोबत मी अॅडव्हान्स रिसर्च असिस्टंट म्हणून काम करते आहे. इथल्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मानसिकदृष्टय़ा सुरक्षित वाटतं ना, मोकळेपणानं बोलता-वावरता येतं का?, याबद्दलची निरीक्षणं या अभ्यासात नोंदवायची आहेत. सध्या अमेरिकेत अल्पसंख्याक लोक स्थिरावायचा आकडा वाढतो आहे, त्या दृष्टीने हा अभ्यास खूपच महत्त्वाचा ठरू शकेल. शिवाय ‘नेटर सेंटर फॉर कम्युनिटी पार्टनरशिप्स’मध्ये ॲन्टी रेसिझम टास्क फोर्समध्येही रिसर्च असोसिएट म्हणून काम करते आहे. या कामात आम्ही रआएह्णहे मॉडय़ुल तयार करत आहोत. त्याचा उपयोग तिथले कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षकांना आपापसांत अधिक सुसंवाद साधण्यासाठी होईल. समुपदेशक म्हणूनही मी काम केलं आहे, तसंच मी ‘पेन जीएसई’च्या ‘ऑफिस ऑफ डायव्हर्सिटी, इक्वॉलिटी ॲण्ड इन्क्ल्युजन’मध्ये ग्रॅज्युएट असिस्टंट म्हणून काम करते आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांचा विकास तिथलं सशक्त स्पर्धात्मक वातावरण, सगळय़ांमधलं सौहार्द आणि एकमेकांना पािठबा देणं यामुळे होऊ शकेल. शिवाय, प्रत्येकाचा दृष्टिकोन समजून घेऊन त्यानुसार कसं वागायचं, समान वागणूक देत सामावून कसं घ्यायचं याचा अभ्यास करायचा असून तो नुकताच सुरू झाला आहे.
पहिल्या वर्षभरात मी सतत अभ्यास करत राहिले. थेरपिस्ट असल्याने मी ट्रॉमा पेशंटसोबत काम करत होते. त्यामुळे माझ्यावर त्या कामाचे थेट परिणाम व्हायला लागले. छोटय़ा गोष्टींमुळे चिडचिड व्हायला लागली. मग स्वत:चीच समजूत घातली आणि ध्येयावर लक्ष्य केंद्रित करायचं ठरवलं. कधी वाटलं आत्ता आणखी काम करायचं नाही तर आता मी ते टेक देऊन करत नाही. वेळीच थांबते. त्याऐवजी कधी स्वयंपाक करते. कधी आवडतं भारतीय शास्त्रीय संगीत ऐकते. कामाच्या वेळांच्या सीमारेषाच आखून घेतल्याने आता विद्यार्थी म्हणून अभ्यास, काम आणि एकुणातलं वेळेचं व्यवस्थापन करणं चांगलं जमलं आहे. सगळय़ात मोठी गोष्ट म्हणजे पालकांशी फोनवर बोलून मूड चांगला होतो. हा अभ्यासक्रम संपल्यावर पुढल्या वर्षी मला ‘पेन करिअर सव्र्हिसेस’मध्ये इंटर्नशिप मिळणार आहे. मला विद्यार्थ्यांसाठी करिअर फेअर आयोजित करायचं आहे. वैयक्तिक करिअर काऊन्सेलिंग सेशन्स, एचआरमध्ये (मनुष्यबळ विकास क्षेत्र) करायचा आहे. शिवाय इंटरनॅशनल स्टुडन्ट्स, फस्र्ट जनरेशन स्टुडन्ट्स आणि मायनॉरिटी यांच्यासाठी करिअर डेव्हलपमेंटमध्ये खूप काम करायचं आहे. पीएचडीचा विचार सुरू असून माझं थिअरीवरचं काम पूर्ण करायचं आहे. सध्या लोकांना समजून घेणाऱ्यांची खूप गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. मदतीचा हात देण्यासाठी आणि माझं करिअर साकारण्यासाठी तुमच्या शुभेच्छा मिळतील, ही खात्री आहे.
कानमंत्र
संधी मिळेल अशी वाट न बघता, त्या निर्माण करा. कोणत्याही गोष्टींमुळे नाउमेद न होता ध्येयाकडे खंबीरपणे वाटचाल करा.
विषय शिकायचा ठरवल्यावर त्या क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद साधा, म्हणजे त्या क्षेत्रातला ट्रेण्ड कळून व्यापक दृष्टिकोन मिळू शकेल.
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com