राधिका आपटे अभिनीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच गाजतोय. ‘सौंदर्याची व्याख्या नसते. प्रत्येक मुलगी तिच्या परीने सुंदरच असते’, असा सुंदर संदेश देणारा हा व्हिडीओ अनेकांनी लाइक आणि शेअर केलाय.

‘‘मुलींच्या सुंदरतेची व्याख्या काय, असं विचारलं, तर त्याला अनेक उत्तरं मिळतील. प्रत्येक जण आपापल्या परीने मुलीच्या सुंदरतेचं वर्णन करील. काही जण आपल्या लेखण्या झिजवतील, काहींची कवी मनं जागी होतील, अलंकारिक शब्दांचा, उपमांचा अगदी भडिमार होईल. या सगळ्यांमध्ये ‘गोरे गोरे गाल’ किंवा ‘झिल सी नीली आँखे’ किंवा ‘चवळीची शेंग’ असे उल्लेख अगदी आवर्जून होतील. शारीरिक सुंदरता महत्त्वाची नसून मनाची सुंदरता महत्त्वाची असं म्हणणारे आपापल्या चिरंजीवांसाठी वधू शोधताना ‘गोरा रंग, चष्मा नको, किमान उंची ५ फूट ४ इंच, सडपातळ बांधा, सुशिक्षित, सुसंस्कृत’ मुलीसाठीच थांबतील. वधूवर सूचक मंडळांतील अपेक्षांच्या यादीत अजूनही हे निकष वरच्या क्रमांकावर असतात.
या टम्र्स अँड कंडिशन्स पूर्ण करते तिलाच ‘सुंदर आणि सुशील’ असं लेबल लावलं जातं. पण या सगळ्याच्या अगदी उलट बोलणारा आणि सुंदरतेची अगदी वेगळीच परिभाषा मांडणारा राधिका आपटे अभिनीत एक व्हिडीओ सोशल नेटवìकग साइट्सवर सध्या बराच गाजतोय. स्त्रियांनी तर या व्हिडीओला अगदी उचलून धरलंय. अनेक जणी या बद्दल सोशल नेटवìकग साइट्सवर अगदी भरभरून बोलताना दिसताहेत. या व्हिडीओमध्ये सौंदर्याला एका साच्यात बंद करून ठेवणाऱ्या समाजावर कुठेही टीका केली नाहीयेत किंवा कुणालाही खडे बोल सुनावले नाहीयेत. पण तरीही हा व्हिडीओ प्रत्येक क्षणी प्रत्येक स्त्रीला फक्त हीच जाणीव करून देतो की ‘यू आर ब्यूटिफुल’ तुझ्या सौंदर्याशी तुझा वर्ण, उंची, वजन याचा काहीही संबंध नाही.
या व्हिडीओमध्ये राधिका आपटे २५ वर्षांपूर्वीच्या छोटय़ा राधिकाला फोटोत बघून हेच सांगते की, तुझं सौंदर्य तुझ्या त्या कानठळ्या बसवणाऱ्या हसण्याने कमी होणार नाही किंवा डेंटिस्टलाही घाबरवून सोडणाऱ्या तुझ्या दातांमुळे तुझ्या हसण्याचं मोल कमी होणार नाहीये. समाजावर ताशेरे ओढण्याऐवजी स्त्रीला स्वत:च्या सौंदर्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या व्हिडीओमार्फत केलेला जाणवतो. कारण एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून देण्यापेक्षा ती आपली आपल्याला पटणं जास्त महत्त्वाच असतं. म्हणूनच राधिका या व्हिडीओत पुढे म्हणते, तू वेल बिहेव्ह्ड इंडियन गर्ल नाहीयेस असे म्हटलं कुणी, तर त्याला पहिले ‘वेल बिहेव्ह्ड’ची व्याख्या विचार किंवा गर्ल किंवा इंडियन असण्याची व्याख्या विचार. कारण ‘ही’’ Well behaved Indian girl असण्याने किंवा नसण्याने तुझ्या सौंदर्यात काहीही फरक पडणार नाहीये. तू आहेस तशीच सुंदर आहेस.

Story img Loader