केंटुकी फ्राइड चिकनची नवी जाहिरात पाहिलीत? रेस्टॉरंटमध्ये बसलेले तीन मित्र समोरच्या टेबलावर बसलेल्या यंग चॅपच्या तोंडाकडे आशाळभूतपणे पाहताय.. त्याच्यासारखं आपल्यालाही चांगलंचुंगलं खायला कधी मिळेल या विचारात गढलेले.. तेवढय़ात एकाचा फोन वाजतो.. तो म्हणतो, नही यार लोन नही चाहिये आणि फोन कट करतो.. दुसरी मत्रीण त्याला म्हणते, ले ले ना यार.. कट..
केंटुकी फ्राइड चिकनची ही जाहिरात भन्नाट आहे.. म्हणजे ते प्रॉडक्ट अमुक एका किमतीत मिळेल वगरे दाखवणारी ही जाहिरात. म्हणजे हे तिघं मित्र रिकामा वेळ आहे म्हणून रेस्टॉरंटमध्ये बसलेत आणि खिशात पुरेसे पसे नाहीत म्हणून त्यांना ते प्रॉडक्ट खाता येत नाहीए..
तमाम यंग चॅप्सना आता काही दिवसांनी सुट्टय़ा लागतील. कॉलेजची परीक्षा आटोपली की मग महिना-दोन महिने कट्टय़ावर बसून चकाटय़ा पिटता येणार नाहीत की कँटिनात जाऊन वडा-समोसा चापता येणार नाही.. करायचं काय, हा एव्हाना चच्रेचा विषय झाला असेल. आणि त्यावर स्मार्ट यंग चॅप्सनी उत्तरंही शोधून काढली असतील. अर्थात उत्तर एवढं सोप्पं आहे की त्यासाठी फार डोकं खाजवावं लागणार नाहीए.. समर जॉब!
समर व्हेकेशन्स म्हणजे यंग चॅप्ससाठी खिसा-पाकिटात कपात.. आता ही वित्तीय तूट कशी भरून काढायची.. हा प्रश्न घेऊनच एप्रिल महिना उजाडतो. मग काय, वळा समर जॉबकडे. कॉल सेंटर, मार्केटिंग, फायनान्स, एज्युकेशन, एन्टरटेनमेंट, रिसर्च इन्स्टिटय़ूट्स, स्पोर्टस् इव्हेंट्स, इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांत हे समर जॉब उपलब्ध असतात. दोनेक महिने जॉब करायचा. खिशात तेवढेच दहा-पंधरा हजार पडतात. थोडय़ाफार ओळखी होतात. झालंच तर पुढच्या वर्षांच्या समर जॉबची तजवीजही होते किंवा ग्रॅज्युएशननंतरच्या नोकरीचीही लॉटरी लागून जाते कधी कधी.. असा हा समर जॉब.. म्हटला तर टाइम पास आणि म्हटला तर सुट्टीतला पॉकेट मनी हमखास.
अस्सा असतो समर जॉब
अमुक एका संस्थेला अमुक एक ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा असेल आणि त्यासाठी त्यांना काही व्हॉलिंटियर्स लागत असतील तर ते साधारणपणे कॉलेजची पोरंच असतात. त्यांना दिवसाला अमुक एक मानधन ठरवून दिले जाते. त्यानुसार त्यांना पसा मिळतो.
अमुक एका संस्थेला अमुक एका ठिकाणी अमुक एका प्रॉडक्टसाठी सर्वेक्षण करायचं असेल, तर त्यासाठी लागणारी यंग ब्रिगेड अर्थात कॉलेज गोइंग स्टुडंट्स असतात. त्यांनाही अमुक दिवसांचे पसे वगरे दिले जातात.
अमक्या ठिकाणी तमक्या संस्थेला स्टॉल लावायचा असेल आणि त्यासाठी व्हॉलिंटियर्स लागत असतील तर तोही एक समर जॉब होतो.
मार्केटिंग एजन्सीला एखाद्या खास उत्पादनाची जाहिरात करायची असेल
एखाद्या शैक्षणिक संस्थेला अॅडमिशन्स फिल-अप करायच्या असतील तर त्यासाठी जादा मनुष्यबळ लागतं. त्या ठिकाणीही समर जॉब उपलब्ध होऊ शकतो.
आता काय आयपीएलचा हंगाम सुरू होईल. आयपीएलमध्येही यंग चॅप्सना समर जॉब मिळू शकतो. त्यासाठी थोडा वशिला लावावा लागतो. मात्र त्यातही दीड-दोन महिने आरामात निघून बऱ्यापकी पसा हाती लागतो.
याशिवाय अनेकही छोटी-मोठी कामे असतात ज्यातून सुट्टीचा कालावधी सत्कारणी लावून चार पसे गाठीला बांधता येऊ शकतात. यंग चॅप्सना अधिक सांगणे न लगे..