केंटुकी फ्राइड चिकनची ही जाहिरात भन्नाट आहे.. म्हणजे ते प्रॉडक्ट अमुक एका किमतीत मिळेल वगरे दाखवणारी ही जाहिरात. म्हणजे हे तिघं मित्र रिकामा वेळ आहे म्हणून रेस्टॉरंटमध्ये बसलेत आणि खिशात पुरेसे पसे नाहीत म्हणून त्यांना ते प्रॉडक्ट खाता येत नाहीए..
तमाम यंग चॅप्सना आता काही दिवसांनी सुट्टय़ा लागतील. कॉलेजची परीक्षा आटोपली की मग महिना-दोन महिने कट्टय़ावर बसून चकाटय़ा पिटता येणार नाहीत की कँटिनात जाऊन वडा-समोसा चापता येणार नाही.. करायचं काय, हा एव्हाना चच्रेचा विषय झाला असेल. आणि त्यावर स्मार्ट यंग चॅप्सनी उत्तरंही शोधून काढली असतील. अर्थात उत्तर एवढं सोप्पं आहे की त्यासाठी फार डोकं खाजवावं लागणार नाहीए.. समर जॉब!
समर व्हेकेशन्स म्हणजे यंग चॅप्ससाठी खिसा-पाकिटात कपात.. आता ही वित्तीय तूट कशी भरून काढायची.. हा प्रश्न घेऊनच एप्रिल महिना उजाडतो. मग काय, वळा समर जॉबकडे. कॉल सेंटर, मार्केटिंग, फायनान्स, एज्युकेशन, एन्टरटेनमेंट, रिसर्च इन्स्टिटय़ूट्स, स्पोर्टस् इव्हेंट्स, इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांत हे समर जॉब उपलब्ध असतात. दोनेक महिने जॉब करायचा. खिशात तेवढेच दहा-पंधरा हजार पडतात. थोडय़ाफार ओळखी होतात. झालंच तर पुढच्या वर्षांच्या समर जॉबची तजवीजही होते किंवा ग्रॅज्युएशननंतरच्या नोकरीचीही लॉटरी लागून जाते कधी कधी.. असा हा समर जॉब.. म्हटला तर टाइम पास आणि म्हटला तर सुट्टीतला पॉकेट मनी हमखास.
यंग चॅप्स @ समर जॉब
केंटुकी फ्राइड चिकनची नवी जाहिरात पाहिलीत? रेस्टॉरंटमध्ये बसलेले तीन मित्र समोरच्या टेबलावर बसलेल्या यंग चॅपच्या तोंडाकडे आशाळभूतपणे पाहताय.. त्याच्यासारखं आपल्यालाही चांगलंचुंगलं खायला कधी मिळेल या विचारात गढलेले.. तेवढय़ात एकाचा फोन वाजतो..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young chaps at summer jobs