मुंबईतील मोठय़ा पुस्तक विक्रेत्यांशी बोलले असता असे समजले की दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. साधारणत: शालेय मुलांच्या परीक्षा संपल्यावर म्हणजेच उन्हाळाच्या सुट्टीत बालझुंबड, बालजल्लोष, बालजत्रा यांसारखे उपक्रम राबविले जातात. यामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांवर सवलत दिली जाते. काही पुस्तक विक्रेते २८ फेब्रुवारी जो मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हासुद्धा मराठी पुस्तकांवर सवलत दिली जाते. काही पुस्तक विक्रेते वर्षांतून एकदा किंवा दोनदा आपल्या दुकानातील पुस्तकांचे प्रदर्शन भरवितात या वेळी पुस्तकांवर बरीच सवलत दिली जाते. अशा विविध उपक्रमांना उदंड प्रतिसाद लाभतो असे कळले. पुस्तक परीक्षणामुळे त्या त्या पुस्तकाची मागणी वाढते, असे त्यांनी सांगितले. तरुण पिढीची वाचनप्रियता कितपत आहे असे विचारले असता आपल्या मनातील शंका दूर करत ते म्हणाले की, तरु ण पिढी वाचत नाही असे अजिबात नाही.
ऐतिहासिक पुस्तके जसे श्रीमान योगी, पानिपत, छावा, स्वामी यांसारख्या पुस्तकांना अजूनही चांगला प्रतिसाद लाभतो. अच्युत गोडबोले यांची मुसाफीर, बोर्डरूम, मनात, किमयागार ही पुस्तके विशेष लोकप्रिय आहेत. वैद्यक व्यवसायावर आधारित आणि दोन हात, वॉर्ड नं ५ याला चांगली मागणी आहे. चेतन भगत, सुधा मूर्ती, सेल्फ हेल्पची पुस्तके तसेच मेलुहा, नागाज आणि वायुपुत्र या पुस्तकांची तरुणांमध्ये विशेषत: चलती आहे.
साभार – जवाहर बुक डेपो, मॅजेस्टिक बुक डेपो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा