कॉलेजच्या या फेस्टिवल्समुळे मिळालेली संधी बनते. कॉलेजमधील तरुण कलावंतांची एक वेगळी ओळख आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेला वाव मिळतो व त्याच्या करिअरला सुरुवात होते. आज प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थी अनेक फेस्टिवल्समध्ये भाग घेत बक्षिसे मिळवत उंचावले आहेत. असाच हा फेस्टिवल्स आता कलावंतांचा आधारस्तंभ म्हणजेच जीव बनला आहे. कलावंत छोटय़ा कॉलेजचा असो वा मोठय़ा पण त्या सर्वानाच या फेस्टिवलमध्ये समान संधी मिळते आणि त्यातूनच घडत असतो एक उच्च व उत्तम दर्जाचा कलावंत.
स्नेहल भुजबळ
सनीभूषण मुणगेकर
सुप्रिया परब
कविता मना-मनांतील…
फेस्टिवल्समुळे कलावंताला त्याची कला दाखविण्याची संधी मिळते. याच फेस्टिवल्समध्ये वेगवेगळे विद्यार्थी एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून उभे असतात, त्यांचे अनुभव व त्यामुळे मिळालेली समज यामुळे त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण येतं, असंच काहीसं घडलं ते कवी पंकज दळवी, कवी मनीष तपासे व कवी गीतेश िशदे यांच्याबरोबर. काव्यवाचन, काव्यलेखन अशा स्पर्धा त्यांनी अनेक फेस्टिवल्समध्ये