राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविकांच्या प्रभागातील विकास कामांकरिता पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती नगरसेविका भारती कांबळे व मंजुश्री मुरकुटे यांनी दिली.
पालिकेत काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांची सत्ता असून ते विरोधी नगरसेविकांच्या प्रभागात कामे करत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री पाचपुते यांची भेट घेवून विकास कामांकरीता निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाचपुते यांनी निधी मंजूर केला असे कांबळे व मुरकुटे यांनी सांगितले.

Story img Loader