मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुर्गम, डोंगरी भागातील विकासकामांना गती देण्यासाठी कुंभारगाव विभागातील विविध चार रस्त्यांच्या कामांना प्रत्येकी ३० लाख याप्रमाणे १ कोटी २० लाखांच्या रस्तेविकास कामांना मंजुरी दिली आहे. रस्ते व पूल दुरूस्ती योजनेत्तर कार्यक्रमातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.
अतिशय दुर्गम व डोंगराळ भागातील या रस्ते विकास कामात पाटण तालुक्यातील वाझोली फाटा ते वाझोली रस्ता, खळे व शिद्रुकवाडी, निगडे ते माईंगडेवाडी तसेच चाळकेवाडीच्या रस्त्याचा समावेश आहे. माईगडेवाडीला तर पूर्वापार पक्का रस्ता माहितीच नाही. अतिशय खराब रस्त्यावरून पावसाळय़ात वाहतूकच येथे होऊ शकत नसल्याने येथील स्थानिकांची मोठी गैरसोय होत असे. आजारी व कमकूवत व्यक्तीला तर अक्षरश: डोलीतून हलवावे लागत होते. वाझोली ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नी येत्या निवडणुकीत बहिष्काराचा इशारा दिला होता. ही रस्त्याची चारही कामे डोंगरी दुर्गम भागातील असल्याने याचा लाभ मिळणाऱ्या हजारो जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही कामे मंजूर झाल्याचे समजताच संबंधित वाडय़ावस्त्यावरील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी राहूल चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
 
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा