जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संचालक आत्मा व पणन मंडळाच्या वतीने आयोजित धान्य महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात महिला बचतगट, सेंद्रिय उत्पादन घेणारे अशा सुमारे २८० शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला. त्यांच्या मालाची विक्री झाल्यानंतर दुसरे शेतकरी सहभागी झाले. तीन दिवसांत ४५० शेतकऱ्यांनी ३ हजार ९४८ क्विंटल धान्याची विक्री होऊन सुमारे १ कोटी २८ लाख ७ हजार ३५० रुपयांची उलाढाल झाली.
महोत्सवात १ हजार ४१० क्विंटल ज्वारी, १ हजार ६२० क्विंटल गहू, ७० क्विंटल काबुली चना, ९८ क्विंटल तूरडाळ, ७२ क्विंटल हरभरा याशिवाय मूग डाळ, तांदूळ, उडीद, गूळ, तीळ, कारळ, जवस, काळा मसाला, फळे, भाज्या, उसाचा रस अशा सर्व स्टॉलवर ग्राहकांची चांगली गर्दी होती. शेतकरी व ग्राहक यांचा थेट संपर्क असल्यामुळे दलालाविना शेतीमाल विक्रीची सुविधा प्रथमच उपलब्ध केली होती. पहिल्याच वर्षी शेतकरी व ग्राहक यांच्या उदंड प्रतिसादामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल चांगलेच उंचावले. दरवर्षी असा महोत्सव भरवला जाईल व तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी. एस. मोटे यांनी सांगितले.
लातूर धान्य महोत्सवात सव्वाकोटींची उलाढाल
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संचालक आत्मा व पणन मंडळाच्या वतीने आयोजित धान्य महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात महिला बचतगट, सेंद्रिय उत्पादन घेणारे अशा सुमारे २८० शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविण्यात
First published on: 08-05-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 25 crores business in latur grains mahotsav