अन्न वऔषध प्रशासन , ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईत मुंब्र्यातील एका घरातून १ लाख २४ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. खुर्शिद आलम महम्मद शाबीर शेख (४८) याच्याकडून हा माल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर खटला दाखल करण्यात करण्यात येणार आहे.   बुधवारी ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी दुसऱ्या एका कारवाईसाठी मुंब्रा येथे गेले होते. यावेळी  खुर्शिद आलम महम्मद शाबीर शेख याने स्वत:च्या घरातच गुटखा साठवून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. गुन्हे शाखेच्या वतीने याबाबत अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. यावेळी अन्न औषध प्रशासन आणि ठाणे गुन्हे शाखा यांनी एकत्रितपणे कारवाई करुन हा माल ताब्यात घेतला.  शेख स्वत:च्या घरातूनच या गुटख्याची विक्री करत होता. गोवा, पुकार, विमल, कोल्हापुरी, राजेश्री या कंपन्यांच्या गुटख्याची १ हजार १३८ पाकीटे त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. हा सर्व माल नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.

Story img Loader