नेवासे तालुक्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील मृत तरूणांच्या कुटुंबियांना राज्या सरकारने प्रत्येकी दीड लाख रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नुकतीच हे धनादेशही अदा केले.
नववर्षांच्या पहिल्याच दिवशी दि. १ जानेवारीला सोनईत संदिप धनवर (वय २४ राहणार नाशिक), सचिन सोनलाल धारू (वय  २४) व राहुल कंडारे (वय २०, दोघेही राहणार मालेगाव) या तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दलित समाजातील हे तिघेही तरूण नेवासे तालुक्यातील शैक्षणिक संकुलात सफाई कामगार म्हणुन नोकरी करीत होते. या तिघांचा खुन करण्यामागे प्रेमसंबधाचे कारण आहे. आरोपीच्या कुटूंबातील एका मुलीबरोबर धारू याचे प्रेम होते दोघे लग्न करणार होते. पण कुटुंबाचा विरोध होता. त्यातुन हे हत्याकांड घडले. गुन्ह्याला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम लागू करण्यात आलेले आहे.  सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची त्याच्या नाशिक व मालेगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन तिघांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दीड लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश दिले.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, संदिप कुऱ्हे व अशोक नवगिरे या तिघांना अटक करण्यात आली होती. सुरूवातीला त्यांना पोलीस कोठडीत मिळाली होती. आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्याकांडात आणखी काही गुन्हेगारांचा समावेश असून त्यांच्या मागावर पोलीस आहेत.  सचिन धारू याचे मुंडके धडावेगळे करण्यात आले होते. तसेच हात-पाय कापून टाकण्यात आले होते. मुंडके विहिरीत पुरण्यात आले होते. हात-पाय एका कूपनलिकेत टाकण्यात आले आहे. या कुपनलिकेला पाणी नाही व कुपनलिकेतून दरुगधी येत होती. ३५० फूट खोल हे अवयव टोकण्यात आले होते. खुनात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आलेली आहे. हत्याकांडाचा तपास धिम्या गतीने सुरू होता. त्यामुळे तर्कवितर्क केले जात होते.