कर्जत तालुक्यातील विविध गावांतील विकास कामांसाठी सुमारे दीड कोटी रूपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी
दिली.
पांडुळे यांनी पुढे सांगितले की, मिरजगाव जि. प. गटातील गावे विकासात मागे पडली आहेत. या परिसरात सन २०१२ मध्ये विविध योजंनामधून विकासकामे करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये थेरगाव येथे नागेश्वर मंदिराशेजारी २५ लाखांचा बंधारा, श्रीक्षेत्र मांदळी येथे भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी एआरएफ योजनेंतर्गत ५ लाखांचा निधी दिला असून निमगाव गांगर्डा येथे पाणी योजनेसाठी ५ लाख, पथदिव्यांसाठी ५ लाख, रस्त्यांसाठी १० लाख रूपये, राज्यमार्ग १४१ ते ज्योतीबावाडी १० लाख, प्रजीमा ८० ते रमजान चिंचोली १५ लाख, कोंभळी ते नागापूरे वस्ती १५ लाख, प्रजीमा खुरंगेवाडी ते ७० रस्ता १५ लाख, राज्यमार्ग १४१ ते थेरगांव रस्ता १० लाख, तसेच दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत तिखी, बेलगाव, कोकणगाव व मांदळी गावठाणासाठी प्रत्येकी पाच लाख रूपये, रवळगाव स्मशानभूमीसाठी २ लाख, तसेच हायमॅक्स दिवे आदी कामांसाठी हा दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे पांडुळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा