सेलू तालुक्यातील प्ररामा ६ ते कवडधन रस्त्यासाठी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ७४ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती खासदार गणेशराव दुधगावकर यांनी दिली.
प्ररामा ६ ते कवडधन रस्त्याची एकूण लांबी ४.१२० कि.मी. असून, यात ५ लहान पुलांचा समावेश आहे. हा रस्ता काळय़ा मातीतून जात असल्याने याची बांधणी अत्याधुनिक संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत आरबीआय ८१ या रसायनाचा वापर करून करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता व टिकाऊपणा वाढणार आहे. या कामाच्या निधीसाठी खासदार दुधगावकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी १ कोटी ७४ लाख रुपये मंजूर झाले.
कामाची निविदाही जाहीर करण्यात आली. खासदार दुधगावकर यांनी आणखी चार रस्त्यांची मागणी केली आहे. त्यात विटा-लासीन-खडी उक्कडगाव (तालुका सोनपेठ) १२ कि.मी. जोडरस्ता जवळा जुट्टे (तालुका पाथरी) ३ कि.मी., जोडरस्ता सातला (तालुका परभणी) ३.५ कि.मी., रामपुरी थार वांगी (तालुका मानवत) १३.५० कि.मी. या कामांचे प्रस्ताव प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडे पाठविले आहेत.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 75 caror funds available for kawaddhan road work