किरकोळ कारणावरून लगडवाडी (ता. वाई) येथील जगन्नाथ वामन पवार (वय ६२) यांचा खून झाल्याची फिर्याद भुईज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शेतजमिनीत जाण्यायेण्याच्या मार्गावरील रस्त्याच्या कारणावरून खून झाल्याचा संशय त्याच्या मुलानी पोलिसात व्यक्त केला. त्यानंतर गावातील चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुरुवातीला जगन्नाथ पवार यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा कयास होता. परंतु ज्या रस्त्याने ते शेतात जातात त्या रस्त्याला एकही झाड नाही व वयाच्या ६२ व्या वर्षी ते झाडावर चढणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांचा शेतरस्त्यातील वादातून खून झाला असावा. त्याप्रमाणे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले, तेव्हा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
किरकोळ कारणावरून वाईजवळ एकाचा खून
किरकोळ कारणावरून लगडवाडी (ता. वाई) येथील जगन्नाथ वामन पवार (वय ६२) यांचा खून झाल्याची फिर्याद भुईज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
First published on: 26-05-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 murdered near wai due to minor reason