‘भारत बंद’ किंवा ‘मुंबई बंद’ अशी हाक एखाद्या राजकीय पक्षाने दिली की, सर्वात पहिले ‘बेस्ट’ उपक्रमाला धडकी भरते. कारण संप, बंद किंवा आंदोलन कोणत्याही पक्षाचे असले, तरी काचा मात्र बेस्ट बसच्याच फुटतात. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या एका आर्थिक वर्षांत राजकीय पक्षांच्या संप व आंदोलनांमध्ये ‘बेस्ट’च्या तब्बल २३७ गाडय़ांची नासधूस झाली आहे. तर समाजकंटकांनी वेळोवेळी केलेल्या दगडफेकीत ‘बेस्ट’च्या ७५ बसेसच्या काचा फुटल्या आहेत. आधीच तोटय़ात असलेल्या बेस्ट उपक्रमाला या ३१२ गाडय़ांच्या दुरुस्तीपोटी तब्बल १० लाखांचा फटका बसला आहे. बंद, संप आणि आंदोलने यांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी संबंधित राजकीय पक्षांवर असते. मात्र गेल्या वर्षभरात ‘बेस्ट’च्या २३७ बसेस फोडणाऱ्या राजकीय पक्षांनी किंवा संघटनांनी नुकसानभरपाईपोटी ‘बेस्ट’च्या तिजोरीत एक छदामही भरलेला नाही. या आंदोलनांपोटी बेस्टला तब्बल ७ लाख ६० हजार रुपये एवढे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेकदा मुंबईत काही अज्ञात व्यक्ती रागाच्या भरात ‘बेस्ट’च्या बसगाडय़ांवर दगडफेक करतात. या दगडफेकीत ‘बेस्ट’चे नुकसान खालीलप्रमाणे.
महिना बसगाडय़ा नुकसान (रु.)
एप्रिल २०१२ ०४ ६,०३६
मे २०१२ २८ ४१,२१६
जून २०१२ ०५ ४,७४४
जुलै २०१२ ०३ २,३४८
ऑगस्ट १२ ०९ २९,९७२
ऑक्टो २०१२ ०२ ८,८४२
नोव्हें. २०१२ ०८ २९,५२५
डिसें. २०१२ ०३ ९,०४५
जाने. २०१३ ०३ ७,०१६
फेब्रु. २०१३ ०४ १०,८८४
मार्च २०१३ ०६ २४,१२०
एकूण ७५ १,७३,७४८
* तारीख : १९ मे २०१२.
घटनास्थळ : जांबोरी मैदान ,वरळी नाका
एका सोशल नेटवर्किंग साइटवर गौतम बुद्धांच्या प्रतिमेचा अवमान केल्याच्या कारणास्तव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी वरळी नाका आणि जांबोरी मैदान येथे ‘बेस्ट’च्या गाडय़ांवर दगडफेक केली. पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना अटक केली. ‘बेस्ट’च्या गाडय़ांचे फार नुकसान झाले नाही.
फुटलेल्या बसेस : ५ (काचा). नुकसान : ९,३३३ रुपये
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा