शिर्डीच्या साईनगर रेल्वेस्टेशन येथून साईभक्तांच्या सोयीसाठी दर आठवडय़ाला दहा रेल्वेगाडय़ा सुरु झालेल्या असून, राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यातील साईभक्तांना याचा मोठा लाभ होणार आहे.
साईनगरहून सध्या साईनगर-मुंबई फास्ट पॅसेंजर दररोज दुपारी ४.४० वाजता सुटते. साईनगर- दादर व साईनगर-पंढरपूर या एक्सप्रेस गाडय़ा दर मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी अनुक्रमे रात्री १०.२५ वाजता सकाळी ५ वाजता जाते. साईनगर-सिकंदराबाद ही गाडी आठवडय़ातून सोमवार व शनिवार या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता, तर साईनगर-काकीनाडा एक्सप्रेस ही गाडी दर मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता जाते. साईनगर-विजयवाडा एक्सप्रेस ही गाडी दर बुधवारी सायंकाळी ५.१० मिनीटांनी आणि साईनगर-हावडा एक्सप्रेस ही गाडी दर शनिवारी दुपारी १.५५ मिनीटांनी रवाना होते. साईनगर-चेन्नई एक्सप्रेस ही गाडी दर गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता सुटते. साईनगर-विशाखापट्टणम् एक्सप्रेस ही गाडी दर शुक्रवारी सायंकाळी ७.१० वाजता सुटते. साईनगर-म्हैसूर एक्सप्रेस ही गाडी दर मंगळवारी रात्री ११.५५ वाजता रवाना होते.
शिर्डीत साईभक्तांची होणारी वाझती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नवीन रेल्वेगाडय़ा या मार्गावर सुरु केलेल्या आहेत. एप्रिल व मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आणखी काही जादा नवीन गाडय़ा सुरु होणार असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा