गेल्या दोन महिन्यांपासून चादर व टॉवेल उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच सुताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम चादर व टॉवेल उत्पादनखर्चावर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही उत्पादनांच्या दरात किलोमागे १० रुपये वाढ करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाने घेतला आहे.
यंत्रमागधारक संघाची बैठक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या वेळी चादर व टॉवेल उत्पादनाच्या खर्चात वरचेवर भरमसाट वाढ होत चालल्याने व्यवसाय अडचणीत सापडल्याचे या बैठकीत अनेक यंत्रमागधारकांनी नमूद केले. त्यावर चर्चा होऊन अखेर पहिल्या टप्प्यात चादर व टॉवेलच्या दरात किलोमागे १० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे. पुढील महिन्यात पुन्हा दरवाढ करावी लागणार असल्याचे पेंटप्पा गड्डम यांनी स्पष्ट केले.
सुताचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुताला जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्याखाली आणावे, अशी यंत्रमागधारक संघाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर करण्याचे ठरले.
सोलापुरात चादर व टॉवेलच्या दरात किलोमागे १० रुपये वाढ
गेल्या दोन महिन्यांपासून चादर व टॉवेल उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच सुताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम चादर व टॉवेल उत्पादनखर्चावर झाला आहे.
आणखी वाचा
First published on: 16-07-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 rs increase behind 1 kg of solapur chadar and bedsits