आगामी गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासह अन्य
ऊस उत्पादक शेतक -यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने बुधवारी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली होती. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतक -यांनी शिये फाटा येथे पंचगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड.माणिक शिंदे, संपर्क प्रमुख अॅड.अजित पाटील, शंकर व्हरगे, रंगराव पाटील, के.बी.खुटाळे आदींनी केले.
रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या जाव्यात, साखरेवरील निर्यातबंदी उठवावी, पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी मिळावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतक -यांना अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा