‘दबंग’ सलमानची दुष्काळग्रस्तांना मदत
वेगवेगळ्या प्रकरणांत ‘दबंगगिरी’ करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या फाउंडेशनने मराठवाडय़ात दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या सिंटेक्स टाक्यांपैकी १०० टाक्यांचे वितरण ९ मे रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाडय़ाच्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन चित्रपट अभिनेता सलमान खान यांच्या फाऊं डेशनने सर्व आठ जिल्ह्य़ांत प्रत्येकी २५० सिंटेक्स टाक्या देण्याचे अलीकडेच जाहीर केले. मदतीची घोषणा झाल्यानंतर फाउंडेशनने प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात नांदेडसह सर्वच जिल्ह्य़ांत प्रत्येकी १०० टाक्या उपलब्ध केल्या आहेत. एरवी ‘दबंगगिरी’ करून सतत चर्चेत राहणाऱ्या सलमान खानने सामाजिक बांधिलकी जोपासत दुष्काळग्रस्तांसाठी सुरू केलेले कार्य अन्य अभिनेत्यांसाठी अनुकरणीय ठरले आहे. नांदेड जिल्ह्य़ातील १४० गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
सलमान खान फाउंडेशनच्या वतीने प्राप्त होणाऱ्या २५० टाक्या जिल्ह्य़ातील टंचाईग्रस्त गावात वितरित करण्यात येणार आहेत. टाक्या बसविण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर सोपविण्यात येणार आहे. सलमान खान फाउंडेशन तीन टप्प्यांत २५० टाक्या देणार आहे. पहिल्या टप्पा ९ मे रोजी १०० टाक्यांचा आहे. दुसरा टप्पा १३ मे रोजी १०० टाक्यांचा, तर तिसरा टप्पा १६ मे रोजी ५० टाक्यांचा असणार आहे.
पाण्याच्या १०० टाक्या मराठवाडय़ासाठी
‘दबंग’ सलमानची दुष्काळग्रस्तांना मदत वेगवेगळ्या प्रकरणांत ‘दबंगगिरी’ करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या फाउंडेशनने मराठवाडय़ात दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या सिंटेक्स टाक्यांपैकी १०० टाक्यांचे वितरण ९ मे रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
First published on: 07-05-2013 at 02:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 tankers of water to marathwada from salman khan being human foundation