शंभर कोटी क्लबमधले किती?.. म्हणजे ‘रेस २’, ‘ग्रँड मस्ती’, ‘भाग मिल्खा भाग’.. बस् एवढेच! नाही.. मग काही दोनशे कोटी क्लबमध्ये आहेत तर जवळपास निम्मे चित्रपट हे ५० ते १०० कोटींच्या मधले आहेत मग त्यांचा एक छोटा वेगळा क्लब करायचा का?.. अगदी बोटे मोजत मोजत सुरू असलेली ही आकडेवारी आपल्याला फारशी कळणारी नसली तरी बॉलिवूडचे जाणकार आणि विशेषत: ट्रेड विश्लेषक मात्र अक्षरश: शुक्रवार ते शुक्रवार अशी आकडेवारी मांडताना दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे एक शतक पूर्ण करून दुसऱ्या शतकाकडे वाटचाल सुरू केलेल्या या भारतीय चित्रपट उद्योगाची आर्थिक उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढते आहे. एकीकडे चित्रपटांच्या निर्मितीचे बजेट मोठे होत असले तरी चित्रपटांची कमाईसुद्धा दोनशे ते तीनशे कोटींच्या आसपास पोहोचली असल्यामुळे एकंदरीत सिनेमा उद्योगाची उलाढाल ही काही हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षी सिक्वल्स आणि रिमकेच्या जिवावर १९०० कोटींच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या बॉलिवूडने या वर्षी बाजी मारली असून ३ हजार कोटींच्या दिशेने या वर्षीची घोडदौड सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
आशय-तंत्राच्या बाबतीत वेगाने बदलणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांनी या वर्षी तिकीटबारीवर अक्षरश: कोटींची कमाल केली आहे. शंभरपेक्षाही जास्त चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी या यादीत तब्बल सहा चित्रपटांनी शंभर कोटींच्या आसपास कमाई केली आहे. आणि यादीतील जवळपास अध्र्याहून जास्त चित्रपट हे पन्नास कोटींच्या वर कमाई केलेले आहेत तर अगदी कमीतकमी बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटांनीही २६ ते ३० कोटींचा गल्ला जमवला आहे. कोणत्याही सिक्वल्स आणि रिमेकचा आधार नसतानाही केवळ चित्रपटांचे विषय, तरुण दिग्दर्शकांची अभिनव मांडणी, कलाकारांचा चोख अभिनय आणि मार्केटिंग-प्रसिद्धी तंत्राचा केलेला पुरेपूर वापर यामुळे गेल्या वर्षीपेक्षा हजार कोटींची वाढ या वर्षीच्या व्यवसायात अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या सगळ्या गणितांना आणि अपेक्षांना सुरुवात झाली आहे ती सध्या सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असणाऱ्या क्रिश ३ या चित्रपटामुळे. आठवडय़ाच्या आत या चित्रपटाने देशभरात १६६ कोटींची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशातही ‘क्रिश ३’ला चांगला प्रतिसाद मिळाला असून तिथेही ३६ कोटींचा व्यवसाय केला आहे. दोन्हीकडची आकडेवारी एकत्र केली तर आठवडय़ाभरात ‘क्रिश ३’ने ह्रतिक रोशनला २०० कोटी क्लबचा धनी केले आहे. ‘क्रिश ३’ला जर एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असेल तर वर्षांच्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या ‘धूम ३’ चित्रपटालाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
‘क्रिश ३’ आणि ‘धूम ३’च्या प्रदर्शनात आठ आठवडय़ांचे अंतर आहे. आणि यामध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित दीपिका-रणवीर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रामलीला’ हा दुसरा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ करीना आणि इम्रानचा ‘गोरी तेरे प्यार में’, सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित ‘बुलेट राजा’ आणि शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेला प्रभुदेवा दिग्दर्शित ‘आर. राजकुमार’ असे चार चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे वर्षांच्या उत्तरार्धात अजून ५०० कोटींच्या आसपास बॉलिवूडचे चित्रपट व्यवसाय करतील, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सहारा मोशन पिक्चर्सचे वितरण प्रमुख आणि ट्रेड विश्लेषक गिरीश जोहर यांनी ट्विटरवर दिलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबपर्यंत बॉलिवूडने २२०० कोटींची कमाई केली आहे.
पुढच्या दोन महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या ५ चित्रपटांनी जर ५०० कोटींच्या आसपास व्यवसाय केला तर ही आकडेवारी थेट २७०० कोटींच्या आसपास पोहोचेल. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी फार मोठी असून पुढच्या वर्षी तर आघाडीच्या कलाकारांना २०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवूनच तयारी करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वर्षी, जवळपास सहा ते सात चित्रपटांनी शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केल्यामुळेच ही मजल गाठता आली आहे, असे मत जोहर यांनी व्यक्त केले आहे. ‘क्रिश ३’ आणि ‘धूम ३’ यांच्या स्पर्धेतून पुढच्या वर्षीची बॉलिवूडची नवी समीकरणे निश्चित होणार आहेत.

मराठी चित्रपटांची
उडीही १० कोटींकडे
एकीकडे हिंदी चित्रपट शंभर कोटींपासून पुढे दीडशे-दोनशे कोटींकडे सरकत असताना मराठी चित्रपटही मागे राहिलेले नाहीत. मराठी चित्रपटांची वाटचालही १० कोटींच्या दिशेने सुरू झाली आहे. चित्रपट वितरक समीर दीक्षित यांच्या मते अनुदानामुळे पुढे येणाऱ्या नवनव्या निर्मात्यांचं पाठबळ आणि सर्जनशील दिग्दर्शकांचे चित्रपट यामुळे एकूणच निर्मिती वाढली. त्याचाही परिणाम मराठी चित्रपटांच्या व्यवसायावर झाला आहे. दर वर्षी ३० ते ४० कोटींच्या घरात असेलल्या मराठी चित्रपटाने या वर्षी १२५ ते १५० कोटींच्या आसपास उलाढाल केली असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. अर्थात, यात मोलाचा वाटा हा सगळे विक्रम मोडत ३५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘दुनियादारी’ चित्रपटाचा वाटा मोठा आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Loksatta Lokrang Comfort Food Hapus Mango Market
बारमाही : असले जरी तेच ते…
Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट
karvaan movie china box office record
‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ नाही तर ‘या’ चित्रपटाने चीनमध्ये विकलेली ३० कोटी तिकीटे, अजूनही अबाधित आहे विक्रम
pachadlela movie inamdar wada after 20 years look what is history
Video : ‘पछाडलेला’ सिनेमातील जुना वाडा आठवतोय का? कुठे आहे ‘ही’ जागा? फक्त ‘ती’ वस्तू मिसिंग, नेटकऱ्यांनी अचूक हेरलं…

चेन्नई एक्सप्रेस      २२७ कोटी
यह जवानी है दिवानी     १९० कोटी
क्रिश ३      १६६ कोटी
भाग मिल्खा भाग      १०८ कोटी
ग्रँड मस्ती      १०३ कोटी
रेस २      १०० कोटी
आशिकी २     ७८ कोटी
रांझना     ६७ कोटी
वन्स अपॉन अ टाइम     ६४ कोटी
इन मुंबई दोबारा  

Story img Loader