न्यायालयीन प्रकरणात साक्ष देण्यास आलेल्या भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक वसंत मुळे यांच्यावर न्यायालयातून बाहेर पडत असताना अज्ञात १० ते १५ लोकांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकारात मुळे जबर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात असून, सायंकाळपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केली नव्हती.
जिल्हा न्यायालयात सोमवारी एका न्यायालयीन प्रकरणात साक्ष देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक वसंत मुळे सकाळीच हजर झाले. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना अज्ञात १० ते १५जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. बेदम मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. काही क्षणात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. मुळे यांना जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2012 रोजी प्रकाशित
भूमी अभिलेख उपसंचालकास १०-१५ जणांची बेदम मारहाण
न्यायालयीन प्रकरणात साक्ष देण्यास आलेल्या भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक वसंत मुळे यांच्यावर न्यायालयातून बाहेर पडत असताना अज्ञात १० ते १५ लोकांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-12-2012 at 02:33 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10m to 15 people bit bhumi aabhilekh vice director