वरळी नाका येथील महापालिकेच्या बाळकृष्ण गावडे मंडईतील मासेविक्री करणाऱ्या ११ कोळी महिलांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या महिला सामूहिक उपोषण करणार आहेत.
गावडे मंडईत या ११ कोळीणी मासे विकतात. मासेविक्रीचा परवाना मिळावा म्हणून त्या सात वर्षांपासून सहाय्यक आयुक्त (बाजार), महात्मा फुले मंडई यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करत आहेत. मात्र त्यांना अद्याप अनुज्ञापत्र मिळालेले नाही. मासे विक्रीचे अनुज्ञापत्र मिळण्याबाबतचे पुरावे या महिलांकडे असतानाही बाजार विभागाने या महिलांना अपात्र ठरविल्याने त्यांना मासेविक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला आहे. या ११ कोळीणींना अनुज्ञापत्र तातडीने देण्यात यावे आणि या महिलांवर अन्याय करणाऱ्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशा दोन मागण्यांसाठी हे उपोषण केले जाणार आहे.

Story img Loader