दहावीची परीक्षा समाप्तीच्या पाठोपाठ शिक्षण उपसंचालक कार्यालयाने येत्या २ एप्रिलला अकरावी केंद्रीय प्रवेश समितीवरील चर्चेसाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक बोलविली आहे.दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण हलका होऊन विद्यार्थी निर्धास्त झाले. त्याचवेळी अकरावीसाठीच्या केंद्रीय प्रवेश समितीचे कामाची सुरुवात झाली
आहे.
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ साठी अकरावी प्रवेशासाठी येत्या २ एप्रिला मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावर्षी विज्ञान विषय आणि द्विलक्षी अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असून वाणिज्य विषयासाठी केंद्रीय प्रवेश समिती नसेल. मुख्याध्यापकांची सभा सकाळी ११.३०ला धनवटे नॅशनल महाविद्यालयात होऊ घातली आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश समिती असेल काय?, नागपूर विभागातील कोणकोणत्या शाळा या समितीत सहभागी होतील आणि कोण बाहेर पडतील, विज्ञानाबरोबरच वाणिज्यसाठीही प्रवेश समिती असेल काय अशा वेगवेगळ्या विषयांवर मुख्याध्यापकांच्या बैठकीपूर्वीच चर्चा सुरू व्हायची. यावर्षी शिक्षण उपसंचालक विभागाने घाई करून दहावी परीक्षा समाप्तीपाठोपाठ अकरावीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही चर्चा घडण्याच्या आत केंद्रीय प्रवेश समितीची पुढील रुपरेषा ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांही कष्ट घ्यावे लागणार आहेत.
मंगळवारी २ एप्रिलच्या बैठकीत शाळा मुख्याध्यापकांच्या संमती पत्राबरोबरच शाळेकडून माहितीही बोलावण्यात आली आहे. शिवाय अनुदानित, विनाअनुदानित तुकडय़ांसंबंधीही बैठकीत चर्चा होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा