गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या गिर्यारोहकांना गिरिमित्र संमेलनातर्फे दिले जाणारे विविध सन्मान जाहीर झाले असून यंदाचा ‘गिरिमित्र जीवन गौरव सन्मान’ ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद पाळंदे यांना, तर ‘गिरिमित्र जीवन गौरव सन्मान (मरणोत्तर)’ श्रीकांत लागू यांना जाहीर झाला आहे. तर प्रस्तरारोहक एली चेविक्स यांना ‘अतुल्य गिरिमित्र’ सन्मान देण्यात येणार आहे. ६ व ७ जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे १२ व्या गिरिमित्र संमेलनात हे सन्मान प्रदान केले जातील.
आनंद पाळंदे १९६५ पासून गिर्यारोहणात कार्यरत असून पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. अनेक खडतर हिमालयीन मोहिमा व सह्याद्रीत प्रचंड भटकंतीबरोबरच गिर्यारोहणावर मार्गदशर्क मौलिक लेखन त्यांनी केले आहे. सह्याद्रीतील भटकंतीवरचे ‘डोंगरयात्रा’ हे पुस्तक गिर्यारोहण क्षेत्रात मैलाचा दगड ठरले आहे. श्रीकांत लागू यांनी जगातील पहिल्या अंध गिर्यारोहकांच्या मोहिमेत अंध गिर्यारोहकांचे साथीदार बनून शितीधर शिखर सर केले होते. कांचनगंगा(१९८७) व एव्हरेस्ट (१९९८) या दोन्ही पहिल्या नागरी मोहिमांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.
गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जयंत नाखवा यांना गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान देण्यात येणार आहे, तर रमाकांत गुरव यांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. संस्थाच्या माध्यमातून गिर्यारोहण क्षेत्राच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या गिर्यारोहकांना गिरिमित्र गिरिभ्रमण-संस्थामक कार्य सन्मानाने गौरविण्यात येते. यंदा साद मांऊटेनिअर्सचे राजन देशमुख, शैलभ्रमरचे प्रकाश वाळवेकर आणि वैनतेय (नाशिक) संस्थेचे गिरीश टकले यांना हा सन्मान देण्यात येत आहे. गिर्यारोहणाच्या अनुशंगानेच सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल पिनॅकल क्लब या रौप्य महोत्सवी संस्थेस गिरिमित्र सामाजिक कार्य सन्मान जाहीर झाला आहे.
प्रस्तरारोहणासारख्या वेगळ्या वाटेवर गौरवशाली वाटचाल करणाऱ्या पल्लवी वर्तक हिला गिरिमित्र शरद ओवळेकर विशेष सन्मानाने गौरविण्यात येत आहे. २०१२-२०१३ च्या दरम्यान प्रस्तरारोहणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महादेव गायकवाड यास गिरिमित्र प्रस्तरारोहक पुरस्कार व गिरीविहार संस्थेच्या मियार व्हॅली एक्सिपिडीशेनला गिरिमित्र गिर्यारोहण मोहीम पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच बरोबर अरु निमा सिन्हा, ल्होत्से-एव्हरेस्ट २०१३ मोहीम गिरीप्रेमी पुणे, मिशन एव्हरेस्ट २०१२ मोहीम सागरमाथा संस्था (पिंपरी), प्रियंका मोहिते, डॉ. मुराद लाला या एव्हरेस्टवीरांचा सन्मान संमेलनात करण्यात येणार आहे. संमेलनाची सविस्तर माहिती६६६.ॠ्र१्र्रे३१ं.१ॠ <ँ३३स्र्://६६६.ॠ्र१्र्रे३१ं.१ॠ/> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Story img Loader